AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bigg Boss 17 | ‘बिग बॉस 17’मध्ये सहभागी होणार सीमा हैदर? अखेर सीमाने केला मोठा खुलासा, म्हणाली मी नक्कीच

बिग बॉस 17 ची चाहते हे आतुरतेने वाट पाहताना दिसत आहेत. चाहत्यांमध्ये बिग बॉस 17 बद्दल मोठे क्रेझ आहे. सलमान खान हाच बिग बॉस 17 होस्ट करताना दिसेल. परत एकदा ती धमाल चाहत्यांना बघायला मिळणार आहे. काही दिवसांपूर्वीच बिग बाॅस ओटीटी 2 चा फिनाले पार पडला आहे.

Bigg Boss 17 | 'बिग बॉस 17'मध्ये सहभागी होणार सीमा हैदर? अखेर सीमाने केला मोठा खुलासा, म्हणाली मी नक्कीच
| Updated on: Sep 01, 2023 | 3:19 PM
Share

मुंबई : बाॅलिवूडचा दबंग खान अर्थात सलमान खान (Salman Khan) याचा बहुचर्चित शो बिग बॉस सीजन 17 सध्या जोरदार चर्चेत आहे. विशेष म्हणजे चाहते हे बिग बॉस सीजन 17 ची आतुरतेने वाट पाहताना दिसत आहेत. बिग बाॅस 16 ने टीआरपीमध्ये मोठा धमाका केला. विशेष म्हणजे ते सीजन सुपरहिट ठरले. यामुळेच आता निर्मात्यांना बिग बॉस सीजन 17 (Bigg Boss 17)  कडून अत्यंत मोठ्या अपेक्षा या नक्कीच आहेत. बिग बॉस सीजन 17 हिट करण्यासाठी निर्मात्यांनी देखील कंबर कसली आहे. यासाठी सध्या चर्चेत असलेल्या लोकांशी संपर्क साधला जात आहे.

विशेष म्हणजे एक चर्चा तूफान रंगताना दिसली, ती म्हणजे पाकिस्तानमधून भारतामध्ये आलेली सीमा हैदर ही बिग बॉस सीजन 17 मध्ये सहभागी होणार आहे. विशेष म्हणजे या शोमध्ये सीमा हैदर तिच्या आयुष्यातील अत्यंत खास असलेल्या व्यक्तीसोबत सहभागी होणार आहे. या शोमध्ये सीमा हैदर ही काही मोठे खुलासे करण्याची देखील दाट शक्यता आहे.

ज्याच्यासाठी पाकिस्तानमधून भारत गाठला, त्याच सचिन मीना याच्यासोबतच बिग बॉस सीजन 17 मध्ये सीमा हैदर सहभागी होणार असल्याचे सांगितले जात होते. मात्र, आता यावर सीमा हैदर हिने मोठा खुलासा केला आहे. सीमा हैदर हिने सांगितले की, फक्त बिग बॉस सीजन 17 च नाही तर तिला कपिल शर्मा याच्या शोमध्ये देखील बोलावले आहे.

पुढे सीमा हैदर ही म्हणाली की, मी बिग बाॅस 17 मध्ये सहभागी होण्याचा अजून काही विचार केला नाहीये. मी यावर लवकरच विचारल करेल. जे काही आहे ते मी सर्वांसमोर सांगेल. म्हणजे आता हे नक्कीच आहे की, सीमा हैदर आणि सचिन मीना हे बिग बाॅस 17 मध्ये सहभागी होऊ शकतात.

बिग बॉस सीजन 17 च्या निर्मात्यांनी सीमा हैदर हिच्यासोबत संपर्क साधलाय. रिपोर्टनुसार सीमा हैदर आणि सचिन मीना हे बिग बॉस सीजन 17 मध्ये सहभागी होऊ शकतात. जर सीमा हैदर ही बिग बॉस सीजन 17 मध्ये सहभागी झाली तर मोठे खुलासे होऊ शकतात आणि बिग बॉस सीजन 17 ला देखील याचा मोठा फायदा होऊ शकतो.

सीमा हैदर आणि सचिन मीना यांच्यावर एक चित्रपट लवकरच तयार केला जाणार आहे. बिग बॉस सीजन 17 बद्दल चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता ही बघायला मिळत आहे. चाहते या सीजनची आतुरतेने वाट पाहत आहेत. काही दिवसांपूर्वीच बिग बाॅस ओटीटी 2 चा फिनाले पार पडला आहे. एल्विश यादव हा बिग बाॅस ओटीटी 2 चा विजेता ठरला आहे.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?