AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

संजय दत्त आणि मुलीच्या नात्यात दुरावा? थेट पोस्ट करत म्हणाली, ‘कुटुंबाच्या प्रतिमेबद्दल अधिक चिंता…’

Trishala Dutt Cryptic Post: 'कुटुंबाच्या प्रतिमेबद्दल अधिक चिंता...', 37 वर्षांच्या मुलीसोबत बिघडलं संजय दत्तचं नातं? लेकी थेट पोस्ट करत केला मोठा खुलासा... सध्या सर्वत्र त्रिशाला दत्त हिचा पोस्ट तुफान व्हायरल होत आहे...

संजय दत्त आणि मुलीच्या नात्यात दुरावा? थेट पोस्ट करत म्हणाली, 'कुटुंबाच्या प्रतिमेबद्दल अधिक चिंता...'
फाईल फोटो
| Updated on: Aug 26, 2025 | 10:11 AM
Share

Trishala Dutt Cryptic Post: अभिनेता संजय दत्त याची पहिली पत्नी ऋचा शर्मा यांची मुलगी त्रिशाला दत्त हिने सोशल मीडियावर एक क्रिप्टिक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामुळे सर्वत्र संजय आणि त्रिशाला यांच्या नात्याची चर्चा सुरु आहे. सोशल मीडियावर त्रिशाला हिच्या पोस्टने नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. पोस्ट पाहिल्यानंतर संजय दत्त आणि त्रिशाला यांच्या नात्यात दुरावा आला आहे का? असा प्रश्न देखील अनेकांनी उपस्थित केला आहे. कुटुंबाची प्रतिमा जपण्यापेक्षा मानसिक आरोग्याला अधिक महत्त्व दिलं पाहिजे…’ असं त्रिशाला पोस्टमध्ये म्हणाली आहे.

सोशल मीडियावर पोस्ट करत त्रिशाला म्हणाली, ‘प्रत्येक व्यक्ती तुमच्या आयुष्यात स्वतःची जागा निर्माण करेल… असं प्रत्येक वेळेस होणार नाही. तुमचं रक्ताचं नातं असेल तरी ते शक्य होणार नाही… कधीकधी सर्वात जास्त थकवणारे, अमान्य करणारे आणि नाकारणारे लोक आपलं स्वतःचं कुटुंब कधी होतात कळत नाही. प्रत्येकाला आपल्या आयुष्यात शांतता हवी असते. कुटुंबाची प्रतिमा जपण्यापेक्षा तुमच्या मानसिक आरोग्याकडे अधिक लक्ष द्या…’

पोस्टमध्ये त्रिशाला पुढे म्हणाली, ‘सतत तुमच्यासोबत गैरवर्तन आणि दुखावणाऱ्या व्यक्तींपासून दूर राहा… मग त्या व्यक्तीने तुमचा सांभाळ केला असेल तरी काहीही हरकत नाही… त्या व्यक्तीला तुमच्या जवळ देखील येऊ देऊ नका…जेव्हा आई – वडिलांना जगात कुटुंब कसं आहे यापेक्षा ते कसं दिसतं याची जास्त काळजी असते, तेव्हा ती एक समस्या असते.’ असं देखील त्रिशाला म्हणाली.

कसा आहे संजय दत्त याचं मुलीसोबत नातं?

संजय दत्त आणि त्रिशाला यांच्या नात्यामध्ये दुरावा आहे… असं अनेकदा समोर आलं आहे. सोशल मीडियावर देखील दोघांच्या नात्याबद्दल अनेक चर्चा रंगलेल्या असतात. पण काही दिवसांपूर्वी दोघांमध्ये प्रेमळ नातं पाहायला मिळालं… त्रिशाला हिने वडिलांच्या 66 व्या वाढदिवशी वडिलांना शुभेच्छा देखील दिला. पण आता क्रिप्टिक पोस्टनंतर पुन्हा त्यांच्या नात्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत.

त्रिशाला हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेता संजय दत्त आणि अभिनेत्याची पहिली पत्नी ऋचा शर्मा यांची पहिली मुलही त्रिशाला झगमगत्या विश्वापासून दूर एका वेगळ्या क्षेत्रात स्वतःची ओळख निर्माण करत आहेत. त्रिशाला अमेरिकेत मानसोपचारतज्ज्ञ आहे.  त्रिशाला सोशल मीडियावर देखील कायम सक्रिय असते. त्रिशाला अमेरिकेत तिच्या आजी – आजोबांसोबत राहते.

Follow Us
श्रीचंद घाटावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विधिवत पूजा
सिंहस्थ कुंभमेळ्याची तयारी जोरात! श्रीचंद घाटावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विधिवत पूजा
रोहित पवारांचा डेटा सेंटर प्रकल्पाला विरोध; रद्द न केल्यास तीव्र आंदोल
रोहित पवारांचा डेटा सेंटर प्रकल्पाला विरोध; रद्द न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा!
सिंहस्थ कुंभमेळ्यानिमित्त 700 वर्षांपूर्वीचे गंगा गोदावरी मंदिर उघडले
12 वर्षांची प्रतीक्षा संपली! सिंहस्थ कुंभमेळ्यानिमित्त 700 वर्षांपूर्वीचे गंगा गोदावरी मंदिर भाविकांसाठी खुले
शंखांच्या गजराने दुमदुमलं त्र्यंबकेश्वर; गंगा-गोदावरीच्या महाआरतीने...
Nashik Simhastha Kumbh Mela : शंखांच्या गजराने दुमदुमलं त्र्यंबकेश्वर; गंगा-गोदावरीच्या महाआरतीने सिंहस्थ कुंभमेळ्याला सुरुवात
त्र्यंबकेश्वरमध्ये सिंहस्थ कुंभमेळ्याचा शंखनाद! ध्वजारोहण अन्...
त्र्यंबकेश्वरमध्ये सिंहस्थ कुंभमेळ्याचा शंखनाद! ध्वजारोहण अन् गोदावरीच्या महाआरतीने मंगलमय वातावरण
सप्त नद्यांच्या पवित्र जलाने अभिषेक, देवतांचं आवाहन अन् ध्वजपूजन.....
Trimbakeshwar Kumbh Mela Flag Hoisting : सप्त नद्यांच्या पवित्र जलाने अभिषेक, देवतांचं आवाहन अन् ध्वजपूजन; त्र्यंबकेश्वर कुंभमेळ्याचा विधिवत प्रारंभ
नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमध्ये सिंहस्थ कुंभमेळ्याचा भव्य ध्वजारोहण सोहळा
Simhastha Kumbh Mela Nashik : नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमध्ये सिंहस्थ कुंभमेळ्याचा भव्य ध्वजारोहण सोहळा; कुंभपर्वाला सुरुवात
पूर्णेकर समर्थकांना मारहाण; ठाणे पोलीस पालकमंत्र्यांची धुणीभांडी करतात
Sanjay Raut : पूर्णेकर समर्थकांना मारहाण; ठाणे पोलीस पालकमंत्र्यांची धुणीभांडी करतात का? संजय राऊतांचा थेट सवाल
एकनाथ शिंदे येणाऱ्या काळात मुख्यमंत्री होऊच शकत नाही...;
Gunratna Sadavarte : एकनाथ शिंदे येणाऱ्या काळात मुख्यमंत्री होऊच शकत नाही...;  गुणरत्न सदावर्तेंचं गाण्यातून भाकीत
माझ्या लेव्हलला आलो तर महाराष्ट्रातही फिरु देणार नाही, रवींद्र धंगेकर
Ravindra Dhangekar : माझ्या लेव्हलला आलो तर महाराष्ट्रातही फिरु देणार नाही, रवींद्र धंगेकर यांनी नेमकं कोणाला सुनावलं?