AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

चौकशीसाठी समोर येण्यास राज कुंद्राची टाळाटाळ?, ईडीने दुसऱ्यांदा बजावले समन्स

अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राला ईडीने दुसरे समन्स पाठवले आहेत. त्याला बुधवारी चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. राज कुंद्राने ईडीकडे वेळ मागितला होता. मात्र ईडीने ही मागणी फेटाळली आहे.

चौकशीसाठी समोर येण्यास राज कुंद्राची टाळाटाळ?, ईडीने दुसऱ्यांदा बजावले समन्स
Shilpa Shetty and Raj KundraImage Credit source: Instagram
| Updated on: Dec 03, 2024 | 9:24 AM
Share

अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती आणि उद्योगपती राज कुंद्राला सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) दुसऱ्यांदा समन्स बजावले आहेत. राज कुंद्राला ईडीने बुधवारी चौकशीसाठी उपस्थित राहण्यास सांगितलं आहे. अश्लील चित्रपट निर्मितीप्रकरणी हे समन्स बजावण्यात आले आहेत. याप्रकरणी मॉडेल आणि अभिनेत्री गहना वशिष्ठलाही समन्स पाठवण्यात आल्याची माहिती आहे. ईडीने राज कुंद्राला सोमवारी चौकशीला उपस्थित राहण्यासाठी सांगितलं होतं. मात्र तो उपस्थित राहिला नाही आणि अधिक वेळ मागितला. ईडीने ही मागणी फेटाळली असून राजला दुसरे समन्स पाठवले आहेत. त्याला बुधवारी चौकशीला उपस्थित राहण्यास सांगितलं आहे. याप्रकरणी ईडीने आठवड्याभरापूर्वी राज कुंद्राशी संबंधित मुंबई, उत्तर प्रदेशातील विविध ठिकाणच्या 15 मालमत्तांवर छापे टाकले होते. कुंद्राच्या जुहू इथल्या निवासस्थान आणि त्याच्या सहकाऱ्यांशी संबंधित मालमत्तांवरही छापे टाकले.

शिल्पाचं नाव यात न ओढण्याची राजची विनंती

गेल्या काही वर्षांत वेगवेगळ्या प्रकरणात ईडीने राज कुंद्राची चौकशी केली होती. अश्लील चित्रपट बनवल्याप्रकरणी त्याला मुंबई पोलिसांनी जुलै 2021 मध्ये अटकसुद्धा केली होती. ईडीच्या छापेमारीनंतर राज कुंद्राने सोशल मीडियावर पोस्ट लिहिली होती. या पोस्टमध्ये त्याने त्याच्या पत्नीचं नाव याप्रकरणात ओढू नका, अशी विनंती केली होती. ‘गेल्या चार वर्षांपासून सुरू असलेल्या तपासाला मी पूर्णपणे सहकार्य करतोय. पॉर्नोग्राफी, मनी लाँड्रींगचा दावा करणाऱ्यांना मी सांगू इच्छितो की याबद्दल कितीही सनसनाटी केली तरी सत्य ढगाआड लपणार नाही. अखेर न्यायाचा विजय होईल’, असं त्याने म्हटलं होतं.

राज कुंद्रावरील आरोप

राज कुंद्रावर अश्लील चित्रपट बनवल्याचा आरोप आहे. तयार केलेला अश्लील चित्रपटांचा कंटेंट ‘हॉट हिट मुव्हीज’ आणि ‘हॉटशॉट्स’ या सबस्क्रिप्शन आधारित मोबाइल ॲप्सवर वितरित केला जात होता. ‘हॉटशॉट्स’ हे ॲप कुंद्राने 2019 मध्ये स्थापन केलेल्या आर्मस्प्राईम मीडिया प्रायव्हेट लिमिटेडद्वारे विकसित केला गेल्याचा आरोप होता. आर्मस्प्राईमने नंतर कुंद्राचा मेहुणा प्रदीप बक्षीच्या मालकीच्या युके स्थित केनरिन लिमिटेड कंपनीला हॉटशॉट्स विकलं. या प्रकरणाशी संबंधित कुंद्रा आणि अन्य तीन आरोपींविरुद्ध मुंबई पोलिसांनी याआधीच चार्जशीट दाखल केला आहे.

2021 मध्ये कुंद्राने तुरुंगात दोन महिने घालवले आणि त्याच वर्षी सप्टेंबरमध्ये त्याला जामीन मंजूर झाला. कुंद्रा या प्रकरणातील मुख्य आरोपी असल्याचा दावा मुंबई पोलिस अधिकाऱ्यांनी केला होता. तसंच यासंदर्भात ईडी ही परदेशातील आर्थिक व्यवहारांचाही शोध घेत आहे.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.