AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Samantha Ruth Prabhu हिचा ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्यासोबत रोमान्स; Video तुफान व्हायरल

समंथा रुथ प्रभू हिचा 'या' प्रसिद्ध अभिनेत्यासोबत रोमँटिक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल, सर्वत्र चर्चांना उधाण... सध्या फक्त आणि फक्त समंथा रुथ प्रभू हिच्या व्हिडीओची चर्चा... व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्ही म्हणाल...

Samantha Ruth Prabhu हिचा 'या' प्रसिद्ध अभिनेत्यासोबत रोमान्स; Video तुफान व्हायरल
| Updated on: Aug 16, 2023 | 4:37 PM
Share

मुंबई | 16 ऑगस्ट 2023 : अभिनेत्री समंथा रुथ प्रभू कायम तिच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे तुफान चर्चेत असते. पण आता अभिनेत्री एका व्हिडीओमुळे चर्चेत आली आहे. सध्या अभिनेत्रीचा एका व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये अभिनेत्री प्रसिद्ध अभिनेता विजय देवरकोंडा (Vijay Deverakonda) यांच्यासोबत रोमाँटिक डान्स करताना दिसत आहे. सध्या समंथा आणि विजय आगामी ‘खुशी’ (Khushi) सिनेमामुळे चर्चेत आहे. सिनेमाच्या प्रदर्शनाची घोषणा झाल्यानंतर चाहते देखील सिनेमाच्या प्रतीक्षेत आहेत. सिनेमातील विजय आणि समंथा यांच्या जोडीला देखील चाहत्यांनी डोक्यावर घेतंल आहे.

नुकताच, सिनेमाचं गाणं प्रदर्शित करण्यात आलं आहे. गाण्याला देखील प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. खुशी सिनेमाच्या निर्मात्यांनी मंगळवारी हैदराबादमध्ये एका कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. ज्यामध्ये विजय आणि सामंथा दमदार यांनी परफॉर्म केलं. विजय आणि समांथाच्या डान्सचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. चाहते देखील दोघांच्या व्हिडीओ लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत.

व्हिडीओमध्ये दिसत असलेली समंथा आणि विजय यांची केमिस्ट्री चाहत्यांना प्रचंड आवडत आहे. दोघांच्या डान्सचा व्हिडीओ पाहिल्यानंतर चाहते सिनेमाच्या प्रतीक्षेत आहेत. व्हिडीओ समंथा प्रचंड सुंदर दिसत आहे. सध्या सर्वत्र अभिनेत्रीच्या सौंदर्याची आणि वियज याच्या डान्सची चर्चा रंगत आहे.

विजय आणि समंथा यांच्या ‘खुशी’ सिनेमाबद्दल सांगायचं झालं तर, सिनेमा एक रोमाँटिक ड्रामा आहे. सिनेमाच्या माध्यमातून समंथा आणि विजय दुसऱ्यांदा एकत्र स्क्रिन शेअर करताना दिसणार आहेत. सिनेमाचं शुटिंग काश्मीर आणि आंध्र प्रदेशमध्ये झालं आहे. लग्नानंतर आपलं प्रेम वाचवण्यासाठी अनेक अडचणींना तोंड देणाऱ्या सुखी जोडप्याच्या आयु्ष्या भोवती सिनेमाची कथा फिरत आहे.

विजय आणि सामंथाचा ‘खुशी’ सिनेमा 1 सप्टेंबर रोजी चित्रपतगृहात प्रदर्शित होणार आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन दिग्दर्शक शिव निर्वाण यांनी केलं आहे. समंथा, विजय स्टारर ‘खुशी’ सिनेमा तेलुगू, तमिळ आणि हिंदी भाषेत प्रदर्शित होणार आहे.

समंथा सोशल मीडियावर देखील कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते.

Follow Us
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद...
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद बापट यांची मोठी मोहीम
मुंबई दौऱ्यासाठी मनोज जरांगे पाटील सज्ज! अखेर तारीख ठरली
Maratha Reservation | मुंबई दौऱ्यासाठी मनोज जरांगे पाटील सज्ज! 15 सप्टेंबर तारीख जाहीर; आझाद मैदानावर आमरण उपोषण करणार
विनायक राऊतांची मनोज जरांगे पाटलांच्या प्रकृतीबाबत चिंता, सरकारला मोठी
विनायक राऊतांची मनोज जरांगे पाटलांच्या प्रकृतीबाबत चिंता, सरकारकडे मोठी मागणी
आम्ही आडमुठे नाही, सरकार आम्हाला फसवतंय! मनोज जरांगेंचा थेट आरोप
Manoj Jarange | आम्ही आडमुठे नाही, सरकार आम्हाला फसवतंय! मनोज जरांगेंचा थेट आरोप
मनोज जरांगे पाटलांचा सरकारवर गंभीर आरोप, ईडी नोटीसांवरून...
मनोज जरांगे पाटलांचा सरकारवर गंभीर आरोप, ईडी नोटीसांवरून...
गणेशोत्सवात विघ्न नको, सर्वसामान्यांना... तायवाडेंचा जरांगेंना संदेश
Babanrao Taywade | गणेशोत्सवात विघ्न नको, सर्वसामान्यांना त्रास होऊ नये! बबनराव तायवाडेंचा जरांगेंना थेट संदेश; ओबीसी आरक्षणावरही मोठं वक्तव्य
मनोज जरांगे आरक्षणाबाबत बोलताना भावुक; अश्रू अनावर
Manoj Jarange Hunger Strike | मनोज जरांगे आरक्षणाबाबत बोलताना भावुक; अश्रू अनावर
गणेशोत्सवासाठी कोकण जाणाऱ्या भाविकांसाठी CSMT वरून गणपती स्पेशल ट्रेन
गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या भाविकांसाठी CSMT वरून गणपती स्पेशल ट्रेन रवाना
पोलिसांनी अडवलंच तर... मुंबईत होणाऱ्या निर्णायक मराठा आंदोलनाबाबत...
पोलिसांनी अडवलंच तर...  मुंबईत होणाऱ्या मराठा आंदोलनाबाबत मनोज जरांगेंचा मोठा इशारा
गणेशोत्सवाआधी मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी! कोकणवासीयांचा...
Ganeshotsav 2026 | गणेशोत्सवाआधी मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी! माणगावात 7-8 किमी वाहनांच्या रांगा; कोकणवासीयांचा प्रवास रखडला