Shefali Jariwala : शेफाली जरीवालाचा पती कोण? परागची कांटा गर्लसोबत पहिली भेट झाली कुठे, असे जुळले सूर
Shefali Jariwala Passed Away: `कांटा लगा गर्ल` गाण्याने देशभरात लोकप्रिय झालेली प्रसिद्ध मॉडेल शेफाली जरीवाला आता जगात नाही. हृदयविकाराच्या झटक्याने तिचे निधन झाले. कोण आहे तिचा पती, काय आहे त्याचे नाव, करतो काय?

Shefali Jariwala Husband : ‘बिग बॉस 13’ आणि `कांटा लगा गर्ल` गाण्याने देशभरात रातोरात लोकप्रियतेच्या शिखरावर पोहचलेली मॉडेल शेफाली जरीवाला हिचे 27 जून रोजी मुंबईत निधन झाले. हृदय विकाराच्या झटक्याने तिचा मृत्यू झाला. तिने अवघ्या 42 व्या वर्षीच जगाचा निरोप घेतला. तिच्या मृत्यूनंतर चाहत्यांना धक्का बसला आहे. सोशल मीडियावर अनेक जण त्यांच्या भावना व्यक्त करत आहेत. शेफालीने पराग त्यागी यांच्याशी लग्न केले होते. त्यागी हे कलाकार आहेत.
कोण आहे शेफाली जरीवालाचा पती
शेफाली जरीवाला हिचे पती पराग त्यागी एक टीव्ही कलाकार आहे. “ए वेडनसडे”, “जोधा अकबर”, “फिर” आणि “सरकारू वारी पाटा” चित्रपटातही त्यागी यांनी काम केले आहे. उत्तरप्रदेशातील गाजियाबाद हे त्यागीचे जन्मगाव आहे. त्यागी 49 वर्षांचा आहे. त्यांनी अनेक टीव्ही शो आणि चित्रपटात काम केले आहे. टेलिव्हिजन आणि सिनेमा या दोन्ही क्षेत्रात त्याने स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे.
अशी झाली दोघांची भेट
वृत्तानुसार, एका पार्टीत दोघांची भेट झाली होती. या दोघांना एकमेकांचा स्वभाव आवडला. शेफालीने त्यापूर्वी संगीतकार हरमीत सिंह (मीत ब्रोज) सोबत घटस्फोट घेतला होता. त्यानंतर परागला तिने चार वर्षे डेट केले. त्यानंतर या दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. 2014 मध्ये दोघांनी लग्न केले.
दोघांनी अनेक रियालिटी शोजमध्ये भाग घेतला. पराग आणि शेफाली या दोघांनी नच बलिए 5 व्या आणि 7 व्या हंगामात नृत्य अविष्कार दाखवला होता. मृत्यूपूर्वी शेफालीने 3 दिवस अगोदर फोटोशूट केले होते. तिचा फिटनेस पण चांगला होता. कॉर्डिओ अरेस्टमुळे तिचे निधन झाल्याने चाहत्यांना आणि कुटुंबियांना जबरदस्त झटका बसला. माहितीनुसार, शेफालीची 11 वाजता तब्येत अचानक बिघडली. तिच्या छातीत दुखायला लागले. त्यामुळे पराग त्यागी यांनी तिला तात्काळ जवळच्या रुग्णालयात हलवले. तिथे तिला मृत घोषित करण्यात आले. इतक्या कमी वयात शेफालीच्या जाण्याने तिच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे. चाहत्यांनी हळहळ व्यक्त केली आहे.
