Sharad Kapoor: ‘जोश’ सिनेमातील हँडसम हंक शरद कपूरची झालीये अशी अवस्था! कठीण काळात पाहून चाहत्यांची वाढली चिंता

Sharad Kapoor: 'जोश' सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस आलेला अभिनेता शरद कपूर याला ओळखणं देखील कठीण झालं आहे. एकेकाळी मोठ्या पडद्यावर राज्य करणाऱ्या अभिनेत्याला कठीण काळात पाहून चाहत्यांची चिंता देखील वाढली आहे... सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अभिनेत्रीची चर्चा रंगली आहे.

Sharad Kapoor: जोश सिनेमातील हँडसम हंक शरद कपूरची झालीये अशी अवस्था! कठीण काळात पाहून चाहत्यांची वाढली चिंता
Sharad Kapoor
| Updated on: Nov 13, 2026 | 3:06 PM

Sharad Kapoor: 90 च्या दशकात अनेक कलाकारांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्यातील काही कलाकार आज मोठ सेलिब्रिटी झाले आहेत, तर काही कलाकार कठीण काळात आयुष्य जगत आहे. असंच काही अभिनेता शरद कपूर याच्यासोबत देखील झालं आहे. 2000 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘जोश’ सिनेमात शरद कपूर याने महत्त्वाची भूमिका साकारली होती. तर त्याच्यासोबत अभिनेता शाहरुख खान आणि अभिनेत्री ऐश्वर्या राय हिने देखील महत्त्वाची भूमिका साकारलेली. आज ऐश्वर्या आणि शाहरुख त्यांच्या कुटुंबियांसोबत फक्त आनंदी आयुष्य जगत नसून, प्रोफेशनल आयुष्यात देखील दोघांनी स्वतःची भक्कम ओळख निर्माण केली आहे. पण अभिनेता शरद कपूर याची सध्याची अवस्था पाहून तुम्हाला देखील विश्वास बसणार नाही.

गेल्या अनेक वर्षांपासून बॉलिवूडपासून दूर असलेल्या शरद कपूर याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. एकेकाळी गँग लीडर म्हणून किंग खानशी भिडणार शरद याची अवस्था पाहून चाहत्यांच्या डोळ्यात देखील पाणी आलं आहे. व्हिडीओ अभिनेत्याच्या चाहत्यांनी कमेंट करत भावना देखील व्यक्त केल्या आहे.

Loading...

 

 

सांगायचं झालं व्हिडीओमध्ये, आपल्या पाळीव कुत्र्यांना निरोप देताना पाहून शरद कपूर भावूक होत रडताना दिसत आहे. अभिनेत्याची परिस्थिती पाहून त्याचे चाहते देखील हैराण झाले आहेत. एक काळ असा होता, जेव्हा शरद याची सर्वत्र चर्चा असायची. पण आता अभिनेत्याचा लूक पूर्णपणे बदलेला दिसत आहे. पांढरी दाढी, चेहऱ्यावर पडलेल्या सुरकुत्या, वयानुसार थकलेला चेहरा पाहून चाहत्यांना देखील मोठा धक्का बसला आहे.

पाळीव कुत्र्यापासून दूर होण्याचं दुःख अभिनेत्याला अधिक आहे… स्वतःची परिस्थिती योग्य नसल्यामुळे अभिनेत्याने पाळीव कुत्र्यांना काही काळ एक संस्थेत पाठवलं आहे. व्हिडिओमध्ये शरद कपूर पाळीव कुत्र्यांपासून दूर जाण्याबद्दल बोलताना स्वतःला सावरू शकला नाही.

अभिनेता म्हणाला की, घरातील सध्याची परिस्थिती ठीक नाही, परंतु नवीन बंगला बनल्यानंतर ते YODA या संस्थेकडे कुत्रे परत देण्याची विनंती करतील. अभिनेते म्हणाला, ‘या घरानंतर जेव्हा माझा नवीन बंगला बनेल, तेव्हा मी YODA ला म्हणेन की कृपया माझ्या मुलांना परत द्या, कारण मी यांच्याशिवाय राहू शकत नाही.’  शरद याने असंही सांगितले की, त्यांच्यापासून वेगळं होऊन त्यांचे कुत्रे देखील उदास होतील.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us