AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Jawan | ‘जवान’साठी शाहरुखचं तगडं मानधन; इतर कलाकारांनाही मिळाली इतकी फी

शाहरुख खानच्या आगामी 'जवान' या चित्रपटात कलाकारांची मोठी फौज आहे. या चित्रपटासाठी शाहरुखने तगडं मानधन स्वीकारलं आहे. याशिवाय त्याला चित्रपटाच्या नफ्याचा काही भाग मिळणार आहे. यामधील इतर कलाकारांची फी किती ते जाणून घेऊयात..

Jawan | 'जवान'साठी शाहरुखचं तगडं मानधन; इतर कलाकारांनाही मिळाली इतकी फी
JawanImage Credit source: Instagram
| Updated on: Sep 04, 2023 | 10:37 AM
Share

मुंबई | 4 सप्टेंबर 2023 : बॉलिवूडचा किंग अर्थात अभिनेता शाहरुख खान सध्या त्याच्या आगामी ‘जवान’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आणि त्याला प्रेक्षकांकडून दमदार प्रतिसाद मिळाला. ‘जवान’ या चित्रपटात शाहरुख पाच विविध लूकमध्ये पहायला मिळणार आहे. त्याचसोबत यामध्ये कलाकारांची मोठी फौज आहे. ट्रेलर पाहिल्यानंतर चित्रपटाच्या कथेविषयी प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. ‘जवान’ हा चित्रपट पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर कमाईचा नवा विक्रम रचू शकतो. कारण या चित्रपटाची ॲडव्हान्स बुकिंग तुफान झाली आहे. दाक्षिणात्य दिग्दर्शक अटलीने या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं असून तब्बल 300 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये तो बनला आहे. हा शाहरुखचा आतापर्यंतचा सर्वांग महागडा चित्रपट मानला जात आहे.

शाहरुखचं मानधन

‘जवान’मधल्या भूमिकेसाठी शाहरुखने तगडं मानधन घेतल्याची माहिती समोर येत आहे. त्याने तब्बल 100 कोटी रुपये फी स्वीकारल्याचं कळतंय. याशिवाय चित्रपटाच्या नफ्याचा काही भाग किंग खानला मिळणार आहे. यामध्ये शाहरुखसोबत प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्री नयनतारा मुख्य भूमिकेत आहे. नयनताराचा हा पहिलाच बॉलिवूड चित्रपट असून त्यासाठी तिने 11 कोटी रुपये मानधन घेतल्याचं समजतंय. तर दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील आणखी एक प्रसिद्ध चेहरा म्हणजे विजय सेतुपती. शाहरुखच्या ‘जवान’ चित्रपटात तो खलनायकी भूमिकेत आहे. या भूमिकेसाठी त्याने 21 कोटी रुपये फी आकारली आहे.

छोट्याशा भूमिकेसाठी दीपिकाची तगडी फी

शाहरुख खान, नयनतारा आणि विजय सेतुपती यांच्याशिवाय चित्रपटात दीपिका पदुकोण, सान्या मल्होत्रा, प्रियामणी, सुनील ग्रोवर यांच्याही भूमिका आहेत. चित्रपटात दीपिकाची भूमिका लहान असली तरी त्यासाठी तिने 25 ते 30 कोटी रुपये मानधन घेतल्याचं कळतंय. ‘चेन्नई एक्स्प्रेस’मध्ये शाहरुखसोबत ‘वन टू थ्री फो’ गाण्यावर थिरकणारी अभिनेत्री प्रियामणी हिने दोन कोटी रुपये मानधन स्वीकारलं आहे. याशिवाय ‘दंगल गर्ल’ सान्या मल्होत्राला एक ते दोन कोटी रुपये मानधन मिळालं आहे.

View this post on Instagram

A post shared by Shah Rukh Khan (@iamsrk)

शाहरुख खानचा पठाण हा चित्रपट या वर्षाच्या सुरुवातीला प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी केली होती. त्यामुळे ‘जवान’कडून प्रेक्षकांच्या अपेक्षा आणखी वाढल्या आहेत. हा चित्रपट हिंदी, तमिळ आणि तेलुगू भाषेत प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने अटलीने हिंदी फिल्म इंडस्ट्रीत पहिलं पाऊल ठेवलं आहे.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?