Sara Ali Khan: गोल्डन टेंपलमध्ये पोहोचताच सारा अली खान ढसा ढसा रडली, नेमकं झालं तरी काय?

Sara Ali Khan Viral Video: सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये सारा अली खान सुवर्ण मंदिरात रडताना दिसत आहे.

Sara Ali Khan: गोल्डन टेंपलमध्ये पोहोचताच सारा अली खान ढसा ढसा रडली, नेमकं झालं तरी काय?
Sara Ali khan
Image Credit source: tv9 Marathi
| Updated on: Oct 21, 2026 | 8:54 AM

बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान आणि अभिनेता आयुष्मान खुराना यांचा आगामी चित्रपट ‘उडता तीर’ सध्या चांगलाच चर्चेत आहे. हा चित्रपट २३ ऑक्टोबरला चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. त्याआधी मंगळवारी, २० ऑक्टोबरला दसऱ्याच्या मुहूर्तावर आयुष्मान खुराना आणि सारा अली खान अमृतसरच्या सुवर्ण मंदिरात पोहोचले. चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी दोघांनी सुवर्ण मंदिरात डोकं टेकून आशीर्वाद घेतला आणि चित्रपटाच्या यशासाठी मन्नत मागितली. यावेळचे त्यांचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहेत.

गोल्डन टेंपलमध्ये आशिर्वाद घेताना सारा अली खानने पांढऱ्या रंगाचा पंजाबी ड्रेस परिधान केला आहे. तर आयुष्मान खुरानाने पांढऱ्या रंगाचा कुर्ता घातला होता. मात्र या सगळ्यादरम्यान साराचा एक असा व्हिडिओ समोर आला आहे, ज्याने लोकांचे लक्ष वेधून घेतले आहे. व्हिडिओमध्ये अभिनेत्री गुरुद्वाऱ्यात दर्शन घेत असताना भावुक झालेली दिसत आहे.

Loading...

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये सारा अली खान सुवर्ण मंदिराता दर्शन घेत असते. तेव्हा तिला अश्रू अनावर झाले आहेत. ती हुंदके देऊन रडताना दिसत आहे.तिचा हा खूप भावुक झालेला व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे. या व्हिडिओवर नेटिझन्स वेगवेगळ्या प्रकारची प्रतिक्रिया देत आहेत.

सारा अली खानच्या व्हिडिओवर नेटिझन्सची प्रतिक्रिया

या व्हिडिओवर कमेंट करताना काहींनी सारा अली खानचे अश्रू नाटक म्हटले आहे. काही नेटिझन्स लिहित आहेत की सारा अली खानची ओव्हरअॅक्टिंग इथेही थांबलेली नाही. तर काहींनी याला भक्ती आणि श्रद्धेची शक्ती सांगितले आहे. काहींनी गुरुद्वारामध्ये गेल्यानंतर अनेकांसोबत असे होते असे म्हटले आहे. काही नेटकऱ्यांनी त्यांचा अनुभव सांगितला आहे. सोशल मीडियावर साराचा हा व्हिडीओ सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.

सारा अली खानच्या सिनेमाविषयी

सारा अली खान आणि आयुषमान खुरानाचा उडता तिर हा सिनेमा 23 ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणार आहे. हा सिनेमा याआधीच प्रदर्शित होणार होता. मात्र, साऊथ सुपरस्टार यशच्या टॉक्सिक सिनेमामुळे चित्रपटाचे प्रदर्शन लांबणीवर ठकलण्यात आले होते.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us