AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Samantha | अभ्यासात खूपच हुशार होती समंथा; दहावीचा रिपोर्ट कार्ड पाहून नेटकरी अवाक्!

यावर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. 'आमची सॅम ऑलराऊंडर आहे', असं एकाने लिहिलंय. तर 'तू अभिनेत्रीपेक्षा शिक्षणतज्ज्ञ व्हायला पाहिजे होतंस', असं दुसऱ्या युजरने म्हटलंय.

Samantha | अभ्यासात खूपच हुशार होती समंथा; दहावीचा रिपोर्ट कार्ड पाहून नेटकरी अवाक्!
Samantha Ruth Prabhu Image Credit source: Twitter
| Updated on: Apr 26, 2023 | 12:30 PM
Share

हैदराबाद : दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत आपल्या दमदार अभिनयाची छाप सोडल्यानंतर समंथा रुथ प्रभूने ‘द फॅमिली मॅन’ या वेब सीरिजमधून प्रेक्षकांची मनं जिंकली. समंथा ही साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक आहे. ‘पुष्पा’मधील तिचं ‘ऊ अंटावा’ हे गाणं तुफान गाजलं. आजही पार्ट्यांमध्ये हे गाणं आवर्जून वाजवलं जातं. आता सोशल मीडियावर समंथाच्या शिक्षणाची चर्चा होत आहे. समंथा अभिनयात प्रतिभावान तर आहेच, मात्र ती शालेय शिक्षणातही हुशार होती. तिच्या दहावीचा रिपोर्ट कार्ड सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या रिपोर्ट कार्डमधील समंथाला मिळालेले गुण पाहून नेटकरी तिचं कौतुक करत आहेत.

ट्विटरवर एका युजरने समंथाचा रिपोर्ट कार्ड शेअर केला आहे. या रिपोर्ट कार्डवरून सहज स्पष्ट होतंय की ती उत्तम विद्यार्थिनी होती. समंथाला सर्व विषयांमध्ये 80 पेक्षा जास्त गुण मिळाले आहेत. गणितात तिला 100 गुण तर भूगोल आणि बॉटनी हे विषय सोडून इतर सर्व विषयांमध्ये 90 गुण मिळाले आहेत. भौतिकशास्त्रात तिने 95 आणि इतिहासात 91 गुण मिळवले. या रिपोर्ट कार्डवर शिक्षकाने समंथाचं कौतुकसुद्धा केलं आहे.

समंथाची प्रतिक्रिया

या व्हायरल रिपोर्ट कार्डवर आता समंथाची प्रतिक्रिया समोर आली आहे. ‘हाहाहाहा… हे पुन्हा व्हायरल होऊ लागलंय’, असं तिने ट्विट केलंय. यावर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. ‘आमची सॅम ऑलराऊंडर आहे’, असं एकाने लिहिलंय. तर ‘तू अभिनेत्रीपेक्षा शिक्षणतज्ज्ञ व्हायला पाहिजे होतंस’, असं दुसऱ्या युजरने म्हटलंय.

समंथाचा शाकुंतलम हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. या चित्रपटाला प्रेक्षक – समिक्षकांकडून संमिश्र प्रतिसाद मिळाला. तेलुगू, हिंदी, तमिळ, मल्याळम आणि कन्नड अशा पाच भाषांमध्ये हा चित्रपट प्रदर्शित झाला. मात्र पहिल्या दिवशी समंथाच्या चित्रपटाने फक्त 5 कोटी रुपयांचा गल्ला जमवला. शाकुंतलम या चित्रपटात समंथाने शकुंतलाची भूमिका साकारली आहे. शकुंतला ही मेनका आणि विश्वमित्रा यांची कन्या असते. या चित्रपटात मोहन बाबू, प्रकाश राज, अदिती बालन, गौतमी, अनन्या नागल्ला, कबीर दुहन सिंह यांच्याही भूमिका आहेत. विशेष म्हणजे अभिनेता अल्लू अर्जुनची मुलगी अल्लू आऱ्हा या चित्रपटातून तेलुगू चित्रपटसृष्टीत पदार्पण करतेय.

देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक.
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित.
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?.
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया.
भाजप कार्यकर्त्यांचा विरोध तरीही मनसेचे दिनकर पाटील भाजपात अन्..
भाजप कार्यकर्त्यांचा विरोध तरीही मनसेचे दिनकर पाटील भाजपात अन्...
कोणतीही तडजोड नाही, वंचितकडून काँग्रेसला मोठा प्रस्ताव अन् राज्यात...
कोणतीही तडजोड नाही, वंचितकडून काँग्रेसला मोठा प्रस्ताव अन् राज्यात....
जगताप यांच्या काँग्रेस प्रवेशावरून पुणे शहर काँग्रेसमध्ये नाराजी?
जगताप यांच्या काँग्रेस प्रवेशावरून पुणे शहर काँग्रेसमध्ये नाराजी?.
भाजपचा एकाचवेळी काँग्रेस, ठाकरे सेनेला जोर का धक्का! BJPची ताकद वाढणार
भाजपचा एकाचवेळी काँग्रेस, ठाकरे सेनेला जोर का धक्का! BJPची ताकद वाढणार.
..तो भी पिटोगे, मराठी भाषेच्या अपमानावरून संदीप देशपांडेंचा थेट इशारा
..तो भी पिटोगे, मराठी भाषेच्या अपमानावरून संदीप देशपांडेंचा थेट इशारा.
ठाकरेंच्या सेनेतून विनायक पांडे, यतिन वाघ यांची हकालपट्टी, राऊतांनी...
ठाकरेंच्या सेनेतून विनायक पांडे, यतिन वाघ यांची हकालपट्टी, राऊतांनी....