Video | जान्हवी कपूर विसरा, जब्याच्या शालूचा ‘नदियो पार…’ अंदाज पाहा!

Video | जान्हवी कपूर विसरा, जब्याच्या शालूचा ‘नदियो पार...’ अंदाज पाहा!
राजेश्वरी खरात

बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूरच्या आगामी चित्रपटातील अर्थात ‘रूही’मधील ‘नदियो पार...’ या गाण्यावर राजेश्वरीने ठुमके लगावले आहेत.

Harshada Bhirvandekar

|

Mar 18, 2021 | 11:03 AM

मुंबई : मराठी चित्रपटाचे आघाडीचे दिग्दर्शक नागराज मंजुळेंच्या (Nagraj Manjule) यांचा गाजलेल्या ‘फँड्री’ (Fandry) या चित्रपटातील सोज्वळ चेहऱ्याची शालू म्हणजेच राजेश्वरी खरात (Rajeshwari Kharat) नेहमीच सोशल मीडियावर खूप अॅक्टिव असते. ती चाहत्यांसाठी वेगवेगळे फोटो आणि व्हिडीओ नेहमीच शेअर करत असते. एरव्ही सोज्वळ अवतारात दिसणारी अभिनेत्री आता चक्क ग्लॅमारस अवतारात दिसू लागली आहे. (Shalu Fame Actress Rajeshwari  Kharat Share dance video on Janhvi Kapoor Nadiyon Paar song)

तिचे काही हॉट फोटो आणि व्हिडीओ सध्या तिच्या सोशल मीडियावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. नुकताच राजेश्वरी खरातने तिच्या सोशल मीडियावर तिचा एक व्हिडीओ शेअर केला आहे आणि तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर धूमाकुळ देखील घालत आहे. राजेश्वरीचा हा व्हिडीओ चाहत्यांना आवडला आहे. बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूरच्या आगामी चित्रपटातील अर्थात ‘रूही’मधील ‘नदियो पार…’ या गाण्यावर राजेश्वरीने ठुमके लगावले आहेत.

पाहा शालूचा ‘नदियो पार…’ अंदाज

 (Shalu Fame Actress Rajeshwari  Kharat Share dance video on Janhvi Kapoor Nadiyon Paar song)

अशी मिळाली होती ‘शालू’ची भूमिका!

‘फँड्री’ चित्रपटात अनेक नवीन बालकलाकारांची निवड केली गेली होती. ज्यात ‘शालू’ नावाचे पात्र साकारणाऱ्या राजेश्वरी खरात हिचा देखील समावेश होता. या चित्रपटातील तिचे सौंदर्य आणि अभिनय प्रेक्षकांना फारच भावला. या चित्रपटासाठी नागराज यांना एका अभिनेत्रीचा शोध होता. पण काही केल्या ती सापडत नव्हती. नागराज यांनी राजेश्वरीला एकदा पुण्यात पहिले होते. त्यानंतर तिलाच आपल्या चित्रपटात अभिनेत्री म्हणून घ्यावे असे नागराज मंजुळे यांना वाटले.

यासाठी नागराज यांनी तिच्या गावाचा शोध घेतला. ती राहत असलेले नगर जिल्ह्यातील गाव त्यांनी शोधून काढले. सुरुवातीला राजेश्वरीच्या आई-वडिलांनी तिला चित्रपटात काम करण्यास परवानगी दिली नव्हती. मात्र, नागराज यांनी खूप समजूत काढल्यावर अखेर ते राजी झाले होते.

‘फँड्री’नंतर प्रचंड बदलली शालू!

राजेश्वरीने आपल्या सहज सुंदर अभिनयाने चित्रपटात उत्कृष्ट काम केले. आपल्या अभिनयाने तिने रसिकांच्या मनावर ठसा उमटवला. ‘शालू’चे पात्र अविस्मरणीय बनवण्यासाठी मेहनत घेणारी शालू आता प्रचंड बदलली आहे. ‘फँड्री’ चित्रपटात अत्यंत साधी दिसणारी राजेश्वरी आता, मात्र ग्लॅमरस अंदाजात प्रेक्षकांसमोर आली आहे.

चित्रपटात राजेश्वरीच्या वाट्याला जास्त डायलॉग आले नसले तरी, तिने तिच्या नजरेनेच सगळ्यांची मने जिंकली होती. तिच्या चेहऱ्यावरील सहज अभिनय चाहत्यांना भावला होता. चित्रपटात जब्याप्रमाणे शालूच्या भूमिकेला तितकीशी लोकप्रियता मिळाली नाही. ‘फँड्री’ नंतर राजेश्वरीने ‘आयटमगिरी’ या चित्रपटात काम केले. परंतु, तो चित्रपटही फार कमाल दाखवू शकला नाही. त्यानंतर ती कोणत्याही चित्रपटात दिसली नाही. मात्र इतक्या काळानंतर ती बदलेल्या अवतारात पुन्हा एकदा रसिक प्रेक्षकांसमोर आली आहे.

(Shalu Fame Actress Rajeshwari  Kharat Share dance video on Janhvi Kapoor Nadiyon Paar song)

हेही वाचा :

Video | कोच रिकामा, मग मराठी अभिनेत्रीचं छय्यां छय्यां, पहा व्हिडीओ !

Video | ‘महाराष्ट्राज बेस्ट डान्सर’च्या मंचावर थिरकण्यासाठी पूजा सावंतने घेतली ‘इतकी’ मेहनत, पाहा व्हिडीओ…

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें