AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘तुझ्या जेवढ्या गर्लफ्रेंड्स झाल्या नसतील, तेवढे माझे…’, रणबीर कपूरला असं का म्हणाला शाहरुख खान ?

सर्वांसमोर शाहरुख खाने याने काढला रणबीरच्या गर्लफ्रेंडचा विषय; किंग व्हिडीओमध्ये असं काय म्हणाला ज्यामुळे रणबीक पुढे काही बोलूच शकला नाही... व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सर्वत्र चर्चांना उधाण

'तुझ्या जेवढ्या गर्लफ्रेंड्स झाल्या नसतील, तेवढे माझे...', रणबीर कपूरला असं का म्हणाला शाहरुख खान ?
'तुझ्या जेवढ्या गर्लफ्रेंड्स झाल्या नसतील, तेवढे माझे...', रणबीर कपूरला असं का म्हणाला शाहरुख खान ?
| Updated on: Jan 28, 2023 | 2:05 PM
Share

मुंबई : अभिनेता शाहरुख खान सध्या त्याच्या पठाण सिनेमामुळे चर्चेत आहे. सोशल मीडियावर देखील सर्वत्र किंग खान याच्या पठाण सिनेमाचा बोलबाला पाहायला मिळत आहे. चार वर्षांनंतर शाहरुख खान याने मोठ्या पडद्यावर पदार्पण केल्यामुळे अभिनेत्याला रुपेरी पडद्यावर पाहण्यासाठी चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. बॉक्स ऑफिसवर याचा पुरावा पाहयला मिळत आहे. प्रदर्शनानंतर तीन दिवसांत पठाण सिनेमाने भारतात जवळपास १६० कोटी तर जगभरात ३०० कोटी रुपयांचा आकडा ओलांडला आहे. दरम्यान शाहरुखचा एक जुना व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

व्हिडीओमध्ये अभिनेता शाहरुख खान आणि रणबीर कपूर एकमेकांची खिल्ली उडवताना दिसत आहेत. सध्या व्हायरल होत असलेला व्हिडीओ फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्या दरम्यानचा आहे. व्हिडीओमध्ये शाहरुख रणबीरला म्हणतो, ‘गेल्या दोन वर्षांमध्ये इमरानसोबत तुझी होस्टींग चांगली होती..’ यावर रणबीर शाहरुखचे आभार मानतो.

View this post on Instagram

A post shared by @sharique_editz_0.1

पुढे शाहरुख खान म्हणतो, ‘तू स्टेजवर मला ओव्हरऍक्टिंग करताना दिसतो, त्यामुळे ओव्हरऍक्टिंग थोडी कमी कर अशी मी तुला विनंती करतो.’ शाहरुख याला उत्तर देत रणबीर म्हणतो, ‘जर मी ओव्हरऍक्टिंग करत असेल तर फिल्मफेअरला आपलं नाव बदलून डॉन २ ठेवावं लागेल..’ अशी खल्ली रणबीरने शाहरुखची देखील उडवली.

पुढे शाहरुख रणबीरला म्हणाला, ‘सांभाळून हिरो… सांभाळून, लहानपणापासून तुझ्या जेवढ्या गर्लफ्रेंड्स झाल्या नसतील, त्याच्यापेक्षा जास्त फिल्मफेअर अवॉर्ड आहेत माझ्याकडे.’ शाहरुख आणि रणबीर यांचा खास व्हिडीओ चाहत्यांचं मनोरंज करत आहे. सध्या पठाण सिनेमासोबतच शाहरुख आणि रणबीर यांच्या व्हिडीओची तुफान चर्चा रंगत आहे.

Follow Us
परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स...
FDA Raid | परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्सचा अन्न परवाना निलंबित
गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात...
Mumbai | गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात फलकांवर बंदी; उल्लंघन केल्यास कारवाई होणार
पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात
Nashik | पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात; संतप्त नागरिकांचा महापालिकेत ठिय्या
बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर
Navi Mumbai | बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर; दुकान मालकाने चूक मान्य करत...
मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात..
Mumbai Local | मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात रुळावरून पायी चालण्याची आली वेळ
अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा
Amit Shah | अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा, पुढे म्हणाले...
नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब...
Nanded | नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब; शेतकऱ्यांनी चौकात मांडली करपलेल्या पिकांची व्यथा
जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू...
Radhakrishna Vikhepatil | जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू... मराठा आरक्षणावर मोठी अपडेट समोर
तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं!
Shivendraraje Bhonsle | तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं! शिवेंद्रराजे भोसले स्पष्टच बोलले, पुढे म्हणाले...
संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; बन यांचा सडेतोड पलटवार
Sanjay Raut Vs Navnath Ban | संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; नवनाथ बन यांचा सडेतोड पलटवार, मुंबई दौऱ्यावरून वार- पलटवार सुरूच