
बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीची आई सुनंदा शेट्टी यांच्या तब्येतीमध्ये अचानक बिघाड झाल्याने त्यांना मुंबईच्या लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गुरुवारी 30 ऑक्टोबर रोजी ही घटना घडली आहे. शिल्पा शेट्टी रुग्णालयात दाखल होत असतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे. या दरम्यान शिल्पा शेट्टी घाईत अन् चिंतेमध्येच आईला भेटण्यासाठी आल्याचं या व्हिडीओमध्ये दिसत आहे. यादरम्यान, शिल्पाच्या चेहऱ्यावर चिंता आणि काळजी स्पष्टपणे दिसत आहे.
शिल्पा शेट्टी तिच्या आईला भेटण्यासाठी रुग्णालयात पोहोचली
शिल्पा शेट्टी हा व्हिडीओ एका एक्स यूजरने त्याच्या अकाउंटवर शेअर केला आहे. तसेच त्याने कॅप्शनमध्ये लिहिले आहे, “शिल्पा शेट्टी मुंबईतील लीलावती हॉस्पिटलमध्ये पोहोचली…” व्हिडिओमध्ये, अभिनेत्री तिच्या कारमधून उतरते आणि पटकन हॉस्पिटलमध्ये जाताना दिसत आहे. यावेळी अभिनेत्री साध्या लूकमध्ये दिसली.
कुटुंबाकडून कोणतेही अधिकृत माहिती नाही
सुनीता शेट्टीच्या प्रकृतीबाबत शिल्पा शेट्टी किंवा तिच्या कुटुंबाकडून अद्याप कोणतेही अधिकृत विधान आलेले नाही. चाहते सोशल मीडियावर शिल्पाच्या आईला लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा देत आहेत.
शिल्पा शेट्टी तिच्या आईच्या खूप जवळ आहे
हा व्हिडिओ पाहिल्यानंतर शिल्पाचे चाहतेही अस्वस्थ झाले आहेत आणि अभिनेत्रीच्या आईच्या लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करत आहेत. शिल्पाचे वडील सुरेंद्र शेट्टी यांचे 2016 मध्ये निधन झाले. तसेच शिल्पा तिची आई सुनंदा यांच्या फार जवळ आहे. तिला नेहमीच तिच्या आईसोबत पाहायला मिळालं आहे. ती अनेकदा सोशल मीडियावर तिच्यासोबतचे फोटो शेअर करताना दिसते.
शिल्पाने बहीण अन् आईसह कपिल शर्मा शोमध्ये लावली होती हजेरी
तसेच कपिल शर्माचा शोमध्ये देखील शिल्पा, तिची लहान बहीण शमिता शेट्टी आणि आई सुनंदा शेट्टीसह उपस्थित होती. तो एपिसोड देखील खूप चर्चेत आला होता. चाहत्यांनी या एपिसोडला खूप पसंती दर्शवली होती. त्यामुळे आता सोशल मीडियावर सगळेजण सुनंदा शेट्टी याच्या तब्येतीसाठी प्रार्थना करत आहेत. तेसच शिल्पासाठीही काळजी दर्शवत मेसेज करताना दिसत आहेत.
शिल्पा शेट्टीच्या कामाबद्दल
कामाच्या बाबतीत, शिल्पा शेट्टी शेवटची 2022 मध्ये प्रदर्शित झालेल्या “निकम्मा” चित्रपटात दिसली होती. त्यानंतर, ती अलीकडेच एका डान्स रिअॅलिटी शोचे परीक्षण करताना दिसली. तिच्याकडे सध्या अनेक मोठे चित्रपट आहेत. तसेच ती “इंडियन पोलिस फोर्स” या वेब सिरीजमध्ये दिसली होती. ती पुढे कन्नड चित्रपट “केडी: द डेव्हिल” मध्ये दिसणार आहे, जो 14 नोव्हेंबर 2025 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.
शिल्पा तिच्या कामाव्यतिरिक्त, शिल्पा शेट्टी तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे देखील चर्चेत आहे. ती 60 कोटी रुपयांच्या फसवणुकीच्या प्रकरणात अडकली आहे. ज्यामध्ये तिचा पती राज कुंद्रा देखील सामील आहे.