Shashank Ketkar : कॉकपीटमध्ये CCTV कॅमेरा..; Flydubai विमानातील स्मित मच्छार प्रकरणानंतर शशांक केतकरचा सवाल, नेटकरीही पडले पेचात
Shashank Ketkar : मराठी अभिनेता शशांक केतकर सोशल मीडियावर कायम सक्रिय असतो. आता अभिनेत्यानं विमानासंदर्भात सोशल मीडियावर केलेली पोस्ट चर्चेत आली असून नेटकरीही बुचकळ्यात पडले आहेत.

जेव्हा आकाशात उंच भरारी घेणारे शूरवीर दहशतवादाकडे वळतात, तेव्हा जगाची चिंता रास्त ठरते. अलीकडेच, फ्लायदुबईच्या एका विमानात, एका ओमानच्या सह-वैमानिकानं १७४ प्रवाशांचा जीव धोक्यात घालून विमान हायजॅक करण्याचा एक भयानक प्रयत्न केला. भारतीय कॅप्टन स्मित मच्छार यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता हा प्रयत्न हाणून पाडला. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्मित मच्छार यांचं कौतुक केलं असून अनेक कलाकारांनीही स्मित यांच्या धाडसाचं कौतुक केलं आहे. अशातच आता मराठी अभिनेता शशांक केतकरनं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत एक सवाल केला असून अभिनेत्याची पोस्ट चर्चेत आली आहे.
शशांक केतकरची पोस्ट
मराठी अभिनेता शशांक केतकर सोशल मीडियावर कायम सक्रिय असतो. अभिनेता सामाजिक तसेच राजकीय विषयांवर आपलं मत मांडतो. आता अभिनेत्यानं विमानासंदर्भात पोस्ट शेअर केली आहे. अभिनेत्यानं सोशल मीडियावर पोस्ट करत लिहिलं की, ‘या आधीही पडला होता..आता पुन्हा एकदा मला तोच प्रश्न पडला आहे … ज्यांना यातली technical माहिती आहे त्यांनी सांगावे! विमानात…कॉकपीटमध्ये CCTV कॅमेरा का नसतो ?’
‘२०२६ मध्ये आहोत आपण…तंत्रज्ञान इतके पुढे गेलेले असताना, साध्या साध्या बसमध्ये पण कॅमेरा असतो, लोकल ट्रेन मध्ये कॅमेरा असतो…विमानात अजूनही का नसतो ???? तांत्रिक कारण काय असावं?’ असा सवाल शशांकनं केला आहे.
View on Threads
अभिनेत्याची ही पोस्ट पाहून नेटकरीही बुचकळ्यात पडले आहेत. ‘एक अर्ज टाका कोर्टात की, मला माझ्या खर्चाने विमानात कॅमेरा बसवायचा आहे म्हणून…’, ‘त्याला तसं काही ठोस कारण नाहीये. एकतर कॅमेरा असावा असं काही बंधन नाहीये, अनेक पायलटचा या गोष्टीला विरोध आहे. दुसरं, विमानातील CVR आणि FDR तंत्रज्ञान आधीच भरपूर माहिती गोळा करतात, ज्यातून तपासकामी येणारी बहुतेक माहिती मिळतेच. तिसरे, जगातील प्रत्येक विमानात CCTV बसवायचा म्हटलं तरी त्यामागे येणारा खर्च प्रचंड वाढेल, त्यासाठी लागणारी यंत्रणाही किचकट आणि खर्चिक आहे. त्यामुळे व्यावसायिक विमान कंपन्या स्वेच्छेने हा खर्च करणार नाहीत.’ अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत.
