AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

श्वेता तिवारीच्या त्या आरोपांवर शालिनी ठाकरे संतापल्या, थेट पोस्ट करत दिला इशारा, नेमकं काय म्हणाल्या?

टीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारीच्या त्या आरोपांवर मनसेच्या पदाधिकारी शालिनी ठाकरे यांनी आता थेट अभिनेत्रीला दिलं प्रत्युत्तर. पोस्ट शेअर दिला थेट इशारा.

श्वेता तिवारीच्या त्या आरोपांवर शालिनी ठाकरे संतापल्या, थेट पोस्ट करत दिला इशारा, नेमकं काय म्हणाल्या?
| Updated on: Aug 22, 2026 | 7:10 PM
Share

अभिनेत्री श्वेता तिवारीने सोशल मीडियावरील महिलांविरोधातील आक्षेपार्ह भाषेवर आवाज उठवत एका व्यक्तीचा स्क्रीनशॉट शेअर केला होता. संबंधित व्यक्ती डॉक्टर असून तो मनसे समर्थक असल्याचा दावा श्वेता तिवारीने केला होता. या प्रकरणावरून आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकारी शालिनी ठाकरे यांनी श्वेता तिवारीला थेट प्रत्युत्तर दिलं आहे.

‘एखाद्या व्यक्तीचा फोटो राज ठाकरे यांच्यासोबत आहे म्हणून त्याच्या वागण्याचा संबंध राज ठाकरे यांच्याशी जोडणे हा शुद्ध मूर्खपणा आहे,’ अशा शब्दांत शालिनी ठाकरे यांनी श्वेता तिवारीच्या भूमिकेवर सवाल उपस्थित केला आहे.

शालिनी ठाकरेंच्या पोस्टमध्ये काय?

शालिनी ठाकरे म्हणाल्या, ‘मी राजसाहेबांच्या पक्षाची एक पदाधिकारी आहे. आमचा पक्ष हा महाराष्ट्राच्या अस्मितेचा पक्ष आहे. छत्रपती शिवाजी महाराज आमचे दैवत आहेत. स्त्रियांचा सन्मान करणे हे आमच्या संस्कारात आणि रक्तात भिनले आहे. एखाद्या विकृत माणसाने महिलेशी गैरवर्तन केले तर त्याला धडा शिकवण्याची ताकद मनसेच्या मनगटात आहे. राजसाहेब आणि त्यांचे पदाधिकारी, महिलांचा किती आणि कसा सन्मान करतात हे मला सांगायची गरज वाटत नाही. संपूर्ण महाराष्ट्र हे जाणून आहे. कोणत्याही महिलेला अपशब्द बोलणे हे चूकच…. पण फक्त कोणाचातरी फोटो राजसाहेबांसोबत आहे म्हणून त्याच्या वागण्याचा संबंध राजसाहेबांशी जोडणे हा शुद्ध मूर्खपणा आहे.

मी पुढे एवढंच म्हणेन की कलाकारांनी समाजात इतर महिलांवर होणाऱ्या अत्याचारांवर सुद्धा आवाज उठवावा व सरकारला प्रश्न विचारावे. बलात्काराच्या आरोपींना हार तुरे घालणाऱ्यांचा निषेध करा, महाराष्ट्रातून गायब होणाऱ्या तरुण मुलींबद्दल सरकारला प्रश्न विचारा, 2014 पासून सुरू झालेल्या वाईट ऑनलाईन ट्रोलिंग बद्दल सरकारला जाब विचारा…

आपल्या कार्यक्रमाला प्रसिद्धी मिळावी म्हणून मराठी माणूस, राजसाहेब आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा वापर करू नका…असं शालिनी ठाकरे यांनी म्हटलं आहे.

त्यामुळे श्वेता तिवारीने सोशल मीडियावरील ट्रोलिंग विरोधात उपस्थित केलेल्या मुद्द्याला आता मनसेकडून थेट राज ठाकरे आणि पक्षाच्या नावाचा वापर केल्याच्या मुद्द्यावरून प्रत्युत्तर मिळालं आहे. या वक्तव्यामुळे श्वेता तिवारी आणि मनसे यांच्यातील हा वाद आणखी चर्चेत आला आहे.

Follow Us
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा;
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा; म्हणाले, बॉन्डवर स्वाक्षरी...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट दिलं आव्हान!
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल;
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, 'भारतासाठी...
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम
अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं
मोठी बातमी! अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं काय घेडलं?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी...
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी मागणी, शेतकऱ्यांना मिळणार दिलासा?
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी;
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी; बैठकीत घेतला मोठा निर्णय
15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट...
Dhruv Rathee | 15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट करत आरोप
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात...
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात... बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ