Arrest Warrant | सलमान खान याच्या ‘या’ अभिनेत्री विरोधात अटक वॉरंट जारी, सर्वत्र खळबळ
Arrest Warrant | सलमान खान याच्या अभिनेत्रीच्या अडचणीत वाढ; इव्हेंट कंपनीच्या तक्रारीवरून न्यायालयाचे आदेश, अभिनेत्री विरोधात अटक वॉरंट जारी... सर्वत्र सलमान खान आणि त्याच्यामुळे प्रसिद्धी झोतात आलेल्या अभिनेत्रीची चर्चा... आता पुढे काय होणार?

मुंबई : 17 सप्टेंबर 2023 | अभिनेता सलमान खान याने आतापर्यंत अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. एवढंच नाही तर, भाईजान याने अनेक अभिनेत्रींना बॉलिवूडमध्ये संधी देखील दिली आहे. पण आता सलमान खान याची एक प्रसिद्ध अभिनेत्री वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. सलमान खान याच्या अभिनेत्री विरोधात न्यायालयाकडून अटक वॉरंट जारी करण्यात आला आहे. ज्या अभिनेत्री विरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आला आहे, ती अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून अभिनेत्री झरिन खान आहे. एका इव्हेंट कंपनीने अभिनेत्री विरोधातात तक्रार दाखल केल्यानंतर अभिनेत्री विरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आला आहे. नक्की प्रकरण काय आहे… याबद्दल जाणून घेवू…
नक्की काय आहे प्रकरण
2018 मध्ये 6 कार्यक्रमांना उपस्थित न राहिल्याबद्दल अभिनेत्री झरिन खान हिच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती. कोलकाता आणि उत्तर 24 परगणा येथील 6 काली पूजेच्या कार्यक्रमांना उपस्थित न राहिल्याबद्दल अभिनेत्री विरोधात अनेक तक्रारी दाखल करण्यात आल्या होत्या. सध्या सर्वत्र झरिन खान हिचीच चर्चा रंगली आहे.
इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीच्या वतीने नरकेलडांगा पोलिस ठाण्यात ही तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्यानंतर नरकेलडांगा पोलिसांनी सियालदह न्यायालयात आरोपपत्र सादर केलं. संबंधित प्रकरण समोर आल्यानंतर पोलिसांनी झरिन खान हिच्यासोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. पण पोलिसांना कोणताही प्रतिसात मिळाला नाही. एवढंच नाही तर, अभिनेत्रीने देखील याबद्दल कोणतेही वक्तव्य केलेलं नाही.
सलमान खान याच्यासोबत अभिनेत्रीने सुरु केलं करियर
झरिन खान हिने तिच्या अभिनयाची सुरुवात २०१० मध्ये सलमान खान याच्यासोबत ‘वीर’ सिनेमातून केली. सलमान खान याच्यासोबत स्क्रिन शेअर केल्यामुळे अभिनेत्रीच्या लोकप्रियतेत प्रचंड वाढ झाली. एवढंच नाही तर, झरिन हिच्या अभिनयाचं देखील सर्वच स्थरातून कौतुक झालं. त्यानंतर झरिन खान हिची तुलना अभिनेत्री कतरिना कैफ हिच्यासोबत होवू लागली. आता झरिन बॉलिवूडपासून दूर आहे.
कतरिना हिच्यासोबत होत असलेल्या तुलनेबद्दल अभिनेत्री म्हणाली, ‘माझी तुलना कतरिना हिच्यासोबत होतं आहे… ही गोष्ट मला फार आवडत आहे. कारण मला कतरिना फार आवडते. पण होत असलेल्या तुलनेचा परिणाम माझ्या फिल्मी करियरवर झाला. ज्यामुळे इंडस्ट्रीमध्ये मला स्वतःला सिद्ध करण्याची संधी देखील मिळाली नाही…’ सध्या सर्वत्र झरिन खान हिची चर्चा सुरु आहे.
