
मुंबई : 17 सप्टेंबर 2023 | टीव्ही विश्वात अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्यांनी झगमगत्या विश्वात पदार्पण केलं, पण त्या स्वतःचं स्थान टिकवू शकल्या नाहीत. अखेर अभिनेत्रींनी झगमगत्या विश्वापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला. अशाच अभिनेत्रींपैकी एक म्हणजे, ‘सपने सुहाने लडकपन के’ मालितील गुंजन, म्हणजे अभिनेत्री रुपल त्यागी. ‘सपने सुहाने लडकपन के’ मालिकेतून चाहत्यांच्या भेटीस आलेल्या रुपल त्यागी हिने चाहत्यांचं मनोरंज केलं. चाहत्यांनी देखील अभिनेत्रीला डोक्यावर घेतलं. प्रचंड सुंदर पण आपल्या खोडकर स्वभावामुळे सर्वांची मने जिंकून घेणारी रुपल आता कुठे आहे? काय करते? याबद्दल कोणाला माहिती नाही. एवढंच नाही तर, अभिनेत्रीने ब्रेकअपनंतर वाईट मार्ग स्वीकारला होता. याबद्दल देखील मोठी माहिती समोर येत आहे.
एका मुलाखतीत रुपल म्हणाली होती, ‘सपने सुहाने लडकपन के’ मालिकेमुळे अभिनेत्री लोकप्रियतेत आणि प्रसिद्धीमध्ये प्रचंड वाढ झाली होती. पण याच दरम्यान, रुपल हिचा बॉयफ्रेंड त्याच्या एक्स – गर्लफ्रेंडला घेवून तिच्या समोर आला. ज्यामुळे अभिनेत्रीला मोठा धक्का बसला. या धक्क्यातून स्वतःला सावरणं अभिनेत्रीसाठी प्रचंड कठीण झालं होतं.
मुलाखतीत अभिनेत्रीने तिच्या व्यस्त वेळापत्रकाबद्दल देखील सांगितलं होतं. ‘मी १८ तास शुटिंग करायची. पूर्ण दिवस प्रवासात जायचा… स्वतःवर मी बिलकूल लक्ष देत नव्हती. आराम आणि झोप तर मी विसरलीच होती. मला स्मीकिंगची वाईट सवय लागली होती. मला काळलं होतं की मला लागलेली सवय किती वाईट आहे आणि यातून मला बाहेर पडायचं होतं….’ असं देखील अभिनेत्री म्हणाली.
फार कमी लोकांना माहिती आहे की, रुपल त्यागी फक्त अभिनेत्री नसून उत्तम डान्सर देखील आहे. तिने चुप चुप के, भूल भुलैया यांसारख्या सिनेमांमध्ये विद्या बालन पासून अभिनेता शाहिद कपूर, करीना कपून यांना कोरियोग्राफर केलं आहे.
रुपल त्यागी हिने तिच्या करियरची सुरुवात २००७ साली ‘कसम से’ मालिकेतून केली. पण अभिनेत्रीला ‘सपने सुहाने लडकपन के’ मालिकेमुळे लोकप्रियता मिळाली. ‘सपने सुहाने लडकपन के’ मालिके शिवाय रुपल हिने रंजू की बेटियां, यंग ड्रीम्स, हमारी बेटियों का विवाह, शक्ति अस्तित्व के एहसास की, दिल मिल गए यांसारख्या मालिकांमध्ये देखील महत्त्वाची भूमिका बजावत चाहत्यांचं मनोरंजन केलं आहे.