AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Shabana Azmi: आमच्यात खूप भांडणं.., जावेद अख्तर यांच्यासोबतच्या वैवाहिक आयुष्याबद्दल शबाना आझमी स्पष्टच बोलल्या

Shabana Azmi : संसार कितीही दशकांचा असला तरी मतभेद, वाद आणि संघर्ष हे नात्याचा भाग असू शकतात; मात्र मैत्री, आदर आणि समजूतदारपणा नातं टिकवण्यासाठी महत्त्वाचा असतो, हे शबाना आझमी यांच्या या वक्तव्यामुळे अधोरेखित झालं आहे.

Shabana Azmi: आमच्यात खूप भांडणं.., जावेद अख्तर यांच्यासोबतच्या वैवाहिक आयुष्याबद्दल शबाना आझमी स्पष्टच बोलल्या
Shabana Azmi and Javed AkhtarImage Credit source: Instagram
| Updated on: Aug 30, 2026 | 7:55 AM
Share

बॉलिवूडच्या दिग्गज अभिनेत्री शबाना आझमी आणि गीतकार जावेद अख्तर यांची जोडी इंडस्ट्रीतील चर्चेत असलेल्या जोड्यांपैकी एक आहे. दोघांच्या लग्नाला चार दशकांहून अधिक काळ झाला आहे. मात्र, इतक्या वर्षांच्या संसारानंतरही त्यांचं नातं कायम ‘परफेक्ट’ राहिलेलं नाही, हे स्वतः शबाना आझमी यांनी स्पष्ट केलं आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी त्यांच्या वैवाहिक आयुष्याबाबत मोकळेपणाने भाष्य केलं. जावेद अख्तर यांच्या पहिल्या पत्नी हनी इराणी यांच्यासोबतच्या नात्यावरही शबाना यांनी भाष्य केलं आहे.

‘झूम’ला दिलेल्या मुलाखतीत शबाना आझमी यांनी जावेद अख्तर यांच्यासोबतच्या नात्याबद्दल बोलताना सांगितलं की, त्यांचा संसार नेहमीच सुरळीत राहिलेला नाही. दोघांमध्ये अनेकदा मोठे वाद होतात. मात्र, त्यांच्या नात्याची सर्वात मजबूत बाजू म्हणजे मैत्री आणि जगाकडे पाहण्याचा समान दृष्टिकोन. शबाना यांच्या मते, जावेद यांच्यासोबत त्यांची मैत्री खूप मजबूत आहे. जावेद यांची बुद्धिमत्ता, विनोदबुद्धी आणि लोकांशी संवाद साधण्याची पद्धत त्यांना विशेष आवडते. त्या जावेद यांचा खूप आदर करतात.

शबाना यांनी जावेद यांच्याकडे आकर्षित होण्यामागचं कारणही सांगितलं. त्यांच्या मते, जावेद हे त्यांना भेटलेल्या सर्वात बुद्धिमान व्यक्तींपैकी एक आहेत. विशेष म्हणजे जावेद यांच्यात त्यांना स्वतःच्या वडिलांची झलक दिसली. दोघांच्या कौटुंबिक पार्श्वभूमीतही काही साम्य असल्याचं शबाना यांनी सांगितलं. दोघांचेही पालक लेखक होते आणि त्यांचा साहित्याशी जवळचा संबंध होता. उर्दू शायरीची आवडही दोघांना होती. त्यामुळे विचारांची जवळीक त्यांच्या नात्यासाठी महत्त्वाची ठरली.

जावेद अख्तर यांच्या पहिल्या पत्नीबद्दल काय म्हणाल्या?

जावेद अख्तर यांच्या पहिल्या पत्नी हनी इराणी यांच्याबद्दलही शबाना यांनी मनमोकळेपणाने सांगितलं. जावेद आणि हनी यांना फरहान आणि झोया ही दोन मुलं आहेत. जावेद यांच्यासोबत शबाना यांच्या नात्याला सुरुवातीला मोठ्या टीकेला सामोरं जावं लागलं होतं. शबाना यांच्या मते, त्या काळात हनी इराणी यांनी अतिशय समजूतदारपणा दाखवला. त्यांनी मुलांच्या मनात शबाना यांच्याबद्दल कधीही द्वेष निर्माण केला नाही किंवा मुलांसमोर जावेद यांची वाईट प्रतिमा निर्माण करण्याचा प्रयत्न केला नाही. त्यामुळे आज हनी इराणी त्यांच्यासाठी कुटुंबातील सदस्यासारख्या आहेत आणि दोघींमध्ये चांगलं नातं आहे. विशेष म्हणजे हनी इराणी यांनीही यापूर्वी जावेद आणि शबाना यांच्याबद्दल आदर व्यक्त केला आहे. विभक्त झाल्यानंतर मनात कटुता ठेवण्यात अर्थ नसल्याचं त्यांनी म्हटलं होतं.

Follow Us
नागपुरात बनावट सोन्याचे दागिने गहाण ठेवून कोट्यवधींची फसवणूक उघड
Nagpur :  नागपुरात बनावट सोन्याचे दागिने गहाण ठेवून कोट्यवधींची फसवणूक उघड
आदिवासी विद्यार्थ्यांचं 17 दिवसांनी उपोषण स्थगित
Pune Adivasi Students Protest : आदिवासी विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य, विद्यार्थ्यांचं 17 दिवसांनी उपोषण स्थगित
पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांचं 17 दिवसांनी उपोषण स्थगित
Pune Adivasi Students Protest | पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांचं 17 दिवसांनी उपोषण स्थगित
मराठा आरक्षणावर 12 डिसेंबरला मनोज जरांगे पाटील घेणार मोठा निर्णय!
मराठा आरक्षणावर 12 डिसेंबरला मनोज जरांगे पाटील घेणार मोठा निर्णय!
मुंबई उच्च न्यायालयाने अन्न व औषध प्रशासनाला फटकारले...
'तुम्ही स्वतःला देव समजता का?' मुंबई उच्च न्यायालयाचा तुकाराम मुंडेंच्या अन्न व औषध प्रशासनाला सवाल
'नमो सहकार टॅक्सी'अंतर्गत मुंबै बँकेमार्फत टॅक्सी खरेदीसाठी 95% कर्ज
प्रवीण दरेकर यांची मोठी घोषणा; नमो सहकार टॅक्सी अंतर्गत मुंबै बँकेमार्फत टॅक्सी खरेदीसाठी 95 टक्के कर्ज...
मुंबईत मोठ्या गणेश मंडळांच्या बाप्पांचे जल्लोषात आगमन!
मुंबईत मोठ्या गणेश मंडळांच्या बाप्पांचे जल्लोषात आगमन; गणेशोत्सवाला उत्साहात सुरुवात!
विठ्ठलवाडी आगाराच्या बस चालकाची दादागिरी; थेट ॲम्ब्युलन्सच अडवली...
कल्याणमध्ये विठ्ठलवाडी आगाराच्या बस चालकाची दादागिरी; ॲम्ब्युलन्स अडवली, नागरिकांचा संताप...
अस्वच्छतेमुळे सिंधुदुर्ग रुग्णालयाचे उपहारगृह बंद; परवाना निलंबित
सिंधुदुर्ग शासकीय रुग्णालयाच्या उपहारगृहात मिसळमध्ये आढळले झुरळ; एफडीएची कारवाई
नेपाळ महापुरात बँकेची तिजोरी नदीत वाहून गेली
नेपाळ महापुरात बँकेची तिजोरी नदीत वाहून गेली. २९ जणांना लुटमारीचा प्रयत्न करताना अटक