AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

300 कोटींचा मन्नत बंगला 29 वर्षांपूर्वी शाहरुख खानच्या कितीला विकत घेतलेला? किंमत ऐकून तुम्ही म्हणाल…

18 जुलैला प्रदर्शित झालेल्या या चित्रपटामुळे शाहरुख खानला मिळाला होता मन्नत बंगला. 29 वर्षांपूर्वी शाहरुख खानच्या या बंगल्याची किंमत किती होती? जाणून घ्या सविस्तर

300 कोटींचा मन्नत बंगला 29 वर्षांपूर्वी शाहरुख खानच्या कितीला विकत घेतलेला? किंमत ऐकून तुम्ही म्हणाल...
| Updated on: Jul 21, 2026 | 6:01 PM
Share

बॉलिवूडचा ‘किंग खान’ म्हणून ओळखला जाणारा अभिनेता शाहरुख खानचा मुंबईतील ‘मन्नत’ हा आलिशान बंगला आज देशातील सर्वाधिक चर्चेत असलेल्या सेलिब्रिटी घरांपैकी एक आहे. विशेष म्हणजे, हा बंगला खरेदी करण्यामागे एक रंजक आठवण दडलेली आहे. 1997 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘यस बॉस’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान पाहिलेलं त्याचं स्वप्न अवघ्या चार वर्षांत प्रत्यक्षात उतरलं.

1997 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘यस बॉस’ या चित्रपटातील लोकप्रिय ‘चांद तारे तोड लाऊं’ या गाण्याचे चित्रीकरण मुंबईतील वांद्रे परिसरात सुरू होते. त्यावेळी शाहरुखची नजर त्या भागातील एका भव्य बंगल्यावर पडली. त्या काळी हा बंगला ‘व्हिला व्हिएन्ना’ या नावाने ओळखला जात होता.

शूटिंगदरम्यान शाहरुख आणि त्याची टीम बंगल्याजवळ गेली असता सुरक्षा रक्षकांनी त्यांना तेथून हटवले. त्यावेळी शाहरुखने आपल्या सहकाऱ्यांशी विनोद करत सांगितले की, ‘एक दिवस हा बंगला माझाच असेल.’ त्यावेळी अनेकांना ते केवळ स्वप्न वाटले, पण अवघ्या चार वर्षांनंतर म्हणजेच 2001 मध्ये शाहरुखने तो बंगला विकत घेतला. पुढे याच बंगल्याचे नाव ‘मन्नत’ ठेवण्यात आले आणि तो शाहरुखच्या यशाचे प्रतीक बनला.

गाण्याचे बोल आणि शाहरुखचे स्वप्न

‘चांद तारे तोड लाऊं’ या गाण्याचे बोल शाहरुखच्या त्या काळातील स्वप्नांशी जणू जुळणारेच होते. या ओळींमधील स्वप्न, यश आणि मोठं होण्याची महत्त्वाकांक्षा शाहरुखने आपल्या मेहनतीच्या जोरावर प्रत्यक्षात साकार करून दाखवली. आज तो केवळ भारतातच नाही तर जगभरातील सर्वाधिक लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक मानला जातो.

या अजरामर गाण्याचे गीतकार जावेद अख्तर होते. संगीतकार जतिन-ललित यांच्या संगीताने गाण्याला वेगळीच उंची दिली तर गायक अभिजीत यांच्या सुरेल आवाजामुळे हे गाणं आजही रसिकांच्या मनात कायम आहे.

‘मन्नत’ आजही चाहत्यांचे आकर्षण

आज ‘मन्नत’ हा केवळ शाहरुख खानचा बंगला नसून त्याच्या संघर्ष, मेहनत आणि स्वप्नपूर्तीचे प्रतीक मानला जातो. दररोज हजारो चाहते या बंगल्याबाहेर येऊन आपल्या आवडत्या अभिनेत्याची एक झलक पाहण्याची वाट पाहत असतात. आज या बंगल्याची किंमत सुमारे 300 कोटी रुपये असल्याचे मानले जाते. मात्र, हा बंगला शाहरुखने 2001 मध्ये सुमारे 18 कोटी रुपयांना विकत घेतला होता.

Follow Us
विधान परिषद निकाल; कोण विजयी? कोण पराभूत? A to Z माहिती
Maharashtra MLC Election Result 2026 : विधान परिषद निकाल; कोण विजयी? कोण पराभूत? A to Z माहिती
शिवसेना कुणाची? शिंदे गटाचा जोरदार युक्तिवाद, व्हीप आणि पक्षांतर्गत...
शिवसेना कुणाची? शिंदे गटाचा जोरदार युक्तिवाद, व्हीप आणि पक्षांतर्गत निवडणुकांवर उपस्थित केले सवाल
सह्याद्रीतील वृक्षतोडीवरून मनोज जरांगे पाटील आक्रमक; मोदींचा...
सह्याद्रीतील वृक्षतोडीवरून मनोज जरांगे पाटील आक्रमक; मोदींचा कार्यक्रम रद्द करण्याची मागणी!
संजय राऊतांच्या अडचणी वाढल्या? सर्वोच्च न्यायालयाचा मोठा आदेश,
संजय राऊतांच्या अडचणी वाढल्या? सर्वोच्च न्यायालयाचा मोठा आदेश, 17 नोव्हेंबरला प्रत्यक्ष हजर राहावे लागणार!
आज माझ्या भावाला जाऊन 9 महिने झाले अन् त्यासोबतच...
आज माझ्या भावाला जाऊन 9 महिने झाले अन् त्यासोबतच... सुप्रिया सुळेंचं भावनिक विधान
ठाण्याची अवस्था बीडपेक्षाही वाईट! अविनाश जाधवांचा सरकारला इशारा, लव
ठाण्याची अवस्था बीडपेक्षाही वाईट! अविनाश जाधवांचा सरकारला इशारा, लवकरच आंदोलनाचा इशारा
एकनाथ शिंदे मीनाक्षी शिंदेंना का वाचवत आहेत? राम पूर्णेकरांचा थेट सवाल
Ram Purnekar : एकनाथ शिंदे मीनाक्षी शिंदेंना का वाचवत आहेत? राम पूर्णेकरांचा थेट सवाल
दिवाळीपूर्वी लाडक्या बहिणींना मोठं गिफ्ट! 344 कोटींचा निधी मंजूर,
दिवाळीपूर्वी लाडक्या बहिणींना मोठं गिफ्ट! 344 कोटींचा निधी मंजूर, खात्यात किती रुपये होणार जमा?
कर्जतमधील वृक्षतोडीविरोधात राज ठाकरेंची आज सभा
Raj Thackeray Sabha Update : कर्जतमधील वृक्षतोडीविरोधात राज ठाकरेंची आज सभा
एकनाथ शिंदेंवरील टीकेने नरेश म्हस्के आक्रमक; थेट पोलिस ठाण्यात तक्रार
एकनाथ शिंदेंवरील टीकेने नरेश म्हस्के आक्रमक; थेट पोलिस ठाण्यात तक्रार दाखल