AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शत्रुघ्न सिन्हा यांची संपत्ती कोणाच्या नावावर, सोनाक्षीला नाही मिळणार काहीच?

बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा हिने झहीर इक्बाल सोबत विवाह केला आहे. दोघांनी ही रजिस्टर मॅरेज केले आहे. सोनाक्षी आणि झहीर गेल्या अनेक वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते. सोनाक्षीचे वडील शत्रुघ्न सिन्हा यांच्याकडे करोडोंची संपत्ती आहे. पण या संपत्तीत सोनाक्षीला काहीही मिळणार नाहीये, कारण

शत्रुघ्न सिन्हा यांची संपत्ती कोणाच्या नावावर, सोनाक्षीला नाही मिळणार काहीच?
| Updated on: Jun 25, 2024 | 6:07 PM
Share

बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा हिने तिचा बॉयफ्रेंड झहीर इक्बाल सोबत विवाह केला आहे. तिच्या लग्नामुळे ती सध्या चर्चेत आहे. 23 जून रोजी झहीर इक्बाल आणि सोनाक्षी सिन्हा यांचा विवाह पार पडलाय. दोघेही वेगवेगळ्या धर्माचे असल्याने त्यांनी रजिस्टर मॅरेज केले आहे. आता अभिनेत्रीच्या एकूण संपत्तीबद्दल बोललो तर तिच्याकडे प्रचंड संपत्ती आहे. सोनाक्षी सिन्हाकडे आलिशान घर आणि आलिशान कार आहे. तिची संपत्तीही करोडोंमध्ये आहे. तिचे वडील शत्रुघ्न सिन्हा यांच्या संपत्तीबद्दल बोलायचे झाले तर त्यांची एकूण संपत्ती 210 कोटी रुपये आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, त्याच्या रामायण नावाच्या घराची किंमत 88 कोटी रुपये इतकी आहे.

सिन्हा यांच्याकडे किती संपत्ती

मिळालेल्या माहितीनुसार, शत्रुघ्न सिन्हा यांच्याकडे पाच घरे आहेत. जी पाटणा, मुंबई, मेहरौली, डेहराडून आणि दिल्ली येथे आहेत. मात्र आश्चर्याची गोष्ट म्हणजे शत्रुघ्न सिन्हा यांनी ही सर्व मालमत्ता त्यांच्या मुलांच्या नावावर आहे. त्यामुळे सोनाक्षी सिन्हा हिच्या नावावर काहीच नसल्याने तिला वडिलांकडून काहीही मिळणार नसल्याचं दिसतंय. सोनाक्षी सिन्हाने घर बांधण्यासाठी वडिलांकडून पैसेही घेतले होते.

सोनाक्षीचे मुंबईत घर

सोनाक्षी सिन्हाने तिचे वडील शत्रुघ्न सिन्हा यांच्याकडून मुंबईतील अपार्टमेंट खरेदी करण्यासाठी 11.58 कोटी रुपये घेतले होते. या घराची एकूण किंमत आता 14 कोटी रुपये आहे. सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल यांचा विवाह झाल्यानंतर आता दोघेही नव्या संसाराला सुरुवात करणार आहेत. झहीर इक्बालला इंडस्ट्रीत विशेष ओळख मिळवता आली नसली तरी त्याचे वडील हे एक मोठे उद्योगपती आहेत.

सोनाक्षीचे आई-भाऊ नाराज

सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल यांचा विवाह झाल्यानंतर अनेकांनी त्यांना ट्रोल देखील केले. कारण दोघेही वेगवेगळ्या धर्माचे असल्याने त्यांना ट्रोलिंगचा सामना करावा लागला. इतकंच नाही तर सोनाक्षीची आई आणि भाऊ देखील नाराज असल्याची चर्चा आहे. लग्न पार पडल्यानंतर एका हॉटेलमध्ये दोघांनी रिसेप्शन पार्टी ठेवली होती. ज्यामध्ये कुटुंबीय, जवळचे मित्र आणि बॉलिवूडचे स्टार्स सहभागी झाले होते. या खास प्रसंगी सोनाक्षीचे दोन्ही भाऊ लव-कुश गायब होते. त्यामुळे ते नाराज असल्याची चर्चा आहेच.

सना मलिकांकडून वडील मलिकांची पाठराखण, NCP महायुतीत सामील होणार की..?
सना मलिकांकडून वडील मलिकांची पाठराखण, NCP महायुतीत सामील होणार की..?.
अजितदादांचा मुंबईत मोठा डाव, थेट सना मलिक यांच्या नेतृत्त्वात लढवणार?
अजितदादांचा मुंबईत मोठा डाव, थेट सना मलिक यांच्या नेतृत्त्वात लढवणार?.
...तरी शिवतीर्थवरचा चाफा काही केल्या बोलेना...शेलारांचा ठाकरेंना टोला
...तरी शिवतीर्थवरचा चाफा काही केल्या बोलेना...शेलारांचा ठाकरेंना टोला.
कोकाटे यांची अटक अटळ? कायदेशीर अडचणी वाढल्या, सुनावणी पुढे ढकलली अन्..
कोकाटे यांची अटक अटळ? कायदेशीर अडचणी वाढल्या, सुनावणी पुढे ढकलली अन्...
पाकिस्तानी बोली बोलणाऱ्यांना देशवासी माफ करणार नाहीत - एकनाथ शिंदे
पाकिस्तानी बोली बोलणाऱ्यांना देशवासी माफ करणार नाहीत - एकनाथ शिंदे.
इकडं अटक वॉरंट जारी अन् तिकडं कोकाटे लिलावती रुग्णालयात दाखल, झाल काय?
इकडं अटक वॉरंट जारी अन् तिकडं कोकाटे लिलावती रुग्णालयात दाखल, झाल काय?.
ठाकरे सेना ही राहुल गांधींची टेस्ट ट्यूब बेबीची शिवसेना...कुणाची टीका?
ठाकरे सेना ही राहुल गांधींची टेस्ट ट्यूब बेबीची शिवसेना...कुणाची टीका?.
गड-किल्ल्यांवरील हिरवी चादर स्वतःच गुंडाळा, अन्यथा... राणेंचा इशारा
गड-किल्ल्यांवरील हिरवी चादर स्वतःच गुंडाळा, अन्यथा... राणेंचा इशारा.
माणिकराव कोकाटेंचं मंत्रिपद धोक्यात, अटक वॉरंट जारी; प्रकरण नेमकं काय?
माणिकराव कोकाटेंचं मंत्रिपद धोक्यात, अटक वॉरंट जारी; प्रकरण नेमकं काय?.
शिवतीर्थावरील चाफा...आशिष शेलारांकडून ठाकरे बंधूंवर खोचक टीका
शिवतीर्थावरील चाफा...आशिष शेलारांकडून ठाकरे बंधूंवर खोचक टीका.