31 वर्षांनंतर शिल्पा शेट्टीने मोडली शपथ! अक्षयने स्पर्श करताच जोडले हात, व्हिडीओ व्हायरल

'त्याने माझा वापर करुन मला सोडून दिले' असे शिल्पाने अक्षयबाबत म्हटले होते. त्यानंतर ३१ वर्षांनंतर दोघांना एकत्र पाहून सर्वजण चकीत झाले आहेत.

31 वर्षांनंतर शिल्पा शेट्टीने मोडली शपथ! अक्षयने स्पर्श करताच जोडले हात, व्हिडीओ व्हायरल
Akshay Kumar and shilpa shetty
Image Credit source: Instagram/ Social Media
| Updated on: Mar 04, 2025 | 1:25 PM

बॉलिवूडमध्ये असे काही स्टार आहेत ज्यांनी रुपेरी पडद्यावर एकत्र काम केले होते. मात्र, अचानक एकमेकांसोबत काम करण्यास नकार दिला. त्यामध्ये बॉलिवू़ड अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि अभिनेता अक्षय कुमार यांचा देखील समावेश आहे. दोघांनी ‘मैं खिलाडी तू अनाडी’ या चित्रपटात काम करत चाहत्यांची मने जिंकली होती. मात्र, १९९४ मध्ये प्रदर्शित झालेल्या या सिनेमानंतर शिल्पाने अक्षयसोबत काम न करण्याची शपथ घेतली होती. आता शिल्पाने ही शपथ मोडली आहे.

‘मैं खिलाडी तू अनाडी’ चित्रपटाच्या सेटवर अक्षय आणि शिल्पामध्ये जवळीक वाढल्याच्या चर्चा सुरु होत्या. पण शिल्पाने अक्षयवर आरोप केले होते की ‘त्याने केवळ माझा वापर केला. दुसरी कोणी तरी मिळाली म्हणून त्याने मला सोडून दिले.’ त्याच वेळी शिल्पाने शपथ घेतली होती की ती कधीही अक्षयसोबत पुन्हा काम करणार नाही. पण आता जवळपास ३० वर्षानंतर अक्षय आणि शिल्पाला एकाच मंचावर, एकाच ड्रेसकोडमध्ये पाहून सर्वांना धक्का बसला आहे. तसेच दोघांनी केलेल्या डान्सची विशेष चर्चा रंगली आहे.

शिल्पा शेट्टी आणि अक्षय कुमार हे नुकताच एका पुरस्कार सोहळ्याला पोहोचले होते. दोघेही मंचावर एकत्र बसले होते. दोघांनी एकत्र परफॉर्म केला. पांढऱ्या रंगाच्या कपड्यांमध्ये दोघांनी ‘चुरा के दिल मेरा… गोरिया चलीं’ या गाण्यावर डान्स केला. या गाण्याची हुक स्टेप झाल्यावर अक्षयने शिल्पाला स्पर्श केला. तेव्हा शिल्पा अक्षयचा हात बाजूला करून हात जोडून झाला संपला डान्स असे बोलताना दिसत आहे. त्यांचा हा डान्स करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल होताच नेटकऱ्यांनी कमेंट्स करण्यास सुरुवात केली आहे. एका यूजरने ‘अक्की आणि शिल्पा एकत्र पाहून शॉकिंग रीयूनियन आहे’ अशी कमेंट केली आहे. तर दुसऱ्या एका यूजरने, ‘मी खरच यासाठी तयार नव्हतो’ असे म्हटले आहे.