AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Shah Rukh Khan | ‘माझी पत्नी हिंदू, मी मुसलमान आणि आमची मुलं…’, किंग खानच्या वक्तव्यानंतर चाहते म्हणाले…

मुलांच्या धर्माबाबत शाहरुख खान याचं मोठं वक्तव्य; जमलेल्या सर्व सेलिब्रिटींना आणि चाहत्यांना आवडलं किंग खानने दिलेलं उत्तर... व्हिडीओ व्हायरल

Shah Rukh Khan |  'माझी पत्नी हिंदू, मी मुसलमान आणि आमची मुलं...', किंग खानच्या वक्तव्यानंतर चाहते म्हणाले...
| Updated on: Jun 03, 2023 | 5:03 PM
Share

मुंबई : ‘पठाण’, ‘दिलवाले’, ‘डीडीएलजे’, ‘कभी खुशी कभी गम’, ‘कुछ कुछ होता हैं’, ‘कल हो ना हो’ यांसारख्या अनेक सिनेमांमध्ये काम करत अभिनेता शाहरुख खान याने चाहत्यांचं मनोरंजन केलं. किंग खान याच्या चाहत्यांची संख्या फक्त भारतातच नाही तर, साता समुद्रापार देखील प्रचंड मोठी आहे. शिवाय अभिनेत्याला फॉलो करणाऱ्यांची संख्या देखील फार मोठी आहे. त्यामुळे किंग खान आणि त्याच्या कुटुंबाद्दल जाणून घेण्यासाठी चाहते कायम उत्सुक असतात. सर्वत्र शाहरुख खान याच्याबद्दल चर्चा रंगत आहेत. कोणत्याही कार्यक्रमात किंग खान त्याच्या मुलांबद्दल अनेक गोष्टी सांगत असतो. फक्त शाहरुख खान नाही तर अभिनेत्याची पत्नी गौरी खान देखील आर्यन आणि सुहाना खान यांच्याबद्दल अनेक गोष्टी सांगत असते.

आता शाहरुख खान याचा एक जुना व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ज्यामध्ये अभिनेत्याने स्वतःचा. पत्नीचा धर्म सांगत मुलांच्या धर्माबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. मुलांच्या धर्माबद्दल अभिनेत्याने केलेलं वक्तव्य चाहत्यांना देखील प्रचंड आवडलं. शिवाय चाहत्यांनी अभिनेत्याच्या व्हिडीओवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव केला आहे…

एका टीव्ही शोमध्ये किंग खान म्हणाला, ‘माझी पत्नी हिंदू, मी मुसलमान आणि आमची मुलं पूर्ण हिंदुस्तान आहेत…’ किंग खान याचं वक्तव्य जमलेले सर्व सेलिब्रिटींना देखील फार आवडलं. सध्या सोशल मीडियावर अभिनेत्याच्या व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. पुढे अभिनेत्याने मुलांबद्दल एक किस्सा देखील सांगितला.

जेव्हा सुहानाने शाहरुख खान याला धर्म विचारला…

मीडिया रिपोर्ट्सनुसार, शाहरुखची मुलगी सुहाना लहान असताना तिला शाळेत फॉर्म भरण्यास सांगितलं होतं, या फॉर्ममध्ये एका ठिकाणी तिला तिचा धर्म विचारण्यात आला होता… तेव्हा सुहानाने वडिलांना धर्म विचारला, तेव्हा किंग खान म्हणाला, ‘आपण भारतीय आहोत, आपला कोणताही धर्म नाही…’ शाहरुख कायम त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असतो.

आर्यन खान याच्याबद्दल सांगायचं झालं तर, आर्यन याने नुकताच स्वतःचा क्लोदिंग ब्रॉन्ड सुरु केला आहे. शिवाय आर्यन याला अभिनयात आवड नसून तो पडद्यामागे राहून काम करणार आहे. तर दुसरीकडे किंग खान याची मुलगी सुहाना खान हिला मात्र अभिनयाची आवड आहे. सुहाना लवकरच दिग्दर्शक झोया अख्तर दिग्दर्शित ‘द अर्चिज’ सिनेमातून अभिनय क्षेत्रात पाय ठेवणार आहे.

Follow Us
रत्नागिरीत धरणसाठ्यात घट; पाणीसाठा कमी; पाणीबाणीचा धोका कायम
रत्नागिरीत धरणसाठ्यात घट; पाणीसाठा कमी; पाणीबाणीचा धोका कायम
बीडमध्ये रोहित पवारांच्या नेतृत्वाखाली शेतकरी आक्रोश मोर्चा, हजारो...
बीडमध्ये रोहित पवारांच्या नेतृत्वाखाली शेतकरी आक्रोश मोर्चा, हजारो शेतकरी होणार सहभागी
मग आपल्याला स्वतःची...ओमराजेंचं ठाकरे गटातील नेत्याला सडेतोड उत्तर
मग आपल्याला स्वतःची... ओमराजे निंबाळकरांचं ठाकरे गटातील नेत्याला सडेतोड उत्तर, थेट लायकी...
कोथरूडमध्ये सिम्बाच्या स्मरणार्थ बाप्पाचा भावनिक देखावा...
कोथरूडमध्ये सिम्बाच्या स्मरणार्थ बाप्पाचा भावनिक देखावा... प्रेम, आठवण आणि निसर्गाचा संगम
दगडूशेठ गणपती विसर्जनासाठी वक्रतुंड रथ सज्ज
Video : पुण्याच्या गणेशोत्सवाचा मानबिंदू, दगडूशेठ गणपती विसर्जनासाठी वक्रतुंड रथ सज्ज
भाजपच्या विजयाचं मोठं कारण तर... निवडणूक आयोगाबाबत अभिजीत दीपाकेचा...
भाजपच्या विजयाचं मोठं कारण तर... निवडणूक आयोगाबाबत अभिजीत दीपाकेंचा धक्कादायक दावा
नागरिकांनो लक्ष द्या! तीन दिवस बँका बंद राहणार, वाचा नेमकं कारण काय?
नागरिकांनो लक्ष द्या! तीन दिवस बँका बंद राहणार, वाचा नेमकं कारण काय?
गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल; सविस्तर माहिती
गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल; जाणून घ्या सविस्तर माहिती
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी फडणवीसांची मोठी घोषणा; कर्जमुक्ती आणि...
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी फडणवीसांची मोठी घोषणा; कर्जमुक्ती आणि विम्याबाबत दिलासा
दुष्काळी दौरे काजू बदाम खाण्यासाठी आहेत का? ठाकरेंचा सरकारला चिमटा
Uddhav Thackeray : दुष्काळी दौरे काजू बदाम खाण्यासाठी आहेत का? ठाकरेंचा सरकारला चिमटा