नव्या फोटोमुळे सारा तेंडुलकर पुन्हा चर्चेत; फोटोमध्ये कोणासोबत दिसली सचिन तेंडुलकरची मुलगी?
'या'अभिनेत्यासोबत फोटो व्हायरल झाल्यानंतर सारा तेंडुलकर हिने इस्टाग्राम स्टोरीवर शेअर केलेला फोटो सर्वत्र चर्चेत; साराची पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

मुंबई : मास्टर ब्लास्टार सचिन तेंडुलकरची लेक सारा तेंडुलकर (Sara Tendulkar) कायम चर्चेत असते. साराने अद्याप अभिनेत्री म्हणून ओळख निर्माण केली नसली तरी सोशल मीडियावर मात्र सचिनची लेक कायम चर्चेत असते. सोशल मीडियावर साराच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी सारा कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ इन्स्टाग्रामवर पोस्ट करत असते. आता देखील साराने इस्टाग्राम स्टोरीवर एक फोटो शेअर केला आहे. फोटोमुळे सारा पुन्हा चर्चेत आली आहे. फोटोमध्ये सारा तिच्या मैत्रिणींसोबत दिसत आहेत.
साराने मैत्रिणींसोबत पाठण सिनेमा लंडनमध्ये पाहिला आहे. पठाण सिनेमा पाहताना साराने मैत्रिणींसोबत एक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये सारा पठाण सिनेमाचा आनंद घेताना दिसत आहे. सध्या साराची पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. सध्या सर्वत्र साराच्या फोटोची चर्चा आहे.

सारा सध्या लंडनमध्ये तिचं शिक्षण पूर्ण करत आहे. सारा कायम तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असते. काही दिवसांपूर्वी सारा क्रिकेटर शुभमन गिल याला डेट करत असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. पण सारा आणि शुभमन दोघांनी यावर अधिकृत घोषणा केलेली नाही.
दरम्यान, सारा आणि सिद्धार्थ केरकर यांच्या फोटोमुळे देखील चर्चांना उधाण आलं. सारा सिद्धार्थ केरकरसोबत बाईक राईडसाठी गेली होती. फोटोमध्ये दोघांनी हेल्मेट घातला असून दोघे प्रचंड आनंदी दिसत आहे. त्यामुळे साराचा सिद्धार्थसोबत व्हायरल होत असलेल्या फोटो पाहून दोघे एकमेकांना डेट तर करत नाहीत ना? असा प्रश्न चाहत्यांना पडला.

सारा तेंडुलकर देखील सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. इन्स्टाग्रामवर साराने २.५ मिलियन फॉलोअर्स आहेत, तर सारा फक्त ५८४ जणांना फॉलो करते. फक्त सोशल मीडियावरच नाही तर, रील लाईफमध्ये देखील साराच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. सारा कायम सोशल मीडियावर स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते.
