Shahrukh Khan injured, Mamata Banerjee tweets
Image Credit source: tv9 marathi
शाहरुख खानचा आगामी अॅक्शन-थ्रिलर चित्रपट ‘किंग’ हा 2026 मधील बहुप्रतिक्षित चित्रपटांपैकी एक आहे. चित्रपटाचे चित्रीकरण मे महिन्यात सुरू झाले. चाहते चित्रपटाच्या प्रत्येक अपडेटची आतुरतेने वाट पाहत आहेत. दरम्यान याच चित्रपटाच्या शुटींगदरम्यान मुंबईतील गोल्डन टोबॅको स्टुडिओमध्ये एका अॅक्शन सीनच्या दरम्यान शाहरुख जखमी झाला. सध्या शाहरूख खान उपचारासाठी अमेरिकेला गेला आहे.
ममता बॅनर्जी यांना शाहरूख खानच्या तब्येतीची चिंता
शाहरूख खानच्या अपघाताची बातमी माहिती मिळाल्यानंतर चाहत्यांनी चिंता व्यक्त केली पण. या सर्वांमध्ये ट्वीट व्हायरल होतंय ते ममता बॅनर्जी यांचं. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या शाहरूख खानला भाऊ मानतात. शाहरूखच्या अपघाताची बातमी जाणून त्यांनी चिंता व्यक्त केली आहे. त्यांनी ट्वीट करत शाहरूखच्या तब्येतीबाबत चिंता व्यक्त केली आहे. तसेच तो लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
ममता बॅनर्जी यांनी इंस्टाग्रामवर ट्विट केले
ममता बॅनर्जी यांनी इंस्टाग्रामवर ट्विट केले आहेत. ज्यामध्ये त्यांनी लिहिले की, “माझा भाऊ शाहरुख खानला शूटिंग दरम्यान स्नायूंना दुखापत झाल्याची बातमी समजली. पण मला ही बातमी चिंतेत टाकत आहे. मी त्याला लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा देतो.” ममतांच्या या पोस्टवर प्रतिक्रिया देताना चाहत्यांनीही शाहरुखच्या दुखापतीबद्दल चिंता व्यक्त केली आणि त्याला लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या.
शाहरुख खान उपचारासाठी अमेरिकेत
एका वृत्तानुसार,शाहरुख खान मुंबईतील गोल्डन टोबॅको स्टुडिओमध्ये एका तीव्र अॅक्शन सीनच्या शूटिंग दरम्यान शाहरुख खानला दुखापत झाली. दुखापतीचे नेमके स्वरूप माहित नाही. सूत्रांचे म्हणणे आहे की शाहरुख आता उपचारासाठी अमेरिकेला गेला आहे. “ही गंभीर दुखापत नाही तर स्नायूंमध्ये ताण आहे. गेल्या काही वर्षांत स्टंट टास्क करताना शाहरुखला अनेक दुखापती झाल्या आहेत,” असे निर्मितीशी संबंधित एका सूत्राने सांगितलं आहे.
डॉक्टरांनी शाहरुख खानला महिनाभर ब्रेक घेण्याचा सल्ला दिला आहे.
डॉक्टरांनी शाहरुख खानला किमान एक महिना ब्रेक घेण्याचा सल्ला दिल्याचे वृत्त आहे. त्यामुळे चित्रपटाचे चित्रीकरण थांबवण्यात आले आहे. फिल्म सिटी, गोल्डन टोबॅको आणि यशराज फिल्म्स स्टुडिओ सारखी ठिकाणे जुलै आणि ऑगस्टसाठी बुक करण्यात आली होती, परंतु आता बुकिंग रद्द करण्यात आली आहे. पुढील वेळापत्रक सप्टेंबर किंवा ऑक्टोबरमध्ये पुन्हा सुरू होण्याची अपेक्षा आहे.
‘किंग’मध्ये शाहरुख खान व्यतिरिक्त हे कलाकार आहेत
‘किंग’ शाहरुख खान व्यतिरिक्त, या चित्रपटात अभिषेक बच्चन, राणी मुखर्जी, दीपिका पदुकोण, अर्शद वारसी, अभय वर्मा, अनिल कपूर, जॅकी श्रॉफ, राघव जुयाल, जयदीप अहलावत, सौरभ शुक्ला आणि सुहाना खान यांसारखे दिग्गज कलाकार आहेत. तथापि, अधिकृत प्रदर्शन तारीख निश्चित झालेली नाही. असे म्हटले जात आहे की हा चित्रपट 2026 च्या गांधी जयंतीला प्रदर्शित होईल.