AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सानिया मिर्झाच्या मुलाने ‘या’ स्पोर्ट्समध्ये दाखवला टॅलेंट; आजीने शेअर केला व्हिडीओ

2010 मध्ये शोएब मलिकने टेनिस स्टार सानिया मिर्झाशी निकाह केला होता. लग्नाच्या आठ वर्षांनंतर सानियाने मुलाला जन्म दिला. सानिया आणि शोएब यांचा इझान हा मुलगा आता पाच वर्षांचा आहे. तर लग्नाच्या 14 वर्षांनंतर सानिया आणि शोएब विभक्त झाले आहेत.

सानिया मिर्झाच्या मुलाने 'या' स्पोर्ट्समध्ये दाखवला टॅलेंट; आजीने शेअर केला व्हिडीओ
सानिया मिर्झाच्या आईने शेअर केला व्हिडीओ Image Credit source: Instagram
| Updated on: Feb 12, 2024 | 12:23 PM
Share

मुंबई : 12 फेब्रुवारी 2024 | टेनिस स्टार सानिया मिर्झा आणि पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिक यांच्या घटस्फोटाच्या वृत्ताने सर्वांनाच मोठा धक्का बसला होता. घटस्फोटाच्या चर्चांदरम्यानच शोएबने थेट दुसऱ्या लग्नाचे फोटो पोस्ट केले होते. त्यानंतर सानियाच्या कुटुंबीयांकडून तिने शोएबला ‘खुला’ दिल्याचं स्पष्ट केलं होतं. तेव्हापासून सानियाचं खासगी आयुष्य सतत चर्चेत आहे. आता सानियाच्या आईने तिच्या नातूचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. हा व्हिडीओ क्षणार्धात सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्यावर नेटकऱ्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतोय. या व्हिडीओमध्ये सानिया आणि शोएब यांचा मुलगा इजहान हा आजीसोबत खेळताना दिसून येत आहे.

घटस्फोटानंतर मुलगा इजहान हा सध्या सानियासोबतच आहे. सानियाच्या आईकडून त्याचे विविध फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले जातात. आता नुकताच त्यांनी इजहानसोबत फुटबॉल खेळतानाचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. यामध्ये तो आजीसोबत फुटबॉल खेळतोय. याआधी टेनिस खेळतानाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. या व्हिडीओवर कमेंट करत अनेकांनी इजहानची काळजी घेण्याचं आवाहन सानियाच्या आईला केलंय.

View this post on Instagram

A post shared by Nasima Mirza (@nasimamirza)

एका पाकिस्तानी पत्रकाराने सानिया-शोएबच्या घटस्फोटाचा त्यांच्या मुलावर काय परिणाम होतोय, याबद्दलचं खळबळजनक वृत्त दिलं होतं. वडिलांच्या तिसऱ्या निकाहनंतर इजहान मानसिकदृष्ट्या खूप त्रस्त असल्याचं त्याने सांगितलं होतं. इतकंच नव्हे तर शाळेतील मित्रांकडून त्याला त्रास दिला जात असल्याचंही पत्रकाराने सांगितलं होतं. शाळेतील मित्र आणि इतर विद्यार्थी सतत इजहानला त्याच्या वडिलांच्या लग्नाविषयी प्रश्न विचारत आहेत. यामुळे तो आणखी खचला आहे. या कारणामुळे इझानला शाळेत जाण्याची इच्छा नाही. मुलाखातर अखेर सानिया त्याच्यासोबत हैदराबादला परतल्याचंही या पत्रकाराने सांगितलं होतं. सानिया आणि शोएब हे घटस्फोटापूर्वी दुबईत राहत होते.

शोएबने पाकिस्तानी अभिनेत्री सना जावेदशी निकाह केला. शोएबचा हा तिसरा तर सना जावेदचा हा दुसरा निकाह आहे. याआधी तिने गायक आणि अभिनेता उमैर जस्वालशी निकाह केला होता. सानिया मिर्झाची फसवणूक केल्याबद्दल भारत आणि पाकिस्तानातील असंख्य नेटकरी शोएबला ट्रोल केलं.

Follow Us
मराठमोळ्या अभिनेत्याच्या घरी सुरेख डेकोरेशन; सामाजिक संदेश देत केलं बा
मराठमोळ्या अभिनेत्याच्या घरी सुरेख डेकोरेशन; सामाजिक संदेश देत केलं बाप्पांचं स्वागत
विनयभंगाच्या तक्रार प्रकरणी शिंदे गटातील आमदार संजय गायकवाडांची मोठी..
विनयभंगाच्या तक्रार प्रकरणी शिंदे गटातील आमदार संजय गायकवाडांची मोठी प्रतिक्रिया; थेट म्हणाले...
देवेंद्र फडणवीस यांचा राजभाषा दिनी मातृभाषा, भारतीय भाषांच्या गौरव...
देवेंद्र फडणवीस यांचा राजभाषा दिनी मातृभाषा आणि भारतीय भाषांच्या गौरवाचा संदेश
अमित शहा, फडणवीस, शिंदे अन् सुनेत्रा पवार एकाच मंचावर; राजभाषा...
अमित शहा, फडणवीस, शिंदे अन् सुनेत्रा पवार एकाच मंचावर; वाशीत राजभाषा संमेलनाचा थाट!
अखेर दिशा सालियन मृत्यू प्रकरणात CBI FIR दाखल; संशयितांच्या यादीत...
अखेर दिशा सालियन मृत्यू प्रकरणात CBI FIR दाखल; संशयितांच्या यादीत मोठी नावे
परत येईन की नाही, माहीत नाही; मी... मनोज जरांगे अचानक असं का म्हणाले?
परत येईन की नाही, माहीत नाही; मी... मनोज जरांगे अचानक असं का म्हणाले?
Ganeshotsav 2026 : नाशिकमध्ये 27 हजार रुपये किलोचा गोल्डन मोदक चर्चेत,
Ganeshotsav 2026 : नाशिकमध्ये 27 हजार रुपये किलोचा गोल्डन मोदक चर्चेत, खास काय?
मंत्री पंकजा मुंडे यांच्या घरी बाप्पाचे आगमन, छगन भुजबळांनी घेतले अंजी
Ganpati Bappa Morya | मंत्री पंकजा मुंडे यांच्या घरी बाप्पाचे आगमन, छगन भुजबळांनी घेतले अंजीरवाडी मंडळात दर्शन
गणेश चतुर्थीच्या दिवशी संजय राऊतांची बाप्पाकडे खास मागणी; देशावरील ...
Sanjay Raut | गणेश चतुर्थीच्या दिवशी संजय राऊतांची बाप्पाकडे खास मागणी; देशावरील हुकूमशाही...
कोकणात गणेशोत्सवाचा उत्साह! महिलांनी पारंपारिकरित्या डोक्यावरून आणली..
कोकणात गणेशोत्सवाचा उत्साह! महिलांनी पारंपारिकरित्या डोक्यावरून आणली बाप्पांची मूर्ती