AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सानिया मिर्झा घटस्फोटानंतर पुन्हा नव्या प्रेमाच्या शोधात? म्हणाली, ‘सर्वात आधी मला…’

Sania Mirza : शोएब मलिक याच्यासोबत घटस्फोटानंतर सानिया मिर्झा पुन्हा नव्या प्रेमाच्या शोधात, घटस्फोटानंतर पहिल्यांदा केला प्रेमावर वक्तव्य..., सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त सानिया मिर्झा हिच्या वक्तव्याची चर्चा... सानिया मिर्झा खासगी आयुष्यामुळे चर्चेत...

सानिया मिर्झा घटस्फोटानंतर पुन्हा नव्या प्रेमाच्या शोधात? म्हणाली, 'सर्वात आधी मला...'
| Updated on: Jun 04, 2024 | 2:02 PM
Share

भारताची माजी टेनिसपटू सानिया मिर्झा कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. पण गेल्या काही दिवसांपासून सानिया मिर्झा खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. सानिया मिर्झा हिने 2010 मध्ये पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शोएब मलिक याच्यासोबत लग्न केलं होतं. दोघांना एक पाच वर्षांचा मुलगा देखील आहे. पण दोघांचं नातं फार काळ टिकलं नाही. अखेर दोघांनी घटस्फोटाचा निर्णय घेतला.

सानिया हिच्यासोबत घटस्फोट झाल्यानंतर शोएब मलिक याने पाकिस्तानी अभिनेत्री सना जावेद हिच्यासोबत लग्न केलं. सना हिच्यासोबत शोएब याचं तिसरं लग्न आहे. शोएब त्याच्या खासगी आयुष्यात पुढे गेला आहे. पण सानिया मात्र सिंगर मदर म्हणून आयुष्य जगत आहे.

नुकताच, सानिया हिने देखील नव्या प्रेमाबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. सानिया हिने ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’ च्या येत्या एपिसोडमध्ये सानिया दिसणार आहे. शोचा प्रोमो देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. शोमध्ये सानिया हिने तिच्या रिलेशनशिपबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे.

शोमध्ये कपिल, सानिया हिला म्हणतो, एकदा शाहरुख खान म्हणाला होता की सानिया हिच्यावर बायोपिक तयार होणार असेल, तर मला तिचा लव्ह इंटरेस्ट प्ले करायला आवडेल… यावर सानिया म्हणाली, ‘सर्वात आधी तर मला लव्ह इंटरेस्ट शोधावं लागणार आहे…’ सध्या सर्वत्र सानिया हिच्या व्हिडीओची चर्चा रंगली आहे.

View this post on Instagram

A post shared by Sania Mirza (@mirzasaniar)

सानिया हिला कपिलच्या शोमध्ये पाहाण्यासाठी चाहते उत्सुक आहे. शोएब याच्यासोबत घटस्फोट झाल्यानंतर सानिया हिला फक्त भारताकडून नाहीतर, पाकिस्तानकडून देखील पाठिंबा मिळाला. पाकिस्तानातून देखील शोएब याच्या दुसऱ्या लग्नाचा विरोध करण्यात आला. शिवाय, पाकिस्तानी नागरिकांनी सना जावेद हिला देखील ट्रोल केलं.

सांगायचं झालं तर, घटस्फोटानंतर सानिया मुलासोबत राहात आहे. सानिया सोशल मीडियावर देखील कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी सानिया कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.

Follow Us
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार...
आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब
Chandrashekhar Bawankule : आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब, बावनकुळेंनी दिली महायुती बैठकीची माहिती
विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
'विद्यार्थी भीक नाही हक्क मागतायत', पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
Dharashiv | धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
निधीवरुन मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा काढला जाणार
महायुतीच्या समन्वय समितीची बैठक: निधीवरून मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा, फडणवीस-शिंदेंकडे अंतिम निर्णय
पुण्यात राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीने मांडले आदिवासींचे प्रश्न
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोर विद्यार्थीनीनं आदिवासींच्या समस्यांचा पाढा वाचला
नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
खान्देशात कानबाई विसर्जन २०२४; उत्साही सोहळा
खान्देशात कानबाई मातेचं विसर्जन: लोकसंस्कृतीचा उत्साही सोहळा