AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लक्ष्मीकांत बेर्डे यांची पहिली पत्नी कोण होती? दागिन्यांसह दिला होता अग्नी

दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांची दोन लग्न झाली होती. पहिले लग्न हिंदी सिनेमांमध्ये काम करणाऱ्या अभिनेत्रीसोबत झाले होते. हा संसार १५ वर्षे टिकला...

लक्ष्मीकांत बेर्डे यांची पहिली पत्नी कोण होती? दागिन्यांसह दिला होता अग्नी
Laxmikant Berde wifeImage Credit source: Social Media
| Updated on: Apr 17, 2025 | 8:02 PM
Share

मराठी चित्रपटसृष्टीमधील सुपरस्टार अभिनेते म्हणून लक्ष्मीकांत बेर्डे ओळखले जातात. त्यांच्या सिनेमांसोबतच खासगी आयुष्याची कायम चर्चा झाली. लक्ष्मीकांत बर्डे यांच्या पत्नीचे नाव प्रिया बेर्डे. त्यांना एक मुलगा आणि मुलगी आहे. पण त्यांच्या पहिल्या पत्नीबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे. चला जाणून घेऊया…

कोण आहे पहिली पत्नी?

दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या पहिल्या पत्नीचे नाव रुही बेर्डे होते. त्या देखील एक उत्तम अभिनेत्री होत्या. रुही यांना तुम्ही अनेक हिंदी मराठी चित्रपटात काम करताना पाहिले असेल. रुही बेर्डे यांचे खरे नाव पद्मा होते. त्यांचे पडद्यावरील नाव रुही असे होते. रुही या मूळच्या मुंबईच्या होत्या. फार कमी जणांना माहित असेल की रुही यांनी त्यांच्या करिअरची सुरुवात हिंदी चित्रपटसृष्टीपासून झाली होती. ‘आ गले लग जा’ हा त्यांचा पहिला चित्रपट ठरला. या चित्रपटात त्यांनी शत्रूग्न सिंह यांचा बहिणीची भूमिका साकारली होती.

वाचा: दादा कोंडके यांची झलक दिसते सूरजमध्ये; ‘झापुक झुपूक’मधील गाणे पाहून नेटकऱ्यांची प्रतिक्रिया

नाटकातून केली अभिनयाच्या प्रवासाला सुरुवात

रुही यांनी अभिनयाच्या प्रवासाची सुरुवात नाटकामध्ये काम करत केली. डार्लिंग डार्लिंग हे त्यांचे नाटक फारच लोकप्रिय ठरले होते. या नाटकातल्या भूमिकेमुळे रुही या प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचल्या होत्या. १९७३ साली ‘जावई विकत घेणे आहे’ या चित्रपटातून त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण केले. त्यांची दादा कोंडके यांच्या पांडू हवालदार सिनेमातील भूमिका प्रेक्षकांना विशेष आवडली होती. त्यानंतर रुही यांनी कधीही मागे वळून पाहिले नाही. त्यांनी एकापाठोपाठ एक हिट सिनेमे दिले.

कुठे झाली पहिली भेट?

रुही आणि लक्ष्मीकांत यांची पहिली भेट ‘वेडी माणसं’ या नाटकाच्या प्रयोगदरम्यान झाली. मात्र, हे नाटक फार चालले नाही. त्यानंतर पुन्हा एकदा ‘कश्यात काय लफड्यात पाय’ या नाटकाच्या निमित्ताने एकत्र आले. याच दरम्यानच दोघांचे सूत जुळले. लक्ष्मीकांत बेर्डे यांना ज्या नाटकामुळे प्रसिद्धी मिळाली त्या शांतेच कार्ट चालू आहे या नाटकात देखील दोघांनी एकत्र काम केले. १९८३ साली रुही आणि लक्ष्मीकांत यांनी लग्न केले. रुही ही लक्ष्मीकांत यांच्या आयुष्यातली खरी लक्ष्मी ठरली होती. लग्नानंतर लक्ष्मीकांत यांची कारकिर्दीची गाडी सुसाट सुटली. त्या काळात रुही मराठी इंडस्त्रीमधील मोठ्या स्टार होत्या.

मात्र, लग्नानंतर लक्ष्मीकांत बेर्डे यांचा करियरला ऊभारी येताना पाहून रुही यांनी अभिनय कारकिर्दीला काही काळ ब्रेक लावण्याचा निर्णय घेतला. लोकप्रिय अभिनेत्री असूनही आणि नाटक सिनेमांच्या ऑफर येत असताना देखील आपल्या पतीसाठी त्यांनी घर संसारावर अधिक लक्ष केंद्रित करण्याचा ठरवले.

रुही आणि लक्ष्मीकांत यांचा संसार फार काळ चालला नाही आणि १५ वर्षाच्या संसारानंतर अखेर काळाने घाला घातला. एक दिवस रुही बेर्डे यांना अंधेरी येथे गाडीतून प्रवास करत असताना ब्रेन हॅमरेजचा त्रास सुरु झाला. त्यावेळी त्यांचा ड्रायव्हरने जवळच्या हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र, काही दिवसाच्या उपचारानंतर ५ एप्रिल १९९८ रोजी रुही यांचे निधन झाले. रुही यांच्या जाण्याने लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या मनावर फार मोठा आघात झाला होता. ते पार हदरुन गेले होते.

लक्ष्मीकांत बेर्डे यांची जवळची मैत्रीण लेखिका वसुंधरा साबळे यांनी आपल्या ब्लॉग मध्ये म्हटले आहे की, “रूही खरच लक्ष्याची लक्ष्मी होती तिच्या पायगुणाने लक्ष्या प्रसिध्दीच्या आणि ऐश्वर्याच्या शीखरावर पोहोचला. तिचा जाण्याने लक्ष्या खचून गेला होता तो इतका की नंतर त्याने कधीच उभारी धरली नाही. तो बरेच दिवस मित्रांशी बोलतच नव्हता. रुही गेल्यावर समशानभूमीत अग्नी देताना तिच्या अंगावरचा एकही अलंकार न काढू देणारा लक्षा, तिच्या पार्थिवासमोर निशब्द उभा होता.”

मुंबई अन ठाण्यात कोणचा महापौर? गंभीर आरोप करत मनसे नेत्याचा गंभीर आरोप
मुंबई अन ठाण्यात कोणचा महापौर? गंभीर आरोप करत मनसे नेत्याचा गंभीर आरोप.
फडणवीसांचा पुन्हा झंझावाती सभा, महापालिका जिंकण्यासाठी BJPचा मेगाप्लान
फडणवीसांचा पुन्हा झंझावाती सभा, महापालिका जिंकण्यासाठी BJPचा मेगाप्लान.
मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?
मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?.
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट.
धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं उघडलं पहिलं खातं, कोण बिनविरोध?
धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं उघडलं पहिलं खातं, कोण बिनविरोध?.
15 मिनिटांमुळे स्वप्न भंगलं! भाजप उमेदवार उशिरा पोहोचला अन् घडलं काय?
15 मिनिटांमुळे स्वप्न भंगलं! भाजप उमेदवार उशिरा पोहोचला अन् घडलं काय?.
भाजप इच्छुक आक्रमक... मंत्र्यांच्या PA अन् नातेवाईकाला उमेदवारी!
भाजप इच्छुक आक्रमक... मंत्र्यांच्या PA अन् नातेवाईकाला उमेदवारी!.
कार्यालय फोडणाऱ्यांना ठाकरे सेनेकडून तिकीट, उदय सामंतांचं मोठं विधान
कार्यालय फोडणाऱ्यांना ठाकरे सेनेकडून तिकीट, उदय सामंतांचं मोठं विधान.
मनसेचा अनोखा प्रचार, राज ठाकरेंच्या शिवतीर्थबाहेर रेल्वे इंजिन अन्..
मनसेचा अनोखा प्रचार, राज ठाकरेंच्या शिवतीर्थबाहेर रेल्वे इंजिन अन्...
RPI आठवले गटाचा माजी जिल्हाध्यक्ष तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात
RPI आठवले गटाचा माजी जिल्हाध्यक्ष तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात.