लोकांना कमी लेखणाऱ्या जया बच्चन यांच्यावर संतापले शत्रुघ्न सिन्हा, आगीत तेल ओतायचं केलं काम

Jaya Bachchan - Shatrughan Sinha : लोकांना कायम कमी लेखणं जया बच्चन यांना पडलं महागात, संतापले शत्रुघ्न सिन्हा... केलं मोठं वक्तव्य.. शत्रुघ्न सिन्हा यांच्याकडून आगीत तेल ओताण्याचं काम, सध्या सर्वत्र शत्रुघ्न सिन्हा यांच्या वक्तव्याची चर्चा...

लोकांना कमी लेखणाऱ्या जया बच्चन यांच्यावर संतापले शत्रुघ्न सिन्हा,  आगीत तेल ओतायचं केलं काम
Actress Jaya Bachchan
| Updated on: Dec 11, 2025 | 11:12 AM

Jaya Bachchan – Shatrughan Sinha : महानायक अमिताभ बच्चन यांची पत्नी जया बच्चन गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर चर्चेत आहेत. जया बच्चन कायम असं काही वक्तव्य करतात ज्यामुळे संतापाची लाट उसळते… कायम पापाराझींवर भडकणाऱ्या जया बच्चन यांनी काही दिवसांपूर्वी त्यांच्या कपड्यांवर मोठं वक्तव्य केलं होतं. ज्यामुळे सोशल मीडियावर जया बच्चन यांनी ट्रोलिंगचा सामना करावा लागला… एका कार्यक्रमादरम्यान, जया बच्चन यांनी पापाराझींच्या कपड्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना दिसल्या, ज्यामुळे सोशल मीडियावर त्यांना प्रचंड ट्रोल करण्यात आले.

आता, बॉलिवूड अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांनी जया बच्चन यांच्यावर अशा विधानाबद्दल टीका केली आहे. नुकतात. शत्रुघ्न सिन्हा एका कार्यक्रमात उपस्थित होते. कार्यक्रमात शत्रुघ्न सिन्हा यांनी यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. यावेळी शत्रुघ्न सिन्हा यांनी जय बच्चन यांचं नाव घेतलं नाही. समोरच्याला लगेच कळेल असं वक्तव्य केलं आहे. शत्रुघ्न सिन्हा म्हणाले, ‘तुम्ही सगळे चांगले दिसता… चांगली पँट देखील घालता आणि चांगला शर्ट देखील घालत…’ सध्या शत्रुघ्न यांचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

 

 

काय म्हणाल्या होत्या जया बच्चन?

 

 

एका कार्यक्रमात पापाराझींसोबत नातं कसं आहे? असा प्रश्न जया बच्चन यांना विचारण्यात आला. यावर जया बच्चन म्हणाल्या, ‘मी मीडियामधून आहे. माझे वडील पत्रकार होते. मला माध्यमांचा खूप आदर आहे. ‘पण बाहेर उभे असलेले घाणेरडी पँट घातलेले विचित्र लोकल मोबाईल घेऊन असतात आणि त्यांना वाटतं आपण फोटो काढू शकतो… आणि नको त्या कमेंट करत असतात.. कोणत्या प्रकारची लोकं आहेत ही? कुठून येतात, त्यांचं काय शिक्षण आहे.. बॅकग्राउंड काय आहे?’ असं जया बच्चन म्हणाल्या होत्या.

ही पहिली वेळ नाही जेव्हा जया बच्चन यांनी पापाराझींवर संताप व्यक्त केला आहे. याआधी देखील अनेकदा याच कारणामुळे जया बच्चन वादाच्या भोवऱ्यात अडकल्या आहेत. ज्यामुळे त्यांच्यावर अनेकांनी जया बच्चन यांच्यावर संताप व्यक्त केला तर, अनेकांनी त्यांचं समर्थन देखील केलं.