मी जिवंत आहे.., मृत्यूच्या अफवांवर संतापला प्रसिद्ध अभिनेता, उचललं मोठं पाऊल
सोशल मीडियावर कायम सेलिब्रिटींच्या मृत्याच्या अफवा पसरलेल्या असतात. ज्यामुळे त्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतो. आता देखील एका प्रसिद्ध अभिनेत्याच्या मृत्यूच्या अफवा पसरल्याने त्याने मोठं पाऊल उचललं आहे....

बॉलिवूडचे प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेते रझा मुराद यांच्या मृत्यूची खोटी माहिती समोर आल्यानंतर त्यांने मोठं पाऊल उचललं आहे. सोशल मीडियावर मृत्यूच्या अफवा पसरल्यानंतर त्यांना मोठा मानसिक त्रास झाला. यावर त्यांनी पोलिसांत तक्रार देखील दाखल केली आहे. सांगायचं झालं तर, सोशल मीडियावर अचानक अशी अफवा पसरली की, रझा मुराद यांचं निधन झालं आहे… अशी पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होताच नेटकऱ्यांनी त्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून श्रद्धांजली वाहण्यास सुरुवात केली. अशात स्वतः रझा मुराद यांना स्वतःला सांगावं लागलं की, ‘मी अद्या जिवंत आहे…’
ही परिस्थिती अतिशय तणावग्रस्त आणि दुःखद आहे… रझा मुराद म्हणाले, ‘मी जिवंत आहे… हेत सांगणं आता कठीण वाटत आहे… यामुळे मनावर दबाव देखील येत आहे…’ रझा यांनी सांगितलं की, वारंवार येणाऱ्या मेसेज आणि कॉलमुळे त्यांचा घसा कोरडा आणि ओठ कोरडे पडत होते. अशा खोट्या बातम्या पसरवणाऱ्यांचा त्यांनी निषेधही केला.
मिळालेल्या माहितीनुसार, चिंता वाढू लागल्याने, रझा मुराद यांनी स्थानिक पोलिसांकडे तक्रार दाखल केली. तक्रार मिळाल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे आणि सोशल मीडिया पोस्ट आणि संदेशांचा शोध घेऊन तपास सुरू केला आहे. अधिकाऱ्यांनी सांगितल्यानुसार, जो कोणी व्यक्ती किंव ग्रूप अशा अफवा पसरवत आहे, त्याच्या विरोधात कायदेशीर कारवाई केली जाईल आणि गरज भासल्यास आरोपीला अटक देखील केली जाईल…
अफवा कुठून आली आणि जाणूनबुजून खोटा मेसेज कोणी पसरवला हे शोधण्यासाठी कायदा अंमलबजावणी संस्था आणि फोरम प्रशासक एकत्र काम करत आहेत. तज्ज्ञांनी सांगितल्यानुसार, ‘अशा अफवामुंळे एखाद्या व्यक्ती मानसिक आघात होऊ शकतो… त्यामुळे सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या पोस्टची सत्यता जाणून घेतल्यानंतरच त्यावर प्रतिक्रिया द्या… ही प्रत्येक नेटकऱ्याची जबाबदारी आहे…’
रझा मुराद यांच्याबद्दल सांगायचं झालं तर, त्यांनी आतापर्यंत अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावत चाहत्यांचं मनोरंजन केलं आहे. आज देखील रझा मुराद आगामी सिनेमांमध्ये व्यस्त आहेत… त्यांनी अनेक सिनेमांमध्ये खलनायकाच्या भूमिकेला देखील न्याय दिला आहे….
