
Shoaib Malik and Sana Javed: पाकिस्तानचा माजी क्रिकेटर गेल्या काही दिवसांपासून त्याच्या प्रोफेशल आयुष्यामुळे नाही तर, खासगी आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. कधी वादग्रस्त वक्तव्यांमुळे तर कधी खासगी आयुष्यामुळे शोएब सर्वत्र चर्चेत आहे. चांगल्या कारणामुळे कमी तर वाईट करणांमुळेच शोएब अधिक चर्चेत राहिला. ज्यामुळे त्याच्यावर फक्त भारतानेच नाही तर, पाकिस्तानी नागरिकांनी देखील टीका केली. भारताची स्टार खेळाडू सानिया मिर्झा हिची फसवणूक केल्यामुळे देखील अनेकांनी शोएब याच्यावर निशाणा साधला… सानियाला घटस्फोट देत शोएब याने तिसरं लग्न पाकिस्तानी अभिनेत्री सना जावेद हिच्यासोबत केलं. पण आता शोएब याचा तिसरा घटस्फोट होणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे.
शोएब मलिक आणि सना जावेद यांचं लग्न जानेवारी 2024 मध्ये झालं. ज्यामुळे सानिया मिर्झाच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला. सांगायचं झालं तर, सानिया आणि शोएब यांच्या घटस्फोटाच्या चर्चा सुरुच होत्या पण शोएब याच्या तिसऱ्या लग्नाचे फोटो समोर आल्यानंतर घटस्फोटाच्या चर्चांना पूर्णविराम लागला. अशात, सानिया आणि शोएब यांच्या घटस्फोट झाल्याचं स्पष्टीकरण सानियाच्या कुटुंबियांनी दिलं. तर, शोएब याच्या विवाहबाह्य संबंधांना सानिया कंटाळली होती… असा धक्कादायक खुलासा शोएब याच्या भावाने केला…
सानिया हिला घटस्फोट दिल्यानंतर शोएब याने तिसरं लग्न केलं. पण लग्नात दीड वर्षात वाद निर्माण झाल्याची माहिती समोर येत आहे. सध्या सोशल मीडियावर सना जावेद आणि शोएब मलिक यांचा एक व्हिडीओ सर्वत्र व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये सना आणि शोएब एका कार्यक्रमात बसलेले दिसत आहेत. पण दोघे एकमेकांसोबत एक शब्द देखील बोलताना दिसत आहेत. एवढंच नाही तर, शोएब चाहत्यांना ऑटोग्राफ देत असताना देखील सना त्याच्याकडे पाहत नसल्याचं दिसत आहे… व्हिडीओमध्ये समा नाराज आहे.. असं अनेक चाहते म्हणत आहे.
व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सना आणि शोएब यांच्या घटस्फोटाच्या चर्चांनी जोर धरला आहे. पण यावर दोघांनी देखील अधिकृत वक्तव्य केलेलं नाही… व्हिडीओवर अनेक नेटकरी कमेंट करत प्रतिक्रिया देखील देत आहे. सध्या सर्वत्र शोएब याच्या खासगी आयुष्याची चर्चा रंगलेली आहे.
शोएब याच्या खासगी आयुष्याबद्दल सांगायचं झालं तर, शोएब मलिकची पहिली पत्नी आयेशा सईद होती, जिच्याशी पाकिस्तानी क्रिकेटपटूने लग्नाच्या 8 वर्षांनंतर नातं मोडलं. त्यानंतर 2010 मध्ये शोएब याने सानिया मिर्झा हिच्यासोबत लग्न केलं. दोघांना एक मुलगा देखील आहे. 2024 मध्ये दोघांनी घटस्फोट घेतला… तर सना हिचं देखील शोएब याच्यासोबत दुसरं लग्न आहे..