शिल्पा शेट्टी – अक्षय कुमार याचं लग्न का रखडलं? अनेक वर्षांनंतर निर्मात्यानं सांगितलं मोठं सत्य
अभिनेता शिल्पा शट्टी आणि अभिनेता अक्षय कुमार यांनी अनेक सिनेमांमध्ये काम केलं. तेव्हा त्यांच्या खासगी आयुष्याच्या चर्चांनी देखील जोर धरलेला. दोघांचं लग्न देखील होणार होतं. पण ते शक्य झालं नाही. यावर प्रसिद्ध अभिनेत्याने अनेक वर्षांनंतर मैन सोडलं आहे.

Shilpa Shetty – Akshay Kumar : अभिनेता शिल्पा शट्टी आणि अभिनेता अक्षय कुमार आज त्यांच्या आयुष्यात आनंदाने जगत आहेत. पण एक काळ असा होता जेव्हा फक्त बॉलिवूड नाहीतर, चाहत्यांमध्ये देखील अक्षय आणि शिल्पा यांच्या नात्याची चर्चा रंगलेली. मोठ्या पडद्यावरील दोघांच्या जोडीला चाहत्यांनी डोक्यावर घेतलंच, पण खासगी आयुष्यात देखील दोघांच्या नात्याची चर्चा रंगली होती. एवढंच नाही तर, दोघांचं लग्न देखील होणार होतं, पण ते शक्य झालं नाही. यावर अनेक वर्षांनंतर दिग्दर्शक आणि निर्माते सुनील दर्शन यांनी मोठा खुलासा केला आहे. नुकातच झालेल्या एका मुलाखतीत सुनील दर्शन यांनी त्यांच्या नात्याबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे.
शिल्पा शेट्टी हिचं का झालं ब्रेकअप?
एका मुलाखतीत सुनील दर्शन यांनी सांगितलं की, ‘जानवर’ सिनेमाचं शुटिंग सुरु होतं. तेव्हा अक्षय आणि शिल्पा सिरियस रिलेशनशिपमध्ये होते. त्या काळात त्यांचं नातं फार घट्ट होतं… मला तर वाटलेलं दोघं लग्न करणार आहेत. पण तसं काही झालं नाही. दोघांमध्ये काही कारणांवरुन गैरसमज निर्माण झाले आणि त्यांचे ब्रेकअप झालं…’, असं देखील सुनील म्हणाले.
जेव्हा निर्मात्यांना त्याच्या चित्रपटांमध्ये गुंतवणूक करायची नव्हती
एका मुलाखतीत सुनील दर्शन यांनी सांगितलं की, एकेकाळी अक्षय कुमारच्या सिनेमांची विक्री होत नसल्यामुळे निर्मात्यांनी त्यात गुंतवणूक करणं थांबवलं होतं. अभिनेत्याचे सिनेमे सलगपणे अपयशी ठरत होते, ज्यामुळे सर्व निर्मात्यांनी आपला पाठिंबा काढून घेतला होता. त्यानंतर ‘जानवर’ सिनेमा प्रदर्शित झाला आणि सिनेमा बॉक्स ऑफिसवर हीट देखील ठरला…
तेव्हा अभिनेत्याचे थांबवण्यात आलेले सिनेमे प्रदर्शित करण्यात आले. ‘जानवर’ सिनेमानंतर ‘धडकन’ सिनेमा देखील हीट ठरला, त्यानंतर अक्षय यांच्या सिनेमांना प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं. त्यानंतर अभिनेत्याने कधीच मागे वळून पाहिलं नाही. ‘हेरा फेरी’ देखील हीट ठरला…. एवढंच नाही तर, मी आणि अक्षय मिळून 7 सिनेमांमध्ये काम केलं… असं देखील सुनील दर्शन म्हणाले.
100 सिनेमांचं काम करण्याचं वचन
एका मुलाखतीत सुनील दर्शन यांनी अक्षय कुमारशी संबंधित एक किस्सा सांगितला. ‘जानवर’ (Jaanwar) हा सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर, अक्षय कुमारच्या कानावर अशी अफवा आली की दर्शन आपला पुढचा सिनेमा अभिनेता हृतिक रोशनसोबत करत आहेत. अक्षयने दर्शन यांना थेट विचारलं की, त्याने काही चूक केली आहे का. त्यावर दर्शन यांनी स्पष्ट केलं की, ते हृतिक रोशनच्या घरी गेले होते… हे सत्य आहे, पण त्यांनी त्याच्यासोबत कोणताही सिनेमा साइन केलेला नव्हता; तो केवळ एक गैरसमज होता. त्यानंतर अक्षय कुमारने दर्शन यांच्याकडून वचन घेतलं की ते त्याच्यासोबत 100 सिनेमांमध्ये काम करतील.
