AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

खराब कोलेस्ट्रॉल वाढलंय? स्वयंपाकघरातील ‘हा’ मसाला ठरू शकतो फायदेशीर; तज्ञांनी सांगितली वापरण्याची योग्य पद्धत

स्वंयपाकघरातील हा मसाला शतकानुशतके पारंपरिक औषधोपचारात वापरला जात आहे. या मसाल्याच्या सेवनाने कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवण्यास मदत होऊ शकते. चला तर मग आजच्या लेखात आपण या खास मसाल्याबद्दल जाणून घेऊयात ज्याने खराब कोलेस्ट्रॉल कमी होऊ शकते.

खराब कोलेस्ट्रॉल वाढलंय? स्वयंपाकघरातील 'हा' मसाला ठरू शकतो फायदेशीर; तज्ञांनी सांगितली वापरण्याची योग्य पद्धत
खराब कोलेस्ट्रॉल वाढलंय? स्वयंपाकघरातील 'हा' मसाला ठरू शकतो फायदेशीरImage Credit source: Instagram
| Edited By: | Updated on: Aug 26, 2026 | 10:17 AM
Share

आपल्या खाद्यसंस्कृतीत शतकानुशतके अनेक मसाल्यांचा वापर केला जातोय. तर यातील काही मसाल्यांमध्ये औषधी गुणधर्म असल्याचे मानले जाते आणि त्यांचा वापर आयुर्वेदिक औषधोपचारात केला जातो. त्यामध्ये दालचिनी देखील हा असाच एक लोकप्रिय मसाला आहे, जो प्राचीन काळापासून आयुर्वेद आणि पारंपरिक औषधोपचारात वापरला जात आहे. हा मसाला केवळ अन्नाची चवच वाढवत नाही, तर त्याच्या औषधी गुणधर्मांमुळे असंख्य आरोग्य फायदेही मिळतात. गेल्या काही वर्षांत दालचिनीच्या सेवनात झपाट्याने वाढ झाली आहे. कारण हा मसाल कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी दालचिनी प्रभावी मानली जाते. चला तर मग आजच्या लेखात आपण दालचिनीचा वापर कशा प्रकारे तुमच्या आहारात करू शकता ते तज्ञांकडून जाणून घेऊयात.

तज्ञांच्या मते, कोलेस्ट्रॉल हा आपल्या रक्तात आढळणारा एक मेणासारखा पदार्थ आहे. तो आपल्या शरीरातील पेशींसाठी आवश्यक असतो, परंतु जेव्हा त्याचे प्रमाण सामान्य पातळीपेक्षा जास्त होते, तेव्हा तो रक्तवाहिन्यांमध्ये जमा होऊ लागतो. यामुळे हृदय आणि मेंदूला होणाऱ्या रक्तपुरवठ्यात अडथळा येऊ शकतो. जेव्हा कोलेस्ट्रॉलची पातळी मर्यादेपलीकडे वाढते, तेव्हा हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रॉक सारखी समस्या निर्माण होऊ शकतात.

शरीरात खराब कोलेस्ट्रॉलचे प्रमाण हळूहळू वाढल्यास हृदयासाठी समस्या बनू शकते. त्यामुळे त्यावर नियंत्रण ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. यासाठी सर्वोत्तम उपाय म्हणजे स्वंयपाकघरात असलेली दालचिनी. कारण दालचिनीच्या सेवनाने खराब कोलेस्ट्रॉल कमी होते आणि चांगले कोलेस्ट्रॉल वाढते. दालचिनीच्या नियमित सेवनाने शरीरातील वाईट कोलेस्ट्रॉल (LDL) आणि ट्रायग्लिसराइड्स देखील कमी होऊ शकतात.

हा मसाला चांगले कोलेस्ट्रॉल (HDL) राखण्यासही मदत करतो. या दालचिनीमधील सिनामलडीहाइड आणि इतर अँटीऑक्सिडंट्स शरीरातील रक्तप्रवाह सुधारतात आणि धमन्यांमध्ये फॅट जमा होण्याची प्रक्रिया मंदावतात.

दररोज नियमितपणे 1 ते 6 ग्रॅम दालचिनीचे सेवन केल्याने कोलेस्ट्रॉल झपाट्याने कमी होऊ शकते. दालचिनी केवळ कोलेस्ट्रॉलच नियंत्रित करत नाही, तर टाईप 2 मधुमेह नियंत्रित करण्यासही मदत करते. दररोज सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाण्यासोबत चिमूटभर दालचिनी पावडर घेतल्याने कोलेस्ट्रॉलची पातळी झपाट्याने कमी होऊ शकते.

जर तुम्हाला पाण्यात टाकून दालचिनी प्यायला जमत नसेल तर चहामध्ये दालचिनी टाकून तोह चहा प्या. एवढंच नाही तर दालचिनी पावडर तुम्ही ओटमील, स्मूदी किंवा दह्यावरही थोडीशी टाकून घेऊ शकता. मात्र दालचिनी फक्त चिमूटभरच खावी याची खात्री करा. तिचे अतिरिक्त सेवन हानिकारक ठरू शकते. जर तुम्हाला कोणताही गंभीर आजार असेल, तर दालचिनीचे सेवन करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या.

कोलेस्ट्रॉल कमी करण्याव्यतिरिक्त या मसाल्याचे अनेक फायदे आहेत. तो रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित करतो आणि सूज कमी करतो. चयापचय क्रिया सुधारण्यासाठी दालचिनी प्रभावी मानली जाते. ती शरीरातील अँटिऑक्सिडंटची पातळी वाढवून रोगप्रतिकारशक्ती मजबूत करते आणि पचनक्रिया सुधारते. दालचिनीच्या सेवनाने लठ्ठपणा कमी होण्यासही मदत होऊ शकते. विशेषतः गर्भवती महिलांनी याचे सेवन करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

Follow Us