AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Samantha Ruth Prabhu अपघातात जखमी; अभिनेत्रीचे फोटो आले समोर

प्रसिद्ध अभिनेत्री समंथा रुथ प्रभू हिच्या अपघाताची सर्वत्र चर्चा; खुद्द अभिनेत्री फोटो शेअर करत म्हणाली..., चाहत्यांकडून चिंता व्यक्त...

Samantha Ruth Prabhu अपघातात जखमी; अभिनेत्रीचे फोटो आले समोर
SamanthaImage Credit source: Instagram
| Updated on: Feb 28, 2023 | 4:30 PM
Share

Samantha Ruth Prabhu : टॉलिवूडसोबतच बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री समंथा रुथ प्रभू (Samantha Ruth Prabhu) हिने आपल्या सौंदर्याने आणि अभिनयाने चाहत्यांच्या मनात घर केलं आहे. सध्या अभिनेत्री अमेरिकन सीरीज सिटाडेल (Citadel) च्या हिंदी अडॅप्टेशनमध्ये व्यस्त आहे. सध्या सीरिजची शुटिंग सुरु आहे. अशात एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार समंथा सेटवर जखमी झाली आहे. या घटनेची माहिती खुद्द अभिनेत्रीने इन्स्टाग्राम स्टोरीच्या माध्यमातून दिली आहे. सध्या सर्वत्र अभिनेत्रीची चर्चा आहे.

समंथा कायम सोशल मीडियावर सक्रिय असते. अभिनेत्री कायम तिच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्याची माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे. आता अभिनेत्रीने एक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये समंथाच्या हातावर जखमा असल्याचं दिसत आहे. (samantha ruth prabhu web series)

समंथाने एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये तिने स्वतःचे दोन्ही हात दाखवले आहेत. फोटोमध्ये अभिनेत्रीच्या हाताला दुखापत झाल्याचं दिसून येत आहे. फोटो शेअर करत समंथाने कॅप्शनमध्ये ‘ऍक्शन का भत्ता…’ असं लिहिलं आहे. अभिनेत्रीटच्या कॅप्शनवरुन स्पष्ट होत आहे की, तिला शुटिंग दरम्यान दुखापत झाली आहे. सध्या सर्वत्र अभिनेत्रीच्या पोस्टची चर्चा आहे. (samantha ruth prabhu net worth)

Samantha Ruth Prabhu Story

समंथाच्या आगामी प्रोजेक्टबद्दल सांगायचं झालं तर, सिटाडेल सीरिजचे ऑरिजनल निर्माता रुसो ब्रदर्स आहेत. ज्यामध्ये अभिनेता रिचर्ड मॅडेन, प्रियंका चोप्रा आणि स्टेनली टुस्सी यांसारखे कलाकार मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. नुकताच प्रियांकाने सोशल मीडियावर सीरिजचा फर्स्ट लूक देखील शेअर केला.

तर सीरिजच्या हिंदी अडॅप्टेशनबद्दल सांगायचं झालं तर, हिंदीमध्ये अभिनेत्री समंथा हिच्यासोबत अभिनेता वरुण धवन महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. ही एक स्पाय थ्रिलर सीरिद आहे, त्यामुळे सामंथा आणि वरुण दोघेही अॅक्शन अवतारात दिसणार आहेत. तर दुसरीकडे समंथा ‘शाकुंतलम’ सिनेमाच्या प्रदर्शनासाठी देखील सज्ज झाली आहे. शिवाय समंथा हिचा ‘कुशी’ सिनेमा देखील लवकरच प्रदर्शित होणार आहे.

समंथाने तिच्या करियरची सुरुवात तेलूगू ‘ये माया चेसावे’ (Ye Maaya Chesave) सिनेमाच्या माध्यमातून केली. त्यानंतर अभिनेत्रीने कधीही मागे वळून पाहिलं नाही. टॉलिवूडनंतर अभिनेत्री बॉलिवूडमध्ये स्वतःचं ल वर्चस्व प्रस्थापित केलं. ‘यशोदा’ सिनेमाच्या माध्यमातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. सिनेमाने बॉक्स ऑफिसवर जवळपास ४० कोटी रुपयांपर्यंत मजल मारली.

कल्याण-डोंबिवलीत जागावाटपावरून महायुतीत तणाव; तातडीची बैठक
कल्याण-डोंबिवलीत जागावाटपावरून महायुतीत तणाव; तातडीची बैठक.
बारामतीकरांनी बरेच चिमटे काढले; अजितदादांचा मंचावरून उपरोधिक टोला
बारामतीकरांनी बरेच चिमटे काढले; अजितदादांचा मंचावरून उपरोधिक टोला.
गौतम अदानी माझे मोठे भाऊ! सुप्रिया सुळेंचं वक्तव्य
गौतम अदानी माझे मोठे भाऊ! सुप्रिया सुळेंचं वक्तव्य.
शरद पवार माझे मार्गदर्शक; गौतम अदानींकडून पवारांचं कौतुक
शरद पवार माझे मार्गदर्शक; गौतम अदानींकडून पवारांचं कौतुक.
युत्या होतात तुटतात; मुंबई कुणी हिसकावू शकले नाही - उद्धव ठाकरे
युत्या होतात तुटतात; मुंबई कुणी हिसकावू शकले नाही - उद्धव ठाकरे.
आमचं स्वप्न पूर्ण होणार! शिरसाटांनी व्यक्त केला विश्वास
आमचं स्वप्न पूर्ण होणार! शिरसाटांनी व्यक्त केला विश्वास.
वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसमध्ये 62 जागांवर शिक्कामोर्तब!
वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसमध्ये 62 जागांवर शिक्कामोर्तब!.
काका पुतण्या एकाच मंचावर! शरद पवार-अजित पवारांमध्ये चर्चा
काका पुतण्या एकाच मंचावर! शरद पवार-अजित पवारांमध्ये चर्चा.
अदानींच्या हस्ते शरद पवार AI सेंटरचे उद्घाटन!
अदानींच्या हस्ते शरद पवार AI सेंटरचे उद्घाटन!.
मुंबईत फक्त ठाकरे ब्रँडच चालेल! अविनाश जाधव यांनी व्यक्त केला विश्वास
मुंबईत फक्त ठाकरे ब्रँडच चालेल! अविनाश जाधव यांनी व्यक्त केला विश्वास.