AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

करीना कपूरच्या किसिंग सीननंतर शाहिदचं ‘त्या’ हिरोसोबत जोरदार भांडण; ‘कॉफी विथ करण’मध्ये खुलासा

शाहिद कपूर आणि करीना कपूर हे दोघं जवळपास पाच वर्षे रिलेशनशिपमध्ये होते. 2006 मध्ये त्यांनी ब्रेकअप केलं. मात्र एकमेकांना डेट करताना शाहिदचं अभिनेता फरदीन खानशी जोरदार भांडण झालं होतं. 'फिदा' या चित्रपटातील किसिंग सीनमुळे हा वाद झाल्याचं म्हटलं गेलं.

करीना कपूरच्या किसिंग सीननंतर शाहिदचं 'त्या' हिरोसोबत जोरदार भांडण; 'कॉफी विथ करण'मध्ये खुलासा
शाहिद कपूर, करीना कपूरImage Credit source: Instagram
| Updated on: Sep 26, 2023 | 1:04 PM
Share

मुंबई | 26 सप्टेंबर 2023 : अभिनेता शाहिद कपूर आणि करीना कपूरची जोडी ही एकेकाळी बॉलिवूडमधील सर्वाधिक चर्चेत असलेली जोडी होती. हे दोघं जवळपास पाच वर्षे एकमेकांना डेट करत होते. शाहिद आणि करीनाच्या अफेअरने बी-टाऊन आणि चाहत्यांचं लक्ष वेधलं होतं. हे दोघं एकमेकांना डेट करत असतानाच शाहिदचं अभिनेता फरदीन खानसोबत जोरदार वाद झाला होता. ‘फिदा’ या चित्रपटात फरदीन आणि करीनाने एकत्र काम केलं होतं. या चित्रपटात दोघांचा किसिंग सीन होता. याच किसिंग सीनवरून हा वाद झाला होता. एका जुन्या मुलाखतीत फरदीन खान या वादाविषयी मोकळेपणे व्यक्त झाला होता. इतकंच नव्हे तर त्याने शाहिदला बालिश म्हटलं होतं.

या मुलाखतीत फरदीन म्हणाला होता, “होय, हे खरंय. आम्ही एकमेकांचे चांगले मित्र नाही आहोत. शाहिद आणि माझं पटत नाही. पण तो काही मोठा वाद नव्हता. तो माझ्या मागे माझ्याबद्दल बरंवाईट बोलत असल्याचं मी खूपदा ऐकलंय. तो जरा बालिशच आहे. त्याला काही समस्या होत्या आणि मी त्याला सांगितलं होतं की माझ्याबद्दल बोलू नकोस. मी आणि करीना फक्त चांगले मित्र आहोत. सुदैवाने आम्ही एकमेकांसोबत जो वेळ घालवला होता, त्यातून आमच्यात एकमेकांविषयी विश्वास आणि कम्फर्ट निर्माण झाला होता. पण त्यापेक्षा अधिक आमच्यात काहीच नाही.”

फरदीनच्या या मुलाखतीनंतर शाहिद कपूर जेव्हा ‘कॉफी विथ करण’ या शोमध्ये पोहोचला, तेव्हा तोसुद्धा फरदीन खानसोबतच्या वादावर व्यक्त झाला. “मला वैयक्तिकरित्या त्याच्याशी काहीच समस्या नाही. जर त्याला माझ्याशी काही समस्या असेल, तर त्याने थेट मला फोन करायला पाहिजे होता किंवा त्याबद्दल थेट माझ्याशी बोलायला पाहिजे होतं. पण त्याने माध्यमांसमोर बोलणं निवडलं. त्यामुळे मी त्यावर अजून काय बोलू शकतो”, असं शाहिद म्हणाला होता.

शाहिद आणि करीना यांचं 2006 मध्ये ब्रेकअप झालं. करीनाने अभिनेता सैफ अली खानशी लग्न केलं. तर शाहिद आणि मीरा कपूर यांनी लग्नगाठ बांधली. करीनाला तैमुर आणि जेह ही दोन मुलं आहेत. तर शाहिद-मीराला मिशा आणि झैद ही दोन मुलं आहेत.

Follow Us
विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ की... गडचिरोलीतील डुम्मे शाळेची धक्कादायक
विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ की... गडचिरोलीतील डुम्मे शाळेची धक्कादायक अवस्था अभिजीत दीपकेकडून उघड
भाजप नेते नरेंद्र पवारांची अत्याचाराच्या आरोपांवर पहिली प्रतिक्रिया,
Narendra Pawar : भाजप नेते नरेंद्र पवारांची अत्याचाराच्या आरोपांवर पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
उपमुख्यमंत्री शिंदे अहमदाबादहून थेट साताऱ्याच्या दरे गावी जाणार, नेमकं
उपमुख्यमंत्री शिंदे अहमदाबादहून थेट साताऱ्यातील दरे'गावी जाणार, नेमकं कारण काय?
PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त देशातील विविध...
PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त देशातील विविध राज्यांमध्ये दीपोत्सव, विशेष प्रार्थना
दुष्काळाच्या मुद्द्यावरून राजकीय वाद; फडणवीसांच्या घोषणेवर ठाकरेंचा...
दुष्काळाच्या मुद्द्यावरून राजकीय वाद; फडणवीसांच्या घोषणेवर ठाकरेंचा पलटवार!
जसंच्या तसं उभारलं मंदिर! मालेगावच्या सावता मंडळातील गणेशोत्सवाच्या...
जसंच्या तसं उभारलं मंदिर! मालेगावच्या सावता मंडळातील गणेशोत्सवाच्या देखाव्याने वेधलं लक्ष
गुलाबराव पाटलांचा विरोधकांवर निशाणा, दुष्काळ आणि शिवसेना फुटीवर मोठं..
गुलाबराव पाटलांचा विरोधकांवर निशाणा, दुष्काळ आणि शिवसेना फुटीवर मोठं वक्तव्य
गोंदियातील या अनोख्या गणपती देखाव्याची देशभर चर्चा, अख्खं...
गोंदियातील या अनोख्या गणपती देखाव्याची देशभर चर्चा, अख्खंच्या आख्खं 80s चं दशक....
दिशा सालियान प्रकरणी आदित्य ठाकरेंना...उद्धव ठाकरेंची मोठी प्रतिक्रिया
मोठी बातमी! दिशा सालियान प्रकरणी आदित्य ठाकरेंना... उद्धव ठाकरेंनी अखेर भूमिका मांडली
शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत सुरू असलेली सुनावणी आज संपली, मात्र...
शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत सुरू असलेली सुनावणी आज संपली, मात्र अगामी सुनावणी थेट...