AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बड्या सेलिब्रिटीचा खुलासा, 10 वर्षांच्या शाहरुख खानला समोसे विकताना पाहिलंय…, किंग खानचं मोठं रहस्य अखेर समोर

समोसे विकणारा शाहरुख खान इंडस्ट्रीवर राज्य करेल असं वाटलं देखील नव्हतं.... किंग खानबद्दल मोठं रहस्य अखेर समोर... बड्या सेलिब्रिटीचा दावा... सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त शाहरुख  खान  याच्या खासगी आयुष्याच्या चर्चा... 

बड्या सेलिब्रिटीचा खुलासा, 10 वर्षांच्या शाहरुख खानला समोसे विकताना पाहिलंय..., किंग खानचं मोठं रहस्य अखेर समोर
अभिनेता शाहरुख खान
| Updated on: Jun 23, 2026 | 12:17 PM
Share

अभिनेता शाहरुख खान याला आज कोणत्याच ओळखीची गरज नाही. स्वतःच्या मेहनतीच्या जोरावर किंग खानने बॉलिवूडमध्ये स्वतःचं स्थान पक्क केलं आहे. त्यामुळे शाहरुख कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. किंग खान याचा बॉलिवूडमधील प्रवास, त्याची लव्हस्टोरी सर्वांना माहिती आहे… पण शाहरुख खान समोसे विकायचा फार कोणाला माहिती नाही. आता किंग खानबद्दलच मोठं सत्य समोर आलं आहे. बॉलिवूडच्या एका मोठ्या सेलिब्रिटीने शाहरुखबद्दल मोठा खुलासा केला आहे, ‘समोसे विकणारा 10 वर्षांचा मुलगा, एक दिवस बॉलिवूडवर राज्य करेल असं वाटलं देखील नव्हतं..’, असं सेलिब्रिटी म्हणाला.

ज्या सेलिब्रिटीने शाहरुख खान याच्याबद्दल खुलासा केला आहे, ते दुसरे तिसरे कोणी नाहीत, तर दिग्गज अभिनेते पंकज कपूर आहेत. नुकताच झालेल्या एका मुलाखतीत पंकज कपूर यांनी किंग खान याच्या बालपणाबद्दल मोठं सत्य सांगितलं आहे. पंकज कपूर यांनी तेव्हाच्या आठवणी ताज्या केल्या जेव्हा, ते दिल्ली येथील नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा (NSD) मध्ये शिक्षण घेते होते आणि 10 वर्षांचा शाहरुख त्याठिकाणी समोसे विकायचा.

सत्य कदाचित आश्चर्यकारक वाटेल, पण हे अगदी सत्य आहे. पंकज कपूर यांनी खुलासा केला की, 70 च्या दशकात जेव्हा ते एनएसडी (NSD) मध्ये विद्यार्थी होते, तेव्हा एक तरुण मुलगा कॅन्टीनमध्ये वारंवार समोसे आणायचा आणि तो मुलगा दुसरा कोणीही नसून खुद्द शाहरुख खान होता. पंकज कपूर म्हणाले, ‘शाहरुखच्या वडिलांची तेथे कँन्टीन होती, तेथे शाहरुख देखील काम करायचा. पण असं कधीच वाटलं नाही की, समोसे विकणारा 10 वर्षांचा मुलगा कधी संपूर्ण बॉलिवूडवर राज्य करेल…’

सांगायचं झालं तर, शाहरुख खानचा एनएसडी (NSD) शी दीर्घकाळापासून संबंध आहे. त्याचे वडील, मीर ताज मोहम्मद खान, दिल्लीत ‘खातिर’ नावाचं रेस्टॉरंट चालवायचे. शाहरुखने स्वतः अनेकदा सांगितलं आहे की, त्याचे वडील एनएसडीच्या मेस आणि कॅन्टीनशी संबंधित कामकाज सांभाळायचे…

कधीकाळी समोसे विकणार शाहरुख खान आज बॉलिवूडवर राज्य करत आहे. पत्नी आणि तीन मुलांसोबत आनंदी आयुष्य जगत आहेत. शाहरुख खान याच्या संपत्ती बद्दल सांगायचं झालं तर, अभिनेता 12,490 कोटींचा मालक आहे. 1992 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘दीवाना’ सिनेमातून किंग खानने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर अभिनेत्याने कधीच मागे वळून पाहिलं नाही… आजही शाहरुख खान याला मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी चाहते उत्सुक असतात.

Follow Us