AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘खाशाबा’ चित्रपटात संभाजीराजे छत्रपतींची भूमिका; टीझर पाहून नेटकऱ्यांनी लगेच ओळखलं

नागराज मंजुळे यांच्या 'खाशाबा' या चित्रपटात माजी खासदारांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारली आहे. चित्रपटाच्या टीझरमध्ये अवघ्या काही सेकंदांसाठी त्यांच्या भूमिकेची झलक पहायला मिळत आहे. याविषयी त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहिली आहे.

'खाशाबा' चित्रपटात संभाजीराजे छत्रपतींची भूमिका; टीझर पाहून नेटकऱ्यांनी लगेच ओळखलं
'खाशाबा' टीझरमधील दृश्यImage Credit source: Youtube
| Updated on: Jul 05, 2026 | 12:00 PM
Share

नागराज मंजुळे यांच्या ‘खाशाबा’ या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित होताच सर्वत्र त्याचीच जोरदार चर्चा होऊ लागली. स्वतंत्र भारताला पहिलं वैयक्तिक ऑलिम्पिक पदक मिळवून देणारे महाराष्ट्राचे सुपुत्र आणि दिग्गज कुस्तीपटू खाशाबा दादासाहेब जाधव यांच्या प्रेरणादायी प्रवासावर हा चित्रपट आधारित आहे. ‘खाशाबा’च्या टीझरमध्ये जरी मुख्य कलाकाराचा चेहरा दाखवण्यात आला नसला तरी इतर सर्व कलाकारांची झलक पहायला मिळाली. नागराज मंजुळे, जितेंद्र जोशी, महेश मांजरेकर, गार्गी कुलकर्णी, गिरीश कुलकर्णी, छाया कदम, पहिलवाल संग्राम सिंह यांनी त्यात महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. त्यासोबतच या टीझरमधील कोल्हापुरातील एका नामांकित व्यक्तिमत्त्वानेही सर्वांचं लक्ष वेधलं आहे. अवघ्या काही सेकंदांसाठी झळकलेल्या या भूमिकेची सोशल मीडियावर चर्चा होत आहे.

माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका साकारली आहे. याबद्दलची माहिती त्यांनी खुद्द सोशल मीडियाद्वारे दिली आहे. माझ्या वैयक्तिक आयुष्यात माझ्या हृदयाच्या अत्यंत जवळ असणाऱ्या ऐतिहासिक व्यक्तिमत्वाची भूमिका साकारण्याची संधी मला मिळाली, असं त्यांनी या पोस्टमध्ये म्हटलंय. त्याचसोबत त्यांनी इन्स्टाग्रामवर हा टीझर शेअर केला आहे.

पहा टीझर-

संभाजीराजे छत्रपती यांची पोस्ट-

”खाशाबा’ या चित्रपटात माझ्या हृदयाच्या अत्यंत जवळ असणाऱ्या पूजनीय व्यक्तिमत्त्वाची भूमिका साकारण्याची मला संधी मिळाली. नुकताच या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला असून 1 जानेवारी 2027 रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. भारताला ऑलिम्पिकमध्ये पहिलं पदक मिळवून देणाऱ्या ऑलिम्पिकवीर पैलवान खाशाबा जाधव यांच्या संघर्षमयी जीवनचरित्रावरील हा चित्रपट असून यामध्ये माझ्या वैयक्तिक आयुष्यातदेखील माझ्या हृदयाच्या अत्यंत जवळ असणाऱ्या ऐतिहासिक व्यक्तीमत्वाची भूमिका साकारण्याची संधी मला मिळाली, याचं मला अत्यंत समाधान आहे. सर्वांनी हा टीझर जास्तीत जास्त प्रसारित करावा आणि आपल्या देशाची मान अभिमानाने उंचावणाऱ्या पैलवान खाशाबा जाधव यांच्या कार्याची माहिती घेण्यासाठी हा चित्रपट अवश्य चित्रपटगृहात जाऊन पाहावा,’ असं आवाहन त्यांनी केलं आहे.

जिओ स्टुडिओज आणि आटपाट प्रॉडक्शन्स प्रस्तुत ‘खाशाबा’ या चित्रपटाची निर्मिती ज्योती देशपांडे आणि गार्गी कुलकर्णी यांनी केली असून दिग्दर्शन नागराज मंजुळे यांचं आहे. ‘खाशाबा’ हा चित्रपट 1 जानेवारी 2027 रोजी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होण्यास सज्ज आहे.

Follow Us
ठाकरे बंधूंवरील गुन्ह्यांच्या निषेधार्थ तेजस ठाकरेंच्या नेतृत्वाखाली..
ठाकरे बंधूंवरील गुन्ह्यांच्या निषेधार्थ तेजस ठाकरेंच्या नेतृत्वाखाली दादरमध्ये मूकमोर्चा; शिवाजी पार्करही आंदोलन!
उदय सामंतांचा MPSC आयुक्तांच्या राजीनाम्यावर मोठा खुलासा; महायुतीतील..
उदय सामंतांचा MPSC आयुक्तांच्या राजीनाम्यावर मोठा खुलासा; महायुतीतील समन्वयावरही भाष्य!
पक्षचिन्ह गैरसमजामुळे लाखो मत गमावले, ठाकरे गटातील नेत्याचा आरोप
धनुष्यबाणाच्या गैरसमजामुळे दीड लाख मतांचा फटका अन् पक्ष... ठाकरे गटातील नेत्याचा अजब आरोप
सर्वोच्च न्यायालयाच्या दिशेने इंडिया आघाडीचा मोर्चा; राहुल गांधी...
सर्वोच्च न्यायालयाच्या दिशेने इंडिया आघाडीचा मोर्चा; राहुल गांधी, प्रियंका गांधी मैदानात, ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात याचिका दाखल!
मोठी बातमी! ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी मनसे आक्रमक;
मोठी बातमी! ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी मनसे आक्रमक; राज्यभर स्वाक्षरी मोहीम, नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
अखिलेश यादवांचा भाजप आणि निवडणूक आयोगावर गंभीर आरोप; ज्ञानेश कुमार...
अखिलेश यादवांचा भाजप आणि निवडणूक आयोगावर गंभीर आरोप; ज्ञानेश कुमार यांना हटवण्याची मागणी!
राष्ट्रपतींनी पुरावे मागितले, राहुल गांधी देऊ शकले नाही, अन् आता...
Anurag Thakur on Rahul Gandhi | राष्ट्रपतींनी पुरावे मागितले, राहुल गांधी देऊ शकले नाही, अन् आता... भाजप मंत्र्याने थेटच सांगितलं
पाकिस्तानातील हिंगलाज मातेचं महाराष्ट्रात स्वयंभू मंदिर! नाशिकच्या...
पाकिस्तानातील हिंगलाज मातेचं महाराष्ट्रात स्वयंभू मंदिर! नाशिकच्या या शक्तिस्थळाचा इतिहास थक्क करणारा
त्यांच्यावर सर्वांना विश्वास...MPSC कारभारात तुकाराम मुंढेंची नियुक्ती
त्यांच्यावर सर्वांनाच विश्वास आहे, मात्र... एमपीएससी कारभारात तुकाराम मुंढेंची नियुक्ती होताच काँग्रेस नेत्याचे विधान
सर्वोच्च न्यायालयाच्या दिशेने इंडिया आघाडीचा मोर्चा; पोलिसांची परवानगी
सर्वोच्च न्यायालयाच्या दिशेने इंडिया आघाडीचा मोर्चा; पोलिसांची परवानगी नाकारली, तरी राहुल गांधींसह अनेक नेते सहभागी