AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मी आता म्हातारा झालोय, मी पहिल्यासारखा…; भर कार्यक्रमात शाहरूखने हे काय सांगितलं?

शाहरुख खाननं एका कार्यक्रमात परफॉर्म केल तेव्हा त्या कार्यक्रमात शाहरूखने असं काही आपल्या चाहत्यांसमोर म्हटलं की त्याचे चाहतेही नाराज झाले आहेत. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

मी आता म्हातारा झालोय, मी पहिल्यासारखा...; भर कार्यक्रमात शाहरूखने हे काय सांगितलं?
| Updated on: Jan 29, 2025 | 5:32 PM
Share

बॉलिवूडचा बादशाह शाहरूख खानचे करोडो चाहते आहेत. जे त्याच्या एक झलकसाठीही धडपड करत असतात. शाहरूखच्या अभिनयाबद्दल तर वेगळं काही बोलण्याची आवश्यकता नाही. शाहरूखने सर्वांच्या मनावर आधिराज्य गाजवलं आहे आणि कायम करत राहणार आहे. शाहरूख खान हा अनेक कार्यक्रमांमध्येही परफॉर्म करतो. त्याचे अनेक व्हिडीओही व्हायरल होत असतात.

भारताचा प्रजासत्ताक दिन दुबईत साजरा

शाहरूख खानचा एका कार्यक्रमातील असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. शाहरुख खाननं भारताचा प्रजासत्ताक दिन दुबईत साजरा केला. त्यावेळी शाहरुखनं ग्लोबल व्हिलेजमध्ये त्याच्या चित्रपटसृष्टीतील 29 वर्षांच्या प्रवासचा आनंदही साजरा केला. या कार्यक्रमा दरम्यान, शाहरुखने त्याची आणि दाक्षिणात्य अभिनेत्यांची तुलना करणारं वक्तव्य केलं. त्याच्या या वक्तव्यामुळे त्याचे चाहते मात्र नक्कीच नाराज झाले आहेत.

 कार्यक्रमात परफॉर्म केलं अन् गरीकांसोबत संवादही साधला

शाहरुख खाननं या कार्यक्रमात परफॉर्म केलं तसेच त्याने यावेळी तेथील नागरीकांसोबत संवादही साधला. याच कार्यक्रमातील ही एक क्लिप सोशल मीडियावर व्हायरल होतं आहे. या व्हिडीओत शाहरुखनं त्याच्या दाक्षिणात्य अभिनेत्यांचा उल्लेख करत म्हटलं आहे “माझे सगळे चाहते जे दक्षिण भारतातून आहेत. केरळ, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगाना, तमिळनाडूवरून आहेत. तिथे माझे खूप मित्र देखील आहेत.

“मी आता म्हातारा झालो आहे…”

अल्लू अर्जुन, प्रभास, राम चरण, यश, महेश बाबू, थलपति विजय, रजनीकांत आणि कमल हासन हे सर्व माझे चांगले मित्र आहेत. त्यानंतर पुढे शाहरुखनं मस्करी करत म्हटलं की मी विनंती करतो की त्यांनी इतका फास्ट डान्स करणं बंद करायला हवं. मी आता म्हातारा झालो आहे, तर मला त्यांच्या एनर्जीला मॅच करायला त्रास होतो. आता मला अशा डान्स मूव्ह्स करू शकणार नाही” असं म्हणत त्याने ती एक खंत बोलून दाखवली.

‘राजा हा राजच असतो….’

शाहरुखनं पुढे त्याचा आगामी चित्रपट किंगविषयी देखील सांगितलं. त्यानं हे कन्फर्म केलं की चित्रपटाचं दिग्दर्शन सिद्धार्थ आनंद करणार आहेत. ज्यांनी पठाण या चित्रपटाचं दिग्दर्शनही केलं होतं. शाहरुखनं पुढे म्हणाला की ‘मी तुम्हाला चित्रपटाविषयी जास्त सांगू शकत नाही. पण मी तुम्हाल हे सांगू शकतो की हा चित्रपट मनोरंजक असणार आहे. मी आधी अनेक टायटल वापरले आहेत आणि आता आमच्याकडच्या चांगल्या टायटलची यादी संपली आहे. शाहरुख खान इन अ‍ॅन्ड एज कसं आहे? शाहरुख खान किंग हे थोडं शो ऑफ होऊ शकतं, पण जसं आपण दुबईमध्ये आहोत आणि तुम्हाला सगळ्यांना माहितीये की राजा हा कायम राजाच राहतो.’ असं म्हणत त्याने बादशाह शेवटी एकच असतो हे पुन्हा सर्वांच्या लक्षात आणून दिलं.

पण शाहरूखने स्वत:ला असं म्हातारा म्हणून घेणं त्याच्या चाहत्यांना मात्र आवडलेलं नाही. चाहत्यांनी यावर नाराजी व्यक्त केली आहे.

मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र
मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र.
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?.
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला.
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी.
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्....
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्.....
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य.
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी.
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले...
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले....
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन.
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर..
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर...