AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘तो माझा मुलगा नाहीच अन्…’, सावत्र आईसोबत कसं आहे शाहिद कपूर याचं नातं? सुप्रिया पाठक यांचा मोठा खुलासा

Shahid Kapoor : अभिनेता शाहिद कपूर याच्या आई - वडिलांचं घटस्फोट झाल्यानंतर अभिनेत्याच्या वडिलांनी अभिनेत्री सुप्रिया पाठक यांच्यासोबत दुसरा संसार थाटला. दरम्यान, नुकताच झालेल्या एका मुलाखतीत सुप्रिया यांनी सावत्र मुलगा शाहिद याच्याबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. तो माझा मुलगा नाहीच.. असं म्हणत त्यांनी मोठा खुलासा केलाय.

'तो माझा मुलगा नाहीच अन्...', सावत्र आईसोबत कसं आहे शाहिद कपूर याचं नातं? सुप्रिया पाठक यांचा मोठा खुलासा
अभिनेता शाहिद कपूर
| Updated on: Jul 17, 2026 | 9:59 AM
Share

Shahid Kapoor : झगमगत्या विश्वातील सेलिब्रिटी त्यांच्या कामामुळे कमी पण त्यांच्या खासगी आयुष्यामुळे कायम चर्चेत असतात. आता अभिनेता शाहिद कपूर त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. शाहिद कपूर हा वडिला पंकज कपूर यांची पहिली पत्नी नीलिमा आझमी यांचा मुलगा आहे. 1984 मध्ये पंकज आणि नीलिमा यांच्या घटस्फोटानंतर 1988 मध्ये पंकज यांनी अभिनेत्री सुप्रिया पाठक यांच्यासोबत दुसरा संसार थाटला. पंकज आणि सुप्रिया यांची दोन मुलं आहेत. त्यांच्या मुलीचं नाव सना कपूर आणि मुलाचं नाव रुहान कपूर असं आहे. शाहिद कपूर याची सावत्र आई असल्यामुळे सुप्रिया पाठक यांना कायम दोघांच्या नात्याबद्दल प्रश्न विचारला जातो. दरम्यान, नुकताच झालेल्या एका मुलाखतीत सुप्रिया यांनी शाहिद यांच्यासोबत असलेल्या नात्यावर मोठा खुलासा केला आहे.

शाहिद याच्यासोबत कसं आहे सावत्र आई सुप्रिया पाठक यांचं कनेक्शन?

सुप्रिया पाठक यांच्यानुसार, शाहिद याच्यासोबत त्यांचे चांगले संबंध आहे. ‘आम्ही दोघांनी कधीच आमच्यामध्ये घट्ट नातं तयार करण्याचा प्रयत्न केला नाही आणि हे स्वाभाविक आहे. सांगायचं झालं तर, शाहिद माझा मुलगा नाही आणि ही गोष्ट माझ्या मनात देखील कधी आली नाही. माझ्यासाठी तर तो माझा मुलगाच आहे. त्यामुळे सावत्र मुलगा म्हणून प्रश्न विचारल्यानंतर मला विचित्र वाटतं..’

‘ज्याप्रकारे माझी लेक सना आणि मुलगा रुहान आहे, त्याचप्रकारे शाहिद देखील माझा मुलगा आहे.’, ईशान खट्टर याच्यासोबत असलेल्या नात्यावर सुप्रिया म्हणाल्या, ‘त्याच्याबद्दल मला फार काही माहिती नाही. त्यामुळे त्याच्याबद्दल मी फार काही बोलणार नाही. कारण आम्ही दोघेही एकमेकांना फार चांगलं ओळखत नाही. ‘, असं देखील सुप्रिया पाठक म्हणाल्या.

शाहिक कपूर याची आई नीलिमा यांचं दुसरं लग्न

पंकज कपूर यांच्यापासून विभक्त झाल्यानंतर नीलिमा यांनी 1990 मध्ये अभिनेते राजेश खट्टर यांच्यासोबत लग्न केलं आणि मुलगा ईशान याचं जगात स्वागत केलं. सांगायचं झालं तर, सावत्र भावंडांसोबत शाहिद याचे चांगले संबंध आहेत. ईशान याच्यासोबत शाहिद याचे अनेक फोटो आणि व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.

Follow Us
अपघाताच्या चौकशीबाबत सरकारकडून माहिती नाही; सुप्रिया सुळे यांचा संताप
अपघाताच्या चौकशीबाबत सरकारकडून माहिती नाही; सुप्रिया सुळे यांचा संताप
लक्ष्मण हाके यांचा सरकारला इशारा; ओबीसी काय करेल, हे आम्ही दाखवून देऊ
लक्ष्मण हाके यांचा सरकारला इशारा; ओबीसी काय करेल, हे आम्ही दाखवून देऊ...
शिवसेना पक्षचिन्हावर उद्या सुनावणी; एकनाथ शिंदे दिल्लीत दाखल
शिवसेना चिन्हाच्या सुनावणीपूर्वी एकनाथ शिंदे दिल्लीत; म्हणाले, धनुष्यबाण गोठवणे दुर्दैवी
अनावश्यक सोने खरेदी आणि परदेशी प्रवास टाळा, पंतप्रधान मोदींचे आवाहन
अनावश्यक सोने खरेदी आणि परदेशी प्रवास टाळा, पंतप्रधान मोदींचे आवाहन
नवी मुंबईत एक्सपायरी डेट बदलून खाद्यपदार्थांची विक्री
नवी मुंबईत एक्सपायरी डेट बदलून खाद्यपदार्थांची विक्री; एफडीए आणि गुन्हे शाखेची मोठी कारवाई
महाराष्ट्रात पावसाचा ब्रेक! नगरमध्ये 80%, बीडमध्ये 86% तूट
महाराष्ट्रात पावसाचा ब्रेक! नगरमध्ये 80%, बीडमध्ये 86% तूट; सप्टेंबरमध्येही कमी पावसाचा अंदाज
हल्ला केला, काचेच्या बाटल्या फेकल्या, चेनही खेचल्या! पोलीस कुठे होते?
Krushnaraj Mahadik On MNS | हल्ला केला, काचेच्या बाटल्या फेकल्या, चेनही खेचल्या! पोलीस कुठे होते? म्हणत कृष्णराज महाडिक आक्रमक
मनोज जरांगेंच्या भेटीसाठी सरकारचं शिष्टमंडळ सज्ज; तोडग्यासाठी...
Manoj Jarange | मनोज जरांगेंच्या भेटीसाठी सरकारचं शिष्टमंडळ सज्ज; तोडग्यासाठी हालचालींना वेग!
आम्ही 100% उद्धव ठाकरेंसोबतच!; आमदार फुटीच्या चर्चेला पूर्णविराम
Praveen Swami | आम्ही 100% उद्धव ठाकरेंसोबतच!; आमदार फुटीच्या चर्चेला पूर्णविराम, प्रवीण स्वामी थेट म्हणाले...
तुकाराम मुंढे यांच्या निर्णयाला सरकारचा ब्रेक; सुट्टे तेल विक्रीसाठी..
तुकाराम मुंढे यांच्या निर्णयाला सरकारचा ब्रेक; सुट्टे तेल विक्रीसाठी व्यापाऱ्यांना आणखी 1 वर्षाची दिली मुभा