बॉलिवूडची सर्वांत सुंदर अभिनेत्री, नवऱ्याने फसवलं, मृत्यू आला तेव्हा तुरुंगात होता नवरा

Bollywood Actress Life: गोंडस मुलीला जन्म दिल्यानंतर सुपरस्टार अभिनेत्याने केली फसवणूक, अभिनेत्रीने मृत्यूला कवटाळलं तेव्हा तुरुंगात खडी फोडत होता नवरा..., अभिनेत्री आजही कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे असते चर्चेत

बॉलिवूडची सर्वांत सुंदर अभिनेत्री, नवऱ्याने फसवलं, मृत्यू आला तेव्हा तुरुंगात होता नवरा
फाईल फोटो
| Updated on: Aug 26, 2025 | 3:16 PM

Bollywood Actress Life: बॉलिवूडच्या एका प्रसिद्ध अभिनेत्याने दुसऱ्या अभिनेत्री प्रेमा खातर स्वतःच्या पत्नीला घटस्फोटाची कागदपत्रं पाठवली… घटस्फोटाची प्रक्रिया सुरु असतानाच पत्नीचं निधन झालं. तर पती अभिनेत्याला गंभीर प्रकरणात तुरुंगवास भोगावा लागला… आज तो अभिनेता स्वतःचं आयुष्य तिसऱ्या पत्नीसोबत आनंदाने जगत आहे. पण पहिल्या पत्नीची लेक आजी – आजोबांकडे राहात आहे… सध्या ज्या अभिनेत्याची चर्चा रंगली आहे, तो अभिनेता दुसरा तिसरा कोणी नसून अभिनेता संजय दत्त आहे. संजय दत्त यांच्या पहिल्या पत्नीचं नाव रिचा शर्मा असं होतं. दोघांना एक मुलगी आहे. तिचं नाव त्रिशाला दत्त असं आहे.

सांगायचं झालं तर, रिचा शर्मा हिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केल्यानंतर अभिनेता संजय दत्त याच्यासोबत लग्न केलं. तेव्हा संजूबाबा यशाच्या शिखरावर होता. पण तेव्हा इंडस्ट्रीमध्ये संजय याचं नाव फार काही चांगलं नव्हतं… त्यामुळे रिचा अभिनेत्याला घाबरायची… अशात संजय याच्यासोबत लग्नासाठी कुटुंबिय होकार देतील का? असा प्रश्न संजय आणि रिचा यांना पडलेला होती. अखेर 1987 मध्ये संजय आणि रिचा यांचं लग्न झालं.

लग्नाच्या एका वर्षानंतर रिचा आणि संजय यांना त्रिशला नावाची मुलगी झाली. सगळं काही ठीक चाललं होतं तेव्हा अभिनेत्रीला कळलं की तिला कर्करोग झाला आहे, हा आजार तिच्या सासूबाई, अभिनेत्री नर्गिस यांना देखील होता. कर्करोगामुळे अभिनेत्रीचं निधन झालं.

संजयने रिचाला उत्तम उपचारांसाठी न्यू यॉर्कला नेलं. पण बॉलिवूडमध्ये यशाच्या शिखरावर असल्यामुळे संजय याला पत्नीला वेळ देणं शक्य नव्हतं. अभिनेता मुंबईत शुटिंगमध्ये व्यस्त होता. अशाच अभिनेत्री माधुरी दीक्षित हिच्यासोबत संजूबाबा याच्या नावाच्या चर्चा रंगल्या…

न्यूयॉर्कमध्ये उपचार झाल्यानंतर रिचा शर्मा कॅन्सर मुक्त झाली आणि पुन्हा भारतात परतली. तेव्हा संजय दत्त पत्नी आणि मुलीला घेण्यासाठी विमानतळावर आला देखील नाही. पत्नीने फोन केल्यानंतर देखील अभिनेता आला नाही. अखेर माधुरी आणि संजय यांच्या नात्याबद्दल कळल्यानंतर रिचा पुन्हा अमेरिकेत गेली… अशात अभिनेत्याने पत्नीला घटस्फोटाची कागदरत्रे पाठवली…

रिचा शर्माचं नशीब तिला साथ देत नव्हतं. घटस्फोटाची प्रक्रिया सुरू असतानाच तिला पुन्हा कर्करोग झाला. बायकोच्या कठीण वेळी संजयही तिच्यासोबत नव्हता. 1993 च्या मुंबई बॉम्बस्फोटात बेकायदेशीर शस्त्रे बाळगल्याबद्दल त्याला टाडा आणि शस्त्रास्त्र कायद्यांतर्गत अटक करण्यात आली होती आणि तो तुरुंगात होता.

1996 मध्ये वयाच्या 32 व्या वर्षी रिचा शर्मा हिचं निधन झालं. या काळात देखील पती संजय दत्त तिच्यासोबत नव्हते आणि तुरुंगात असल्याने तो बायकोला भेटायलाही जाऊ शकला नाही. अशात संजय दत्त याच्या पत्नीचा सांभळ रिचा हिच्या आजी – आजोबांना केला…