AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sania Mirza : खास व्यक्तीसोबत सानिया मिर्झाचे 2 आठवडे, फोटो पोस्ट करत म्हणाली…

Sania Mirza : सानिया मिर्झा गेल्या काही दिवसांपासून तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. शोएब मलिक याला घटस्फोट दिल्यानंतर सानिया स्वतःच्या अटींवर आयुष्य जगत आहे. आता देखील सानियाने काही फोटो पोस्ट करत लक्षवेधी कॅप्शन लिहिलं आहे...

Sania Mirza : खास व्यक्तीसोबत सानिया मिर्झाचे 2 आठवडे, फोटो पोस्ट करत म्हणाली...
| Updated on: Mar 05, 2024 | 11:38 AM
Share

मुंबई | 5 मार्च 2024 : भारताची प्रसिद्ध आणि लोकप्रिय टेनिसपटू सानिया मिर्झा गेल्या काही दिवसांपासून तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिक याला घटस्फोट दिल्यानंतर सानिया स्वतःच्या अटींवर आयुष्य जगत आहे. घटस्फोटानंतर सानिया सोशल मीडियावर अधिक सक्रिय आहे. सानिया सतत इन्स्टाग्रामवर फोटो पोस्ट करत चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत आहे. आता देखील सानियाने काही फोटो पोस्ट केले आहेत. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त सानिया हिच्या सोशल मीडिया पोस्टची चर्चा…

सानिया मिर्झा हिच्यासाठी दोन आठवडे फार आनंददायी ठरले आहेत. सानिया तिच्या जवळच्या व्यक्तींसोबत खास क्षण व्यतीत केले आहेत. सोशल मीडियावर सानिया फोटो देखील पोस्ट केले आहेत. दुबईत सानियाने तिच्या जवळच्या व्यक्तींसोबत होती. यावेळी सानियाने गायक आतिफ असलम याला परफॉर्मेन्स देखील पाहिला.

आतिफ पाकिस्तानी गायक आहे. आतिफ याची गाणी सानियाला प्रचंड आवडतात. आतिफ याच्यासोबत देखील सानियाने काही फोटो पोस्ट केले आहेत. घटस्फोटानंतर सानिया तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. पतीची साथ सुटल्यानंतर सानिया तिच्या पाच वर्षांच्या मुलासोबत आनंदाने जगत आहे.

View this post on Instagram

A post shared by Sania Mirza (@mirzasaniar)

सांगायचं झालं तर, सानिया मिर्झा हिने अनेक रेकॉर्ड मोडले आहेत, तर अनेक नवीन विक्रम रचले आहेत. आज सानियाला कोणत्याही ओळखीची गरज नाही. टेनिसविश्वात सानियाचं नाव फार मोठं आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त सानिया हिची चर्चा रंगली आहे.

सानियाच्या खासगी आयुष्याबद्दल सांगायचं झालं तर, सानियाने पाकिस्तानी क्रिकेटर शोएब याला घटस्फोट दिल्यानंतर पाच वर्षाच्या मुलासोबत आनंदाने आयुष्य जगत आहे. घटस्फोटानंतर शोएब याने तिसरं लग्न केलं. पाकिस्तानी अभिनेत्री सना जावेद हिच्यासोबत शोएबने लग्न केलं आहे. दोघांच्या लग्नाचे अनेक फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले.

घटस्फोटानंतर सानिया कायम सोशल मीडियावर सक्रिय असते. सानिया सोशल मीडियावर फोटो, व्हिडीओ पोस्ट करत असते. घटस्फोटानंतर पाकिस्तान येथील नागरिकांनी देखील सानिया हिचं समर्थन केलं तर, शोएब आणि त्याच्या तिसऱ्या पत्नीला ट्रोल केलं. शोएबच्या तिसऱ्या लग्नात त्याचे कुटुंबिय देखील उपस्थित नव्हते… अशी माहिती देखील समोर आली होती.

Follow Us
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व...
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व देशांना सहभाग घेण्याचं आवाहन
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद...
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद बापट यांची मोठी मोहीम
मुंबई दौऱ्यासाठी मनोज जरांगे पाटील सज्ज! अखेर तारीख ठरली
Maratha Reservation | मुंबई दौऱ्यासाठी मनोज जरांगे पाटील सज्ज! 15 सप्टेंबर तारीख जाहीर; आझाद मैदानावर आमरण उपोषण करणार
विनायक राऊतांची मनोज जरांगे पाटलांच्या प्रकृतीबाबत चिंता, सरकारला मोठी
विनायक राऊतांची मनोज जरांगे पाटलांच्या प्रकृतीबाबत चिंता, सरकारकडे मोठी मागणी
आम्ही आडमुठे नाही, सरकार आम्हाला फसवतंय! मनोज जरांगेंचा थेट आरोप
Manoj Jarange | आम्ही आडमुठे नाही, सरकार आम्हाला फसवतंय! मनोज जरांगेंचा थेट आरोप
मनोज जरांगे पाटलांचा सरकारवर गंभीर आरोप, ईडी नोटीसांवरून...
मनोज जरांगे पाटलांचा सरकारवर गंभीर आरोप, ईडी नोटीसांवरून...
गणेशोत्सवात विघ्न नको, सर्वसामान्यांना... तायवाडेंचा जरांगेंना संदेश
Babanrao Taywade | गणेशोत्सवात विघ्न नको, सर्वसामान्यांना त्रास होऊ नये! बबनराव तायवाडेंचा जरांगेंना थेट संदेश; ओबीसी आरक्षणावरही मोठं वक्तव्य
मनोज जरांगे आरक्षणाबाबत बोलताना भावुक; अश्रू अनावर
Manoj Jarange Hunger Strike | मनोज जरांगे आरक्षणाबाबत बोलताना भावुक; अश्रू अनावर
गणेशोत्सवासाठी कोकण जाणाऱ्या भाविकांसाठी CSMT वरून गणपती स्पेशल ट्रेन
गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या भाविकांसाठी CSMT वरून गणपती स्पेशल ट्रेन रवाना
पोलिसांनी अडवलंच तर... मुंबईत होणाऱ्या निर्णायक मराठा आंदोलनाबाबत...
पोलिसांनी अडवलंच तर...  मुंबईत होणाऱ्या मराठा आंदोलनाबाबत मनोज जरांगेंचा मोठा इशारा