AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sangeeta Bijlani : ‘सलमान खान लकी आहे’, संगीता बिजलानीचा ब्लॅक स्विमसूटमधील जलवा पाहून फॅन्सना आठवला भाईजान

अभिनेत्री संगीता बिजलानीचा ब्लॅक स्विमसूटमधील एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ 1980 च्या मिस युनिव्हर्स स्पर्धेचा आहे, ज्यामध्ये मिस इंडिया संगीता बिजलानीने देखील भाग घेतला होता.

Sangeeta Bijlani : ‘सलमान खान लकी आहे’, संगीता बिजलानीचा ब्लॅक स्विमसूटमधील जलवा पाहून फॅन्सना आठवला भाईजान
Image Credit source: instagram
| Updated on: Jun 03, 2023 | 11:24 AM
Share

Sangeeta Bijlani In Swimsuit : अभिनेत्री संगीता बिजलानीने (Sangeeta Bijlani) एकेकाळी आपल्या सौंदर्याने बॉलिवूडपासून क्रिकेटपर्यंत लाखोंची मनं जिंकली होती. चित्रपट आणि अभिनयापेक्षा संगीता बिजलानी तिच्या लव्ह लाईफमुळे चर्चेत होती. ती सलमान खानच्या (Salman khan) प्रेमात पडली आणि नंतर मोहम्मद अझरुद्दीनशी लग्न केले. सध्या हसीन दिलरुबा संगीता बिजलानीचा एक थ्रोबॅक व्हिडिओ व्हायरल होत आहे. काळ्या रंगाच्या स्विमसूटमध्ये दिसणारी संगीता बिजलानी पाहून चाहते घायाळ होत आहेत.

संगीता बिजलानीचा हा व्हिडिओ 1980 सालचा आहे जेव्हा अभिनेत्री मिस इंडिया झाल्यानंतर मिस युनिव्हर्स स्पर्धेत भाग घेण्यासाठी आली होती. इंटरनेटवर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये संगीता बिजलानी स्विमसूट फेरीत भारताचे प्रतिनिधित्व करत आहे. संगीता बिजलानीला काळ्या रंगाच्या स्विमसूटमध्ये फ्लॉंट करताना पाहून चाहते फिदा झाले.

हा व्हिडिओ एका फॅन पेजने शेअर केला आहे. एकीकडे चाहते संगीता बिजलानीचे कौतुक करत असताना दुसरीकडे सलमान खानची खिल्ली उडवत सलमान खान किती भाग्यवान आहे हे लिहित आहेत. अनेकांनी हा व्हिडिओ शेअरही केला आहे.

संगीता बिजलानी आणि सलमान खान यांची लव्हस्टोरी 80 च्या दशकात खूप गाजली होती. मॉडेलिंगदरम्यान दोघे एकमेकांच्या जवळ आले आणि त्यांच्यादरम्यान प्रेम फुलले. संगीता बिजलानीने 1988 मध्ये ‘कातिल’ चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. प्रत्येक ठिकाणी संगीताच्या सौंदर्याची चर्चा होऊ लागली.

सलमानसोबतचे तिचे नाते जवळपास 10 वर्षे टिकले आणि खूप चर्चेत आले. लग्नपत्रिकाही छापण्यात आल्या होत्या, मात्र सलमानची अभिनेत्री सोमी अलीसोबत जवळक वाढत होती ते पाहून संगीता बिजलानीने हे नाते तोडले. त्यानंतर संगीताने 1996 मध्ये क्रिकेटर मो. अझरुद्दीनशी लग्न केले आणि 14 वर्षांनी घटस्फोट घेतला.

View this post on Instagram

A post shared by @varindertchawla

संगीता बिजलानी आणि सलमान खान आजही चांगले मित्र आहेत. सलमान खानच्या बर्थडे पार्टीत संगीताला पाहून सल्लू मियाँचे मन आनंदाने भरून आले. त्याचबरोबर ईद पार्टीत सलमान आणि संगीता यांच्यात खास बॉन्डिंग पाहायला मिळाली.

View this post on Instagram

A post shared by @varindertchawla

दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी
दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी.
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?.
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट..
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष....
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?.
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्..
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्...
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त.
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज.
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली.
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार.