शाहरुख-अमिताभ नव्हे, बॉलीवुडच्या या कपलकडे आहे सर्वात महागडे घर?, पाहा किंमत किती आणि फोटो
घर घेणे हे प्रत्येकाचे स्वप्न असते. बॉलीवूडचे चमचमते तारे देखील येथे घराला आधी प्राधान्य देतात. मुंबईतील समुद्र किनारी बंगला असला तरच तो सुपरस्टार असे पूर्वी म्हटले जायचे. आता बॉलीवूडच्या दाम्पत्याच्या महागड्या घराची चर्चा सुरु आहे.

बॉलीवुडमध्ये किंग खान शाहरुख याचा “मन्नत” बंगला आणि बिग बी अमिताभ बच्चन यांचा “जलसा” बंगला नेहमीच चर्चेत असतो. परंतू या दोघा दिग्गजांना मागे टाकत आता बॉलीवूडच्या एका स्टार कपलने सर्वात महागडे घर त्यांच्या नावे केले आहे. खास बाब म्हणजे या आलिशान बंगल्याचे रजिस्ट्रेशन त्यांच्या अवघ्या दोन वर्षाच्या मुलीच्या नावाने होणार आहे.
कोणाचे हे महल सारखे घर
आपण चर्चा करीत आहोत रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्या घराची. मुंबईतील पाली हिल सारख्या उच्चभ्रू परिसरात एक ग्रँड बंगला बांधलेला आहे. या बंगल्याचे नाव कृष्णा राज बंगला असे ठेवले आहे. हा बंगला रणबीर यांची आजी कृष्णा राज कूपर यांच्या स्मृती निमित्त बांधला जात आहे. या घराची चर्चा गेल्या काही वर्षात सुरु आहे. कारण याचे बांधकाम आणि किंमत खूपच खास आहे. आता हे घर लगबग तयार झाले आहे. हे मुंबईतील सर्वात महागडे सेलिब्रिटी होम स्टे झाला आहे.
राहा हीच्या नावाने प्रॉपर्टी!
मीडिया रिपोर्ट्स नुसार या बंगल्याची किंमत सुमारे 250 कोटी रुपये म्हटली जात आहेत. एवढेच नाही तर ही प्रॉपर्टी रणबीर-आलिया यांनी त्यांची लाडकी कन्या राहा कपूर हीच्या नावाने रजिस्टर्ड केली जाणार आहे. रिपोर्ट्सनुसार हे घर कपलने मुलीसाठी एक लीगेसी गिफ्ट म्हणून तयार होत आहे..
आतापर्यंतचा प्रवास
या घराची पायाभरणी राज कपूर यांच्या काळात झाली. त्यानंतर ही प्रॉपर्टी ऋषी कपूर आणि नीतू कपूर यांच्या वाट्याला आली. रणबीर आणि आलिया यांच्या लग्नानंतर या प्रकल्पाला पूर्ण करण्याचा विडा या दोघांनी उचलला. त्यानंतर रणबीर आणि त्याची आई नीतू येथे साईट व्हिजिटींग करुन कामावर लक्ष ठेवत होते. आता हे आलिशान घर ग्रे आणि स्काय ब्लू थीममध्ये तयार देखील झाले.यात ग्रीन बाल्कनी, मॉडर्न डिझाईन आणि एकूण सहा मजल्याच्या स्ट्रक्चरचा समावेश आहे.
मन्नत आणि जलसाहूनही महाग?
शाहरुख खानचा मन्नत सुमारे 200 कोटींचा आहे. तर अमिताभ बच्चन यांचा जलसा सुमारे 100 कोटी रुपयांचा आहे. तर रणबीर-आलिया हा नवा आशियाना तब्बल 250 कोटी रुपयांच्यावरचा आहे.अर्थात यास दुजोरा मिळालेला नाही. रणबीर आणि आलिया सध्या मुंबईच्या वास्तु अपार्टमेंटमध्ये राहातात. येथे 2022 मध्ये दोघांचा विवाह झाला. परंतू आता त्यांचे ड्रीम होम तयार होत आहे. अशी आशा आहे की संपूर्ण कुटुंब लवकरच या बंगल्यात शिफ्ट होणार आहे.
सध्या काय करतायत हे कपल्स?
रणबीर कपूर लेटेस्ट चित्रपट ‘Animal’ (2023) मध्ये दिसला होता. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चालला पण टीकाही झाली. तर आलिया भट्ट हीचे ‘Jigra’ (2024)या चित्रपटाला जास्त यश मिळाले नाही. आता दोघे एक साथ संजय लीला भंसालीची फिल्म ‘Love & War’ मध्ये दिसणार आहेत. यात विक्की कौशल देखील आहे. तसेच रणबीर कपूर हा नितेश तिवारीचा चित्रपट ‘रामायण’ मध्ये भगवान रामची भूमिका साकारणार आहे. एकूण काय ‘कृष्णा राज’ बंगला केवळ एक घर नसून संपूर्ण कपूर खानदानाचा वारसा आहे.