ऐश्वर्याच्या ‘कजरा रे’ गाण्यावर शाहरूखची लेक अन् अगस्त्यचा धम्माल डान्स; व्हिडीओ व्हायरल
मनीष मल्होत्रांच्या दिवाळी पार्टीत सुहाना खान आणि अगस्त्य नंदा यांचा 'कजरा रे' गाण्यावरचा डान्सचा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. ऐश्वर्या रायच्या या लोकप्रिय गाण्याचा श्वेता बच्चननेही आनंद घेतला. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला असून अनेकांनी त्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.

आता दिवाळीमध्ये अनेक सेलिब्रिटी दिवाळी पार्टी आयोजित करत आहेत. जी सर्वात चर्चेत राहणारी दिवाळी पार्टी म्हणजे मनीष मल्होत्राची असते.यावेळीही मनीष मल्होत्राने जंगी पार्टी आयोजित केली होती. ज्यात बॉलिवूडचे जवळपास सर्वच सेलिब्रिटी उपस्थित राहिले होते. करीना कपूर, जेनेलिया डिसूझा, सुहाना खान, श्वेता बच्चन, नुसरत भरुचा, इब्राहिम अली खान आणि जॅकलिन फर्नांडिस यांच्यासह अनेक जण उपस्थित होते. याच पार्टीमधील एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.या व्हिडीओमध्ये शाहरूखची लेक सुहाना खान आणि श्वेता बच्चनचा मुलगा अगस्त्यचा डान्स व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ही जोडी ऐश्वर्या राय बच्चनच्या ‘कजरा रे’ गाण्यावर नाचताना दिसत आहे.
अगस्त्य अन् शाहरूखच्या लेकीचा डान्स
श्वेता बच्चन, अगस्त्य आणि सुहाना बच्चन यांनी ऐश्वर्या राय, अभिषेक बच्चन आणि अमिताभ बच्चन यांच्या सुपरहिट गाण्या “कजरा रे” वर डान्स केला. या व्हिडिओने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. फॅशन इन्फ्लुएंसर साक्षी सिधवानीने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर ही क्लिप शेअर केली. या व्हिडिओमध्ये सुहाना खान, अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदा आणि श्वेता बच्चन देखील या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. श्वेता बच्चन देखील या गाण्याचा आनंद घेताना दिसत आहे.
View this post on Instagram
सुहाना खानने जांभळ्या रंगाची साडी नेसली आहे
सुहाना खानने जांभळ्या रंगाची साडी नेसली आहे. तर अगस्त्यने काळ्या रंगाचा कुर्ता पायजमा घातलेला दिसत आहे. दोघांनी त्यांच्या मैत्रीमुळे अनेकदा बातम्यांमध्ये स्थान मिळवले आहे. म्हणूनच त्यांच्या एकत्रित डान्स व्हिडिओने लगेचच वापरकर्त्यांचे लक्ष वेधून घेतले.
मनीष मल्होत्राची दिवाळी पार्टी
मनीष मल्होत्राची दिवाळी पार्टी दरवर्षी चर्चेत असते, तिच्या ग्लॅमर, संगीत आणि दिवाळीच्या उत्साहामुळे.दरवर्षी, त्याच्या पार्टीत रेखा, काजोल, ओहरी, जॅकलिन फर्नांडिस, वीर पहाडिया, तारा सुतारिया, करीना कपूर, करण जोहर, सारा अली खान आणि हेमा मालिनी यासारख्या अनेक सेलिब्रिटी हजेरी लावत असतात. या पार्टीतील हा व्हिडीओ सध्या व्हायरल होत असून अनेकांनी त्यावर कमेंट्सही केल्या आहेत.
View this post on Instagram
