AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तुरुंगातही शाही घराण्याच्या लेकीने नाही सोडली संजूबाबाची साथ, तुरुंगात रंगली ‘लव्हस्टोरी’

Sanjay Dutt Birthday: तुरुंगात असताना अनेकांनी सोडली संजूबाबाची साथ, पण 'या' शाही कुटुंबाच्या लेकीने नाही सोडली अभिनेत्याची साथ, तुरुंगातून बाहेर येताच संजूबाबाने मात्र..., संजय दत्त कायम खासगी आयुष्यामुळे असतो चर्चेत...

तुरुंगातही शाही घराण्याच्या लेकीने नाही सोडली संजूबाबाची साथ, तुरुंगात रंगली 'लव्हस्टोरी'
Updated on: Jul 29, 2024 | 1:00 PM
Share

बॉलिवूडचा सुपरस्टार अभिनेता संजय दत्त याला आज कोणत्या ओळखीची गरज नाही. अभिनेत्याने अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांच्या मनावर आणि बॉलिवूडवर राज्य केलं आणि आजही करत आहे. पण संजय दत्त त्याच्या सिनेमांमुळे चर्चेत राहिलाच, पण अभिनेता खासगी आयुष्यामुळे देखील चर्चेत राहिला. एका मुलाखतीत खुद्द संजूबाबाने सांगितलं होतं की, त्याने 300 हून अधिक महिलांना डेट केलं आहे. तर संजूबाबाने तीन लग्न केली. संजूबाबाच्या पहिल्या पत्नीचं नाव रिचा शर्मा होतं. दोघांना एक मुलगी त्रिशाला आहे. ती 35 वर्षांची असून अमेरिकेत राहाते. कर्करोगामुळे अभिनेत्याच्या पहिल्या पत्नीचं निधन झालं.

रिचा हिच्या निधनानंतर अभिनेत्याच्या आयुष्यात मॉडेल रिया पिल्लई हिची एन्ट्री झाली. दोघेही एकमेकांना ओळखत होते. मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणात संजयला तुरुंगात जावे लागले तेव्हा ते एकमेकांच्या अधिक जवळ आले. कारण संजूबाबाच्या कठीण काळात देखील रिया हिने अभिनेत्याची साथ सोडली नाही. रिया ही हैदराबादचे महाराज नरसिंगगीर धनराजगीर ज्ञान बहादूर यांची नात आहे.

संजय दत्त याला रिया हिचा स्वभाव प्रचंड आवडला आणि अभिनेता देखील शाही घराण्याच्या लेकीच्या प्रेमात पडला. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर संजयने व्हॅलेंटाइन डेचं निमित्त साधत रियाला प्रपोज केलं आणि 1998 मध्ये लग्न केलं. पण दोघांचं लग्न फार काळ टिकलं नाही. संजूबाबाने सात सिनेमे साईन केले होते. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर अभिनेता सिनेमांच्या शुटिंगमध्ये व्यस्त झाला. अशात लग्नानंतर देखील रिया एकटी पडली.

संजय दत्त पत्नी रिया हिला वेळ देऊ शकत नव्हता. त्यामागे कारण देखील तसं होतं. रिपोर्टनुसार, संजूबाबाच्या आयुष्यात मान्यता हिची एन्ट्री झाली होती. तर रिया हिने देखील टेनिस खेळाडू लिएंडर पेस याला डेट करण्यास सुरुवात केली होती. अशात रिया आणि संजय यांचा घटस्फोट झाला.

रिया हिच्यासोबत घटस्फोट झाल्यानंतर संजय दत्त याने तिसरं लग्न मान्यता दत्त हिच्यासोबत केलं. मान्यता आणि संजय यांच्यामध्ये जवळपास 21 वर्षांचं अंतर आहे. आज संजूबाबा त्याच्या तिसऱ्या कुटुंबासोबत आनंदी आयुष्य जगत आहे. संजय दत्त आणि मान्यता दत्त यांनी एक मुलगा आणि एक मुलगी आहे. अभिनेत्याला अनेकदा कुटुंबासोबत स्पॉट केलं जातं. सध्या सर्वत्र संजूबाबा याच्या खासगी आयुष्याची चर्चा रंगली आहे.

जुनी म्हण आहे, मुंबईत ठाकरे..; मनोज जरांगेंचं ठाकरेंच्या युतीवर विधान
जुनी म्हण आहे, मुंबईत ठाकरे..; मनोज जरांगेंचं ठाकरेंच्या युतीवर विधान.
एकनाथ शिंदेंचं नाव सुवर्णाक्षरात का कोरलं जाणार?
एकनाथ शिंदेंचं नाव सुवर्णाक्षरात का कोरलं जाणार?.
गावात कुत्रं विचारत नाही..;अविनाश जाधवांचं भाजप नेत्यांना खरमरीत उत्तर
गावात कुत्रं विचारत नाही..;अविनाश जाधवांचं भाजप नेत्यांना खरमरीत उत्तर.
माझ्या पत्नीच्या नावाने सावली बार, पण..; रामदास कदमांचा खुलासा
माझ्या पत्नीच्या नावाने सावली बार, पण..; रामदास कदमांचा खुलासा.
हनीट्रॅपमुळे शिंदेंचं सरकार आलं; वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
हनीट्रॅपमुळे शिंदेंचं सरकार आलं; वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा.
निशिकांत दुबेने पुन्हा राज ठाकरेंना चिमटी काढली, म्हणाले..
निशिकांत दुबेने पुन्हा राज ठाकरेंना चिमटी काढली, म्हणाले...
भास्कर जाधवांना विरोधी पक्षनेते पद का नाही? राऊतांचा मोठा दावा
भास्कर जाधवांना विरोधी पक्षनेते पद का नाही? राऊतांचा मोठा दावा.
राज ठाकरेंच्या विरोधात थेट सुप्रीम कोर्टात याचिका; काय आहे प्रकरण?
राज ठाकरेंच्या विरोधात थेट सुप्रीम कोर्टात याचिका; काय आहे प्रकरण?.
मातोश्रीवर शकुनी मामा बसलेला आहे; नितेश राणे ठाकरे बंधूंवर बरसले
मातोश्रीवर शकुनी मामा बसलेला आहे; नितेश राणे ठाकरे बंधूंवर बरसले.
खळ्ळखट्याकची भाषा वापरताच मुनगंटीवारांनी काढले राज ठाकरेंचे संस्कार
खळ्ळखट्याकची भाषा वापरताच मुनगंटीवारांनी काढले राज ठाकरेंचे संस्कार.