AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

समांथा रुथ प्रभू डेट करते दिग्दर्शकाला? पूर्व पत्नीला कळताच…

साऊथची सुपरस्टार अभिनेत्री समांथा रुथ प्रभूने नागा चैतन्यला घटस्फोट दिल्यानंतर आता एका दिग्दर्शकाला डेट करत असल्याचे म्हटले जाते. आता त्यावर दिग्दर्शकाच्या पत्नीची प्रतिक्रिया आली आहे.

समांथा रुथ प्रभू डेट करते दिग्दर्शकाला? पूर्व पत्नीला कळताच...
Samantha and RajImage Credit source: Tv9 Network
| Updated on: May 16, 2025 | 3:44 PM
Share

‘द फॅमिली मॅन’ या वेब सीरिजचे दिग्दर्शक राज निदिमोरु आणि दक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री सामंथा रुथ प्रभू यांच्या नात्याच्या चर्चा बऱ्याच काळापासून सुरू आहेत. गेल्या काही महिन्यांत दोघे अनेकदा एकत्र दिसले आहेत. काही अहवालांमध्ये असा दावा करण्यात आला आहे की राज आणि सामंथा एकत्र राहणार आहेत. मात्र, काही अहवालांनुसार, सामंथाच्या मॅनेजरने या अफवा फेटाळून लावल्या आहेत. या सर्व घडामोडी राज निदिमोरुची पूर्व पत्नी श्यामली डेला कळताच तिने प्रतिक्रिया दिली आहे.

काय म्हणाली पूर्व पत्नी?

राज निदिमोरुची पूर्व पत्नी श्यामली डेने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. तिने “मी त्या सर्वांना आशीर्वाद आणि प्रेम पाठवते जे माझ्याबद्दल विचार करतात, माझी काळजी घेतात, माझे ऐकतात, माझ्याबद्दल ऐकतात, माझ्याशी बोलतात, माझ्याबद्दल बोलतात, माझ्याबद्दल वाचतात, माझ्याबद्दल लिहितात आणि मला भेटतात” या आशयाची पोस्ट केली आहे. वाचा: मधुचंद्राच्या रात्रीची तयारी, पत्नी म्हणाली थांब आलेच; मग घेऊन आली दूध, पतीचा बदलला मूड अन्…

सामंथा आणि राज यांच्या नात्याची सुरुवात

सामंथा प्रभू आणि राज निदिमोरु यांच्या नात्याच्या अफवा दोन वर्षांपूर्वी सुरू झाल्या आहेत. त्यावेळी राज पत्नी श्यामली डे पासून विभक्त झाला होता. टाइम्स ऑफ इंडियाच्या अहवालानुसार, या प्रकरणावर एका जवळच्या सूत्राने सांगितले की, “श्यामली डे यांनी जे काही लिहिले आहे त्याचा राज आणि सामंथाशी काहीही संबंध नाही. त्या राज यांच्यापासून विभक्त झाल्या आहेत. खरे तर, सामंथा कधीही विवाहित पुरुषाशी नाते ठेवणार नाही. तिने राज यांच्याशी नाते तेव्हाच सुरू केले जेव्हा ते आपल्या पत्नीपासून वेगळे झाले आणि एकटे राहत होते.”

राज निदिमोरु यांना मुले आहेत?

याशिवाय, इतर चुकीच्या बातम्यांचे स्पष्टीकरण देताना सूत्राने सांगितले, “अहवालांमध्ये असा दावा केला जात आहे की राज आणि त्याच्या पूर्व पत्नीला एक मुलगी आहे. हे पूर्णपणे खोटे आहे. राजला त्याच्या पूर्व पत्नीपासून कोणतेही अपत्य नाही. आतापर्यंत, सामंथाने तिच्या नात्याबाबत मौन बाळगले आहे कारण तिला याबाबत बोलायचे नाही.”

राज निदिमोरु आणि सामंथा यांच्या डेटिंगच्या अफवा

सामंथा रुथ प्रभू आणि राज निदिमोरु यांच्या नात्याच्या अफवा वेब सीरिजच्या वेळी सतत एकत्र दिसल्यामुळे पसरल्या आहेत. राजने डीकेसोबत मिळून पहिल्यांदा ‘द फॅमिली मॅन 2’ साठी सामंथासोबत काम केले. त्यानंतर सामंथाने पुन्हा राज आणि डीकेसोबत ‘सिटाडेल: हनी बनी’ या सीरिजमध्ये वरुण धवनसोबत काम केले. आता ती राज आणि डीकेच्या आगामी सीरिज ‘रक्त ब्रह्मांड’मध्ये आदित्य रॉय कपूरसोबत दिसणार आहे.

कांद्याची आवक घटली; दरात मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा
कांद्याची आवक घटली; दरात मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा.
मुंबईची हवा झाली खराब! श्वास घेणेही कठीण, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर
मुंबईची हवा झाली खराब! श्वास घेणेही कठीण, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर.
प्रश्नचिन्ह निर्माण होईल असं...; वडेट्टीवारांचं मोठं विधान
प्रश्नचिन्ह निर्माण होईल असं...; वडेट्टीवारांचं मोठं विधान.
शिवसेना-संघाची विचारसरणी मिळतीजुळती! शिंदेंच्या विधानाची चर्चा
शिवसेना-संघाची विचारसरणी मिळतीजुळती! शिंदेंच्या विधानाची चर्चा.
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक.
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:.
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज.
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा.
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई.
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल.