Maharashtra News Live : महापालिका निवडणुकीपूर्वी शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का
देश, विदेश, राज्य पातळीवरील राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र, क्रीडा अन् मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील बातमी तुम्हाला इथे वाचायला मिळेल.

LIVE NEWS & UPDATES
-
सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने राष्ट्रवादी अजित पवार गट लागला कामाला
आगामी महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेसकडून इच्छुक उमेदवारांचा अर्ज स्वीकारण्यात येणार. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे शहराध्यक्ष संतोष पवार 16 डिसेंबर पासून इच्छुक उमेदवारांचा अर्ज स्वीकारणार.राष्ट्रवादी अजित पवार गटाने सोलापूर महानगरपालिकेसाठी ‘अब की बार 75 पार’ चा नारा दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून सोलापूर महापालिकेच्या 102 जागांसाठी चाचपणी सुरु आहे
-
हिवाळी अधिवेशन संपताच मंत्री गिरीश महाजन नाशिकमध्ये दाखल
वृक्षारोपण कार्यक्रमासह विविध विकास कामांचे भूमिपूजन. अमृत योजनेअंतर्गत मल नि: सारण व्यवस्था विकसित करणे , कुंभमेळ्यासाठी शहरातील सात रस्ते विकसित करणे अशा विविध कामांचे भूमिपूजन तर रामकालपथ निर्मितीसाठी 63 विस्थापित झालेल्या रहिवाशांना सदनिका वाटप करणे. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर विविध विकास कामांच्या भूमिपूजन व इतर कार्यक्रमांना लावणार हजेरी
-
-
जळगावातील निमखेडी गावात तरुणाचा धारधार शस्त्राने डोक्यात वार
जळगावातील निमखेडी गावात तरुणाचा धारधार शस्त्राने डोक्यात वार करून खून झाल्याची घटना घडली आहे. सागर साहेबराव सोनवणे असे खून झालेल्या मयत तरुणाचे नाव आहे. खूनप्रकरणी तालुका पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले असून अन्य संशयितांचा शोध सुरू आहे. रविवारी रात्री मारेकऱ्यांनी सागर सोनवणे याच्या डोक्यात धारधार शस्त्राने वार केले.
-
खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या त्या विधानाने तापले वातावरण
खासदार ओमराजे निंबाळकर यांनी महिला उमेदवाराला हसीना पारकर संबोधल्याने उमरग्यात वातावरण तापले. सर्वसामान्य घरातील महिला उमेदवाराला बदनाम करू नका परिणाम भोगावे लागतील, भाजपने पत्रकार परिषद घेत खासदारांना दिला इशारा. 20 डिसेंबर रोजी होणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमरगा मध्ये राजकीय वातावरण तापले आहे.
-
कपिल पाटील यांची काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर टीका
भाजपचा पंतप्रधान बदलणार हे तर काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री सांगणार का ?.. पृथ्वीराज चव्हाण यांनी आधारासह सांगावे… कपिल पाटील यांचे पृथ्वीराज चव्हाण यांना आव्हानय नागपूर बैठकीनंतर मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवलीमध्ये युती झाली आहे; कार्यकर्त्यांच्या भावना काहीही असल्या तरी वाद-विवादाचा प्रश्न नाही.
-
-
शिवसेना नेते संतोष ढवळे यांची पक्षातून हकालपट्टी, मोठी खळबळ..
शिवसेना नेते तथा सचिव विनायक राऊत यांच्या आदेशावरून संतोष ढवळे, विधानसभा प्रमुख, यांनी यवतमाळ नगर परिषदेमध्ये पक्षाच्या विरोधात जाऊन, शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या नगराध्यक्ष व इतर शिवसेना नगरसेवक पदाच्या अधिकृत उमेदवाराच्या विरोधात, काँग्रेस पक्षाचा प्रचार केल्यामुळे त्यांच्यावर पक्ष विरोधी कार्य केल्यामुळे, त्यांची शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) या पक्षातून हकालपट्टी करण्यात आली.
-
तेजस्वी घोसाळकर यांचा शिवसेनेला धक्का, भाजपमध्ये पक्षप्रवेश ?
महापालिका निवडणुकीपूर्वी आज शिवसेना ठाकरे गटाला सर्वात मोठा धक्का बसू शकतो. घोसाळकर कुटुंबातील सून आणि वार्ड क्र.१ च्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर आज शिवसेना ठाकरे गट सोडून भाजपमध्ये पक्ष प्रवेश करणार आहेत.
तेजस्वी घोसाळकर या शिवसेना नेते विनोद घोसाळकर यांची सून आणि दिवंगत माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्या पत्नी आहेत. त्या मुंबई बँकेच्या संचालक आहेत. काही दिवसांपूर्वी तेजस्वी घोसाळकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती आणि दोघांमध्ये चर्चा झाली होती. आज त्या शेकडो कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत अशी माहिती समोर येत आहे.
-
-
सोलापुरात ऊस दर जाहीर करण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक
सोलापुरात ऊस दर जाहीर करण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाल्या आहेत. उत्तर सोलापूर तालुक्यातील लोकमंगल साखर कारखाना स्वाभिमानीच्या पदाधिकाऱ्यांनी बंद पाडला आहे. – लोकमंगल साखर कारखान्याच्या गव्हाणीत उड्या मारून चालू कारखान्याचे गाळप बंद पाडले. जोपर्यंत साखर कारखाना उसाला दर जाहीर करत नाही तोपर्यंत कारखाना सुरु करू देणार नसल्याची स्वाभिमानीची भूमिका आहे.
-
मराठी माणूस जागा हो, रात्र वैऱ्याची आहे… दादरमध्ये बॅनर्सचीच चर्चा
दादर शिवाजी पार्क येथे मोठ्या प्रमाणात निनावी पोस्टर्स पाहायला मिळत असून सर्वांचे त्याकडे लक्ष वेधलं गेलं आहे. आगामी महानगरपालिका निवडणूक ही कधीही जाहीर होऊ शकते. त्याच अनुषंगाने मराठी माणूस जागा हो आणि रात्र वैऱ्याची आहे आणि मराठी माणसा मुंबई वाचव , तुझी मुंबई तुझ्यापासून तोडली जात आहे , यावेळी तुला मराठीसाठी एकत्र यावे लागेल असे उल्लेख केलेले काही पोस्टर्स दादर परिसरात लावण्यात आले आहेत.
-
आपले नाशिक हरित नाशिक या मोहिमेअंतर्गत 1 हजार नवीन झाडांची होणार लागवड
– आपले नाशिक हरित नाशिक या मोहिमेच्या अंतर्गत आज पहिल्या टप्प्यात 1 हजार नवीन झाडांची लागवड होणार आहे. मंत्री गिरीश महाजन साधू,महंत आणि काही आखाड्यांचे प्रमुखांच्या उपस्थितीत भव्य वृक्षारोपण सोहळा होणार असून त्यासाठी आंध्र प्रदेशच्या राजमुंद्री येथून खास देशी प्रजातीची झाडं मागवण्यात आली आहेत. -टप्प्याटप्प्याने शहरात तब्बल 15 हजार झाडांची लागवड होणार आहे. आज या मोहिमेअंतर्गत मखमालाबादसह इतर 4 ठिकाणी पहिल्या टप्प्यात 1 हजार झाडं लावण्यात येणार आहेत.
-
छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणूक समिती घोषित
छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणूकसमिती घोषित करण्यात आली आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेच्या निवडणूक समितीची घोषणा झाली असून या समितीमध्ये समिती मध्ये माजी खासदार चंद्रकांत खैरे, माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, उप नेते सुभाष पाटील हे मुख्य मार्गदर्शक आहेत. तसचे या समितीमध्ये शहरातील पदाधिकारी यांच्यासह 11 जणांचा समावेश आहे. समिती घोषित झाल्यानंतर आता उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेकडून इच्छुकांना 17 डिसेंबर ला अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
उल्हासनगर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची जाहीर सभा उल्हासनगरात पार पडली. यात त्यांनी मोदी सरकारवर सडकून टीका केली. सध्या इलेक्शनच्या माध्यमातून राजकीय पक्ष संपवतले जात असल्याचा आरोपही प्रकाश आंबेडकर यांनी केला . नाशिकमध्ये घराची भिंत कोसळून बारा वर्षीय मुलीचा मृत्यू झाला. सुरगाणा तालुक्यातील उंबरपाडा दिगर येथे ही घटना घडली. राहत्या घराची भिंत अंगावर कोसळून बारा वर्षीय मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला. छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणुकसमिती घोषित करण्यात आली आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेची निवडणूक समिती घोषित झाली आहे. यासह देश, विदेश, राज्य पातळीवरील राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र, क्रीडा अन् मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील बातमी तुम्हाला इथे वाचायला मिळेल.
Published On - Dec 15,2025 7:55 AM
