AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video | शाहरुख खान, अजय देवगण आणि अक्षय कुमार ट्रोल, लोकांमध्ये संतापाची लाट, ‘तो’ व्हिडीओ व्हायरल

शाहरुख खान आणि अजय देवगण यांचे चित्रपट मोठा धमाका करताना दिसत आहेत. शाहरुख खान याचे चित्रपट एका मागून एक प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. अक्षय कुमार याचे चित्रपट फ्लाॅप जाताना दिसत आहेत. चाहत्यांना अक्षयच्या चित्रपटाकडे पाठ फिरवलीये.

Video |  शाहरुख खान, अजय देवगण आणि अक्षय कुमार ट्रोल, लोकांमध्ये संतापाची लाट, 'तो' व्हिडीओ व्हायरल
| Updated on: Oct 09, 2023 | 8:55 PM
Share

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून शाहरुख खान (Shah Rukh Khan) हा तूफान चर्चेत आहे. शाहरुख खान याचे एका मागून एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत असून हे चित्रपट मोठा धमाका करताना देखील दिसत आहेत. आता शाहरुख खान याचा डंकी हा चित्रपट (Movie) लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येईल. शाहरुख खान याच्या करिअरमधील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट पठाण हाच ठरलाय. पठाण चित्रपटाने धमाकेदार कामगिरी ही नक्कीच केलीये. चाहत्यांनी जवान चित्रपटाला देखील मोठे प्रेम दिले.

दुसरीकडे बाॅलिवूड अभिनेता अजय देवगण याचेही चित्रपट धमाकेदार कामगिरी करत आहेत. मात्र, अक्षय कुमार याचे एका मागून एक चित्रपट फ्लाॅप जाताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वीच अक्षय कुमार याचा मिशन रानीगंज हा चित्रपट रिलीज झाला. मात्र, अजूनही या चित्रपटाला म्हणावा तसा धमाका करण्यात अजिबातच यश मिळाले नाही.

मिशन रानीगंज चित्रपटाच्या अगोदर अक्षय कुमार याचा सेल्फी चित्रपट रिलीज झाला. मात्र, तोही फ्लाॅप गेला. पुढील काही दिवसांमध्ये मिशन रानीगंज हा चित्रपट धमाका करणार असल्याचे सांगितले जातंय. आता सोशल मीडियावर शाहरुख खान, अजय देवगण आणि अक्षय कुमार यांचा एक व्हिडीओ तूफान व्हायरल होतोय.

या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये हे स्टार एका पान मसाल्याची जाहिरात करताना दिसत आहेत. यामुळेच आता हे स्टार नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आलेत. लोक यांना खडेबोल सुनावताना देखील दिसत आहेत. चित्रपट हिट ठरताच अशाप्रकारची जाहिरात गेल्याने यांना सोशल मीडियावर तूफान ट्रोल केले जात आहे.

जाहिरातीच्या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, अजय देवगण आणि शाहरुख खान हे गाडीमध्ये बसले असून अक्षय कुमार याला आवाज देत आहेत. मात्र, तो बाहेर येत नाही तेवढ्याच शाहरुख खान हा खिडकीला बाॅल मारतो. मात्र, अक्षय कुमार याला बोलवण्यासाठी अजय देवगण हा पान मसाला खाताना दिसतोय. पान मसाल्याच्या सुगंधामुळे तो खाली येतो.

एकाने या व्हिडीओवर कमेंट करत थेट म्हटले की, तुम्हाला लाज वाटत नाही अशाप्रकारची जाहिरात करताना? दुसऱ्याने लिहिले की, अरे यार अशाप्रकारच्या जाहिराती करणे खरोखरच बंद करा यार. यापूर्वीही या तिन्ही कलाकारांना तंबाकूची जाहिरात केल्याने 2022 मध्ये प्रचंड ट्रोल करण्यात आले होते. ज्यानंतर अक्षय कुमार याने मोठा निर्णय घेतला होता. आता परत अशा जाहिरातीमध्ये यांना पाहून लोक हैराण झाले.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?