AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Samantha: अभिनेत्रीसोबत नाग चैतन्यच्या अफेअरच्या चर्चांवर अखेर समंथाने सोडलं मौन; म्हणाली..

आता नाग चैतन्य अभिनेत्री सोभिता धुलिपालाला (Sobhita Dhulipala) डेट करत असल्याच्या चर्चांना उधाण आलंय. त्यामुळे त्याची प्रतिमा मलिन करण्यासाठी समंथाच्या पीआर टीमकडून या अफवा पसरवल्या जात असल्याचं म्हटलं जातंय. या सर्व चर्चांवर अखेर समंथाने मौन सोडलं आहे.

Samantha: अभिनेत्रीसोबत नाग चैतन्यच्या अफेअरच्या चर्चांवर अखेर समंथाने सोडलं मौन; म्हणाली..
Naga Chaitanya, Samantha, SobhitaImage Credit source: Instagram
| Edited By: | Updated on: Jun 21, 2022 | 12:08 PM
Share

अभिनेत्री समंथा रुथ प्रभूचा (Samantha Ruth Prabhu) पूर्व पती आणि अभिनेता नाग चैतन्य (Naga Chaitanya) सध्या त्याच्या खासगी आयुष्यामुळे सोशल मीडियावर चर्चेत आहे. समंथा आणि नाग चैतन्यने गेल्या वर्षी एकमेकांना घटस्फोट दिला. त्यानंतर समंथावर विवाहबाह्य संबंध असल्याचे आरोप झाले. नाग चैतन्यच्या पीआर टीमनेच अशी अफवा पसरवली असेल, अशी चर्चा त्यावेळी होती. आता नाग चैतन्य अभिनेत्री सोभिता धुलिपालाला (Sobhita Dhulipala) डेट करत असल्याच्या चर्चांना उधाण आलंय. त्यामुळे त्याची प्रतिमा मलिन करण्यासाठी समंथाच्या पीआर टीमकडून या अफवा पसरवल्या जात असल्याचं म्हटलं जातंय. या सर्व चर्चांवर अखेर समंथाने मौन सोडलं आहे. नाग चैतन्यच्या डेटिंगच्या वृत्तावर तिने ट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे.

समंथाचं ट्विट-

‘मुलीविषयी अफवा असल्यास- त्या खऱ्या असतील मुलाविषयी अफवा असल्यास- त्या मुलीनेच पसरवल्या असतील थोडीतरी बुद्धिमत्ता वाढवा जे दोघं जण यात सहभागी होते ते कधीच त्यांच्या आयुष्यात पुढे गेले आहेत. तुम्हीसुद्धा यातून पुढे गेलं पाहिजे. तुमच्या कामावर, कुटुंबीयांवर लक्ष केंद्रीत करा. आयुष्यात तुम्हीसुद्धा पुढे व्हा,’ असं ट्विट समंथाने केलंय. समंथाच्या पीआर टीमने अफवा पसरवल्याच्या वृत्ताची लिंक शेअर करत तिने हे ट्विट केलंय.

नाग चैतन्य-सोभिता धुलिपाला यांच्या डेटिंगच्या चर्चा

नाग चैतन्यच्या हैदराबादमधील घराजवळ अभिनेत्री सोभिता धुलिपाला आणि त्याला एकत्र पाहिलं गेलं. यावेळी दोघंही एकमेकांसोबत अत्यंत कम्फर्टेबल दिसत होते आणि नाग चैतन्य तिला आपलं नवीन घर दाखवत होता, असं वृत्त ‘पिंकविला’ने दिलंय. इतकंच नव्हे तर घराची पाहणी केल्यानंतर दोघं एकाच कारमधून परत गेले. सोभिताचा ‘मेजर’ हा चित्रपट काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झाला. या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान ती ज्या ज्या हॉटेलमध्ये थांबली, तिथे अनेकदा नाग चैतन्यला पाहिलं गेल्याचंही म्हटलं जातंय. नुकताच सोभिताने आपला वाढदिवसुसुद्धा हैदराबादमध्ये नाग चैतन्यसोबत साजरा केल्याचं कळतंय. याबद्दल अद्याप सोभिता किंवा नाग चैतन्यने कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. सोभिता ही तेलुगू अभिनेत्री असून तिने मल्याळम आणि हिंदी चित्रपटातही काम केलंय.

चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.