सलमान खान याचं तलाक आणि एलिमनी अमाऊंटवर बिनधास्त वक्तव्य, व्हिडिओ व्हायरल

'द ग्रेट इंडियन कपिल शो' चा तिसरा सिझन लवकरच सुरू होणार आहे. सलमान खान पहिला गेस्ट असणार आहे. हा एपिसोड ऑन एअर होण्या आधीच सलमान खानचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.

सलमान खान याचं तलाक आणि एलिमनी अमाऊंटवर बिनधास्त वक्तव्य, व्हिडिओ व्हायरल
| Updated on: Jun 14, 2025 | 6:35 PM

बॉलिवूडचा स्टार सलमान खान याने तलाक आणि एलिमनी अमाऊंटवर आपले मत मांडल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. चाहत्यांच्या हृदयावर राज्य करणारा बॉलीवूडचा भाईजान सलमान खान हा ५९ वर्षांचा झाला आहे. परंतू त्याने अद्यापही लग्न केलेले नाही. त्याचे अनेक चाहते विचारत असतात की सलमान लग्न कधी करणार आहे. आता त्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यात तो तलाक आणि एलिमनी अमाऊंटवर बोलताना दिसत आहेत. व्हिडिओत ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’चा ऑन एअर होण्याआधीच व्हायरल झाला आहे.

वास्तविक, २१ जून पासून नेटफ्लिक्सवर कॉमेडियन कपिल शर्मा ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’ चा तिसरा सिझन सुरु होत आहे. सलमान खान पहिले गेस्ट असणार आहे.सलमानचे फॅन या एपिसोडसाठी खूपच एक्साईट झाले आहेत. कारण सलमान खान जितक्या वेळा कपिल शोच्या कार्यक्रमात आला तेव्हा त्यांनी मस्करी आणि मस्तीचे अनेक किस्से सांगून सर्वांना लोटपोट हसवले आहे.

येथे पाहा सलमान खानचा व्हिडीओ –

शोमध्ये सलमानचा जो व्हिडीओ समोर आला आहे. त्यात तो तलाक आणि एलिमनी अमाऊंटवर हसत हसत बोलताना दिसत आहे.’छोटीशा गैरसमजातून तलाक होऊन जातो. आणि मग चला तलाक तर झाला आता ती अर्धे पैसे ही घेवून जाते.’ सलमानचे वाक्य ऐकून कपिल शर्मा आणि अर्चना पूरण सिंह यांच्या सह ऑडियन्समध्ये बसलेले सर्वच लोक हसु लागले.

कपिल शर्माच्या शोमध्ये नवजोत सिंह सिद्धू

पॉलिटिशियन आणि माजी क्रिकेटर नवजोत सिंह सिद्धू आधी कपिलच्या शोमध्ये जज उपस्थित होते. साल, २०१९ मध्ये या शोपासून दूर झाले. आता शोमध्ये नंतर सिद्धूची जागा अर्चना पूरण सिंह यांनी घेतली.आता सिद्धू पुन्हा एकदा या शोमध्ये वापसी करीत आहे.आता शोमध्ये एक नाही तर दोन जज असणार आहे. अर्चना पूरण सिंह आणि नवज्योत सिद्धू दोघेही जज म्हणून असणार आहेत.