AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Suhana Khan Video: ‘वडिलांचे संस्कार….’, शाहरुख खान याच्या लेकीचं का होतय सर्वत्र कौतुक?

'किती स्विट आहे, अगदी वडिलांवर गेली आहे...' सुहाना खान हिने असं काय केलं ज्यामुळे किंग खानच्या लेकीचं सर्वत्र होतय कौतुक? सध्या सर्वत्र सुहाना खान हिची चर्चा...

Suhana Khan Video: 'वडिलांचे संस्कार....', शाहरुख खान याच्या लेकीचं का होतय सर्वत्र कौतुक?
| Updated on: Aug 12, 2023 | 10:45 AM
Share

मुंबई | 12 ऑगस्ट 2023 : बॉलिवूडचा किंग खान म्हणजे अभिनेता शाहरुख खान (Shah Rukh Khan) कायम चाहत्यांमध्ये कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. फक्त शाहरुखच नाही तर, अभिनेत्याची लेक सुहाना खान (suhana khan) देखील गेल्या काही दिवसांपासून तुफान चर्चेत आहे. सुहाना अद्याप अभिनेत्री म्हणून स्वतःची ओळख निर्माण करू शकली नसली तरी, तिच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. सोशल मीडियावर देखील सुहाना कायम चर्चेत असते. सुहाना हिचे अनेक व्हिडीओ देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असतात. आता देखील किंग खानच्या लेकीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हिडीओ पाहिल्यानंतर चाहते सुहानाचं कौतुक करत आहेत.

नकताच झालेल्या एका इव्हेंटमध्ये सुहाना खान आई गौरी खान हिच्यासोबत पोहोचली होती. कर्यक्रमातून घरी परतत असताना सुहाना तिच्या कारच्या दिशेने येत होती. तेव्हा काही गरजू लोकांनी सुहाना खान हिच्याकडे काही पैशांची मागणी केली. तेव्हा क्षणाचाही विलंब न करता सुहानाने पर्समधून महिलेला पैसे दिले. सध्या सुहानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

गरजू लोकांना पैसे देत असताना नेटकऱ्यांनी सुहाना हिला पाहिलं आणि तिच्या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी कमेंटचा वर्षाव केला. एक नेटकरी म्हणाला, ‘किती स्विट आहे, अगदी वडिलांवर गेली आहे…’, तर दुसरा नेटकरी म्हणाला, ‘वडिलांचे संस्कार…’, सध्या सोशल मीडियावर फक्त आणि फक्त सुहाना खान हिची चर्चा रंगत आहे.

सुहाना हिच्या आगामी प्रोजेक्टबद्दल सांगायचं झालं तर, सुहाना लवकरच दिग्दर्शक झोया अख्तर दिग्दर्शित ‘द अर्चिस’ सिनेमाच्या माध्यमातून अभिनय क्षेत्रात पदार्पण करणार आहे. सुहाना सिनेमाबद्दल अनेक महत्त्वाचे अपडेट सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांपर्यंत पोहोचवत असते.

एवढंट नाही तर, सुहाना हिच्या करियरसाठी बॉलिवूडचा प्रसिद्ध दिग्दर्शक करण जोहर याने पुढाकार घेतला आहे. ज्यामुळे किंग खानच्या लेकीच्या करियरमध्ये करण जोहर याचा मोलाचा वाटा असणार आहे. ‘द अर्चिस’ सिनेमानंतर सुहाना करण जोहर याच्या सिनेमात दिसणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे.

रिपोर्टनुसार, करण त्याच्या आगामी सिनेमासाठी प्रचंड उत्सुक आहे. करण जोहर याचा आगामी सिनेमा कोणत्याही जुन्या सिनेमाचा सिक्वल किंवा रिमेक नसून नव्या कथेवर आधारलेला असणार असल्याची माहिती मिळत आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, स्क्रिप्ट आणि सिनेमाच्या कथेवर अद्याप शिक्कामोर्तब करण्यात आलेला नाही. सिनेमा सध्या पहिल्या टप्प्यावर आहे. मात्र या वर्षाच्या अखेरीस या सिनेमाचं चित्रीकरण सुरु होईल असं चित्र दिसत आहे. शाहरुख खान याच्या लेकीसाठी करण आता काय जादू करेल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Follow Us
भाऊबीजेला उद्धव आणि राज ठाकरे एकत्र, कौटुंबिक फोटोंनी लक्ष वेधलं!
भाऊबीजेला उद्धव आणि राज ठाकरे एकत्र, कौटुंबिक फोटोंनी लक्ष वेधलं!
पंकजा मुंडेंच्या रामटेक बंगल्यावर धनंजय मुंडेंची भाऊबीज; पाहा खास क्षण
Dhananjay Munde : पंकजा मुंडे यांच्या रामटेक बंगल्यावर धनंजय मुंडेंची भाऊबीज; पाहा खास क्षण
ठाकरे बंधूंचा कौटुंबिक स्नेह! भाऊबीजेच्या निमित्ताने ठाकरे बंधू एकत्र
Thackeray Brothers : ठाकरे बंधूंचा कौटुंबिक स्नेह! भाऊबीजेच्या निमित्ताने ठाकरे बंधू पुन्हा एकत्र
दोन्ही NCP विलिनीकरणाबाबत राऊतांचं मोठं वक्तव्य; बावनकुळे काय म्हणाले?
Chandrashekhar Bawankule : दोन्ही NCP विलिनीकरणाबाबत राऊतांचं मोठं वक्तव्य; बावनकुळे काय म्हणाले?
अजितदादांचा अपघात की घातपात? उमेश पाटलांच्या विधानाने महाराष्ट्र...
अजितदादांचा अपघात की घातपात? उमेश पाटलांच्या विधानाने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ!
रोहित पवारांकडून सोनिया गांधींच्या आत्मचरित्राचं भरभरून कौतुक; म्हणाले
रोहित पवारांकडून सोनिया गांधींच्या आत्मचरित्राचं भरभरून कौतुक; म्हणाले, जीवनप्रवास प्रेरणादायी!
राजकारणापलीकडचं बहीण-भावाचं नातं! प्रसाद लाड आणि चित्रा वाघ यांनी...
राजकारणापलीकडचं बहीण-भावाचं नातं! प्रसाद लाड आणि चित्रा वाघ यांनी साजरी केली भाऊबीज
विलीनीकरणाबाबत सुनेत्रा पवारांची एका वाक्यात प्रतिक्रिया; नेमकं काय...
Sunetra Pawar : विलीनीकरणाबाबत सुनेत्रा पवारांची एका वाक्यात प्रतिक्रिया; नेमकं काय म्हणाल्या?
अमित शाह रविवारी पुणे दौऱ्यावर; तीन कार्यक्रमांसह राजकीय बैठकांकडे...
अमित शाह रविवारी पुणे दौऱ्यावर; तीन कार्यक्रमांसह राजकीय बैठकांकडे सर्वांचे लक्ष!
नागपुरात दिवाळीत आगीच्या 40 हून अधिक घटना; आता 106 फायर हायड्रंट्स उभा
Nagpur : नागपुरात दिवाळीत आगीच्या 40 हून अधिक घटना; आता 106 फायर हायड्रंट्स उभारणार!