स्वतःच्या आनंदासाठी मी दुसऱ्या महिलेचे…; शबाना आझमी यांचा लग्नाबाबत खळबळजनक खुलासा

Shabana Azmi On Marrying Javed Akhtar: शबाना आझमी यांनी जेव्हा जावेद अख्तर यांच्याशी लग्न केले तेव्हा त्यांच्यावर अनेक आरोप करण्यात आले.

स्वतःच्या आनंदासाठी मी दुसऱ्या महिलेचे...; शबाना आझमी यांचा लग्नाबाबत खळबळजनक खुलासा
Javed Akhar Shabana Azami Hani Irani
Image Credit source: Tv9 Bharatvarsh
| Updated on: Apr 19, 2025 | 1:49 PM

बॉलिवूडमधील लोकप्रिय ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी यांनी 1984मध्ये लेखक जावेद अख्तर यांच्याशी लग्न केले. शबानापूर्वी जावेद यांचे लग्न हनी इराणीशी झाले होते, त्यांच्यापासून त्यांना झोया अख्तर आणि फरहान अख्तर ही दोन मुले आहेत. जावेद आणि हनी यांचा घटस्फोट झाल्यानंतर काही दिवसांमध्येच शबानी आझमींनी जावेद अख्तर यांच्याशी लग्न केले. लग्नानंतर शबाना आझमी यांच्यावर अनेक आरोप झाले. त्यावर शबाना आझमी यांनी प्रतिक्रिया दिली. आता त्या काय म्हणाल्या जाणून घ्या…

फिल्मफेअरला दिलेल्या मुलाखतीत शबाना आझमी म्हणाल्या, ‘मी एक स्त्रीवादी मॉडेल होते आणि मी असे काही केले जे समजण्यापलीकडे होते. कारण मला असं वाटत होतं की मी जे काही करत आहे ते माझ्या स्वतःच्या आनंदासाठी. आणि त्यासाठी मी दुसऱ्या महिलेचे हक्क हिरावून घेत आहे.’

वाचा: लक्ष्मीकांत बेर्डे यांची पहिली पत्नी कोण होती? दागिन्यांसह दिला होता अग्नी

‘मग गप्प राहणे योग्य होते’

शबाना आझमी पुढे म्हणाल्या, ‘जे मला स्त्रीवादी मानत होते त्यांना असे वाटण्याचा पूर्ण अधिकार होता. पण नंतर, मला वाटले की मी ज्या परिस्थितीमध्ये लग्न केले याबद्दल सांगायला गेले तर ते संबंधित लोकांना आणि कुटुंबांना आणखी त्रास दायक ठरेल. त्यावेळी गप्प राहणेच गरजेचे होते आणि मला वाटते की तो खूप शहाणपणाचा निर्णय होता. कारण माझ्यावर फेकलेल्या चिखलानंतर ते शांत झाले.’

जावेद अख्तर यांच्या पहिल्या पत्नीशी शबानाचे नाते कसे आहे?

शबाना आझमी यांनी जावेद अख्तर यांची पहिली पत्नी हनी इराणीसोबतच्या नात्याबद्दलही खुलासा केला. शबाना यांनी सांगितले की हनी आणि त्यांचे नाते चांगले आहे. त्या म्हणाल्या, ‘हे शक्य झाले कारण त्यावर चिखल फेकला गेला नाही. याचे श्रेय हनी, मी आणि जावेद यांना जाते. तुम्हाला जे चूक वाटते हे स्पष्ट करण्यासाठी तुमच्याकडे काही आधार असला पाहिजे. पण आम्ही तिघांनीही ते टाळले आणि तो खूप शहाणपणाचा निर्णय होता.’